धडा सत्यमचा ( भाग 2 )

धडा सत्यमचा ( भाग 2 )

धडा सत्यमचा ( भाग 2 )सत्यम सारख्या आयटी क्षेत्रातल्या कंपनीचा घोटाळा उघकीस आल्यानंतर मार्केटबरोबर सत्यमचाही शेअर कोसळला. सत्यमचे राजलिंगम राजू यांनी दिलेल्या कबुलीनंतर सत्यमचा शेअर, मार्केटमध्ये 80टक्क्यांनी घसरला.कित्येकांचं लाखोंच नुकसान झालं. आता या शेअरचं काय करावं असा प्रश्नचं गुंतवणूकदारांना पडला आहे. सत्यमच्या या महाघोटाळ्यानंतर सर्वसामान्यांनी काय करायचं याबाबत श्रीमंत व्हा या आपल्या कार्यक्रमात सल्ला देण्यासाठी आले होते चार्टड अकाउटंन्ट प्रफुल्ल छाजेड आणि गुंतवणूक तज्ज्ञ विजय पराडकर.सत्यमचे शेअर, मार्केटमध्ये इतके घसरले की त्याबाबत आत्ता निर्णय घेणं योग्य आहे का हा प्रश्न विचारलं असता विजय पराडकर म्हणाले, सद्या सत्यमचे शेअर इतके खाली आले आहेत की ते विकणे योग्य ठरणार नाही. सत्यमबाबत आता सरकार महत्त्वाची पावलं उचलणार आहे. त्यामुळे थोडावेळ वाट पाहून चांगली किंमत आल्यावरच ते शेअर विकण्याचा विचार करावा.आता सत्यमसारख्या कंपनीचा इतका मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सर्वच कंपनीबद्दल प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत. याबाबत गुंतवणूकदारांनी आता काय करावं याचं उत्तर देताना प्रफुल्ल छाजेड सांगतात,अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराबद्दल पूर्ण माहिती नसते. तरी तो त्यामध्ये गुंतवणूक करत असतो. केवळ मित्रांच्या माहितीच्या आधारे, पेपरमध्ये वाचून अनेकजण गुंतवणूक करत असतात. सत्यमबाबत ही एक मोठी कंपनी आहे.सद्या आपला देश लिबरॅलिझमच्या प्रक्रियेतून जात आहे. असं असताना आपल्याकडे अनेक मोठया कंपन्या भारतात येत आहेत. परकीय भांडवल येत आहे. त्यामुळे काही लोकं संधींचा फायदा घेण्यासाठी अफरातफर करतात. त्यामुळे गुंतवणूक ही अशी गोष्ट आहे जिथे तुम्ही तुमचा पैसा गुंतवता म्हणून तुम्ही अभ्यास करूनच मार्केटमध्ये पैसा गुंतवावा. जर तुम्ही पैसे वेगवेगळया कंपनीत गुंतवले तर सत्यमसारख्या घटनेचा व्यक्तीश: कमी परिणाम पडलेला दिसेल. आता सत्यमसारख्या मोठ्या कंपनीचे शेअर विकत घेतानाही विचार करायला लागेल.सत्यममुळे विश्वासार्हता नक्की कमी झाली आहे. पण त्याचा परिणाम इतर कंपन्यावर होईलच असं नाही. इतर कंपन्या अशाच प्रकारची अफरातफर करत असतील असं नाही. उलट आता भारतीय कंपन्या परदेशात गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करतील. पण सत्यमने दिलेल्या धक्क्यापासून सावरायला अजून वेळ लागेल हे निश्चित. आयटी क्षेत्रात भारतीय कंपन्यांच भविष्य नक्कीच चांगलं असणार आहे. पण 1999-2003 यावेळे सारखी स्थिती आता नसणार हे मात्र नक्की.एका दिवसात सत्यमचा शेअर कोसळला त्यावेळी सर्किट ब्रेकर का लावला नाही याप्रश्नांचं उत्तर देताना प्रफुल्ल छाजेड सांगतात,जेव्हा एखादा शेअर लिस्ट झालेला असतो त्यावेळी त्याच्यावर सर्किट ब्रेकर कसं लावावं याबाबत काही नियम आहेत. त्यामुळे जेव्हा सत्यमचा शेअर 80 टक्क्यांनी खाली आला तरी कारवाई झाली नाही. पण सत्यमवर नियमानुसार सेबीने कारवाई केली.शेअर मार्केटमध्ये सेबीचा रोल म्हणजे शेअर मार्केटचं कामकाज व्यवस्थित चालावं हे पाहाणंआहे. सेबी प्रत्येक कंपनीच्या कारभारावर लक्ष ठेऊ शकतं नाही. पण कंपन्यांच लिस्टिंग करणे, त्यांचे तिमाही अहवाल मागवणे. मोठी घटना घडत असेल तर त्यांची सूचना मार्केटला द्यावी हे आहे.सत्यम कंपनीचा एवढा मोठा घोटाळा बाहेर आला. त्याप्रमाणे इतर आयटी क्षेत्रातील कंपन्यामध्ये घोटाळा झाल्यावर काय करायचं या प्रश्नाला उत्तर देताना पराडकर सांगतात, सर्वात पहिलं तुम्ही शेअर बाजारात पैसा गुंतवता तेव्हा त्या मार्केटबद्दल, त्याकंपनीबद्दल तुम्हांला पूर्ण माहिती हवी. दुसरं सत्यममध्ये असा घोटाळा झाला म्हणून इतर कंपन्यात असं होईल हे चूक आहे.तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवता तेव्हा तिथे रिस्क असते. ती प्रत्येकाला जोखता आली पाहिजे.मोठ्या कंपन्यामध्ये रिस्क थोडी कमी असते. शेवटी सत्यमच्या घोटाळा नक्की किती आहे त्याचे काय परिणाम होणार हे सगळं आता चौकशी नंतरच कळू शकणार त्यामुळे आता थोडी वाट पहावी लागणार त्यानंतरच गुंतवणूकदाराने योग्य तो निर्णय द्यावा असं दोन्ही तज्ज्ञांना वाटतं.

  • Share this:

First published: January 12, 2009, 5:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या