क्रेडिट कार्ड घेताना (भाग : 1)

26 फेब्रुवारीच्या 'टॉक टाइम'चा विषय होता ' क्रेडिट कार्ड घेताना '. त्याविषयावर ग्राहक पंचायतचे मार्गदर्शक प्रकाश रिसबुड यांनी मार्गदर्शन केलं. क्रेडिट कार्ड म्हणजे सध्याच्या काळात खरेदीचा स्मार्ट पर्याय. नोटांची बंडलं घेऊन फिरण्यापेक्षा एका कार्डनं हव्या त्या वस्तू विकत घेणं कधीही सोप्प. पण हा स्मार्ट पर्याय अनेकदा महागही पडू शकतो. त्यामुळं क्रेडिट कार्ड घेताना, ते वापरताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात यावर ग्राहक पंचायतचे मार्गदर्शक प्रकाश रिसबुड यांनी मार्गदर्शन केलं. हल्ली लोकांची क्रेडिट कार्डनं खरेदी करण्याची प्रवृत्ती वाढत आहे आणि त्याच बरोबर क्रेडिट कार्ड मधील फसवणुकही. मुळातच क्रेडिट कार्ड घेताना ते ज्या बँकेकडून घेणार आहोत त्याची पू्र्‌ण चौकशी केली पाहिजे,कोणत्याही फॉर्मवर सही करताना तो आधी पूर्णपणे वाचला पाहिजे,आपली क्रेडिट लिमीट ठरवून घ्या, जेव्हा क्रेडिट कार्डनं खरेदी केल्यावर त्याचं स्टेटमेन्ट येतं तेव्हा त्यात मिनीमम अमाउंट पेएबल लिहलेलं असतं.तुमचं बील असतं 20-22 हजार, लोकं फक्त नॉमिनल रक्कम भरतात. त्यामुळे उरलेल्या रक्कमेवरचा इंटरेस्ट वाढत जातो.तर मुळातच क्रेडिट कार्ड घेताना ते वापरायचं कसं ते ही शिकून घेतलं पाहिजे. क्रेडिट कार्ड हरवलं तर लगेचच संबंधित बँकेत आणि पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करावी.बँक लगेच कार्ड ब्लॉक करते जेणेकरुन त्या कार्डचा गैरवापर होऊ नये.तुमच्या क्रेडिट कार्डचा पिन नंबर पासवर्ड याबाबत गुप्तता पाळा यासारखे अनेक सल्ले प्रकाश रिसबुड यांनी दिले. क्रेडिट कार्ड घेतानाची काळजीक्रेडिट कार्डचा व्यवहार संशयास्पद वाटल्यास लगेच चौकशी करा.व्याज दर नीट तपासा.सर्व नियम पडताळून पहा.आपला आर्थिक व्यवहार नीट तपासा.बँकेकडून क्रेडिट कार्ड घेताना त्यांची क्रेडिट पॉलिसी तपासा.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2009 12:24 PM IST

ताज्या बातम्या