गाथा बहादुरीची (भाग 6 )

गाथा बहादुरीची (भाग 6 )

गाथा बहादुरीची26 नोव्हेंबरला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात अनेकांनी आपले प्राण गमावले. आपल्या जिवाची पर्वा न करता पोलिसांनी निधड्या छातीने दहशतवाद्याच्या हल्ल्याला प्रतित्तर दिलं. दहशतवादी हल्ल्याच्या एका महिन्यानंतर आता मुंबई सावरली आहे. देश सावरला पण ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्या शहीदांना आपण विसरू शकत नाही. एक महिन्यानंतर आज दिवस आहे त्यांची आठवण जागण्याचा, त्यांना सलाम करण्याचा. आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी मुंबई हल्ल्याला एक महिना पूर्ण होताना एक विशेष कार्यक्रम सादर केला गाथा बहादुरीची...मुंबई पोलिसांनी आपल्या जिवाची बाजी लावून मुंबई जिवंत ठेवली. त्यापैकी शशांक शिंदे ह्यांनी मुंबई हल्ल्य्यात आपलं बलिदान दिलं.मुंबई पोलिसांपैकी शशांक पहिले शहीद. मुंबई सीएसटी रेल्वे स्टेशनवर हल्ला झाला त्यावेळी शशांक शिंदे ड्युटीवर होते. त्यांच्या हातात केवळ रिव्हॉलवर होतं, त्या रिव्हॉलवरच्या मदतीने त्यांनी दहशतवाद्यांच्या एके 47 बंदुकीतील गोळयाचा सामना केला. त्यांनी रेल्वे स्टेशनवरील हजारो लोकांचे प्राण वाचवले पण शेवटी मागून हल्ला केलेल्या दहशवाद्याच्या गोळीबारात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. 26 नोव्हेंबरला जेव्हा शशांक शिंदेंच्या पत्नीला त्यांच्या वडिलांनी फोन केला तेव्हा शशांक तेथे नक्कीच असणार याची जाणीव होती. आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्यामुळे दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी ते सर्वांच्या पुढे असणार यांचीही जाणीव होती. मानसी शिंदे सांगतात, इतका मोठा हल्ला झाल्यामुळे त्यांना गोळया लागणारच असं वाटलं पण नंतर शहीद झाल्याची बातमी आली आणि धक्का बसला. मानसी शिंदेंना शशांक बलिदानाबद्दल अभिमान आहे. कारण त्यांना पोलीस अधिका-याबरोबरच लग्न करायचं होतं. त्यांना खाकी गणवेशाबद्दल अभिमान होताच शिवाय शशांकसोबत त्यांनी 20 वर्ष संसार केला होता. शशांक शिंदे यांची लहान मुलगी निवेदिता सांगते, हे सगळं स्वप्नासारखं वाटतंय. पप्पा कधीतरी सकाळी परत येतील असं वाटतं. त्याच्या फोटोकडे पाहिल्यानंतर त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आदर वाटतो. शशांक आपल्या दोन मुलींना, प्रत्येकाने नेहमी दुस-याच्या मदतीला तत्पर असलं पाहिजे असं सांगायचे. ज्यावेळी सीएसटी स्टेशनवर हल्ला झाला त्यावेळी पोलीस अधिकारी एस.डी.खिरटकर, पीएसआय किरण भोसले आणि रेल्वे पोलीस झिल्लू यादव या तिघांनी आपापल्या परीने दहशतवाद्यांना ठार करण्याचा आणि लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तिथे हजर असलेले पोलीस अधिकारी एस.डी.खिरटकर स्टेशनवरच ड्युटीवर होते. त्यांना ज्यावेळी कळालं सीएसटी रेल्वे स्टेशनवर गोळीबार झाला. त्यावेळी पहिल्यांदा ती छोटी घटना असेल असं वाटलं होतं. परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जेव्हा ते गेले त्यावेळी त्यांनी दहशवादी अत्याधुनिक हत्यारानिशी पूर्ण तयारनिशी आल्याचं त्यांना कळलं. लगेचच त्यांनी आपल्या वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली आणि पोझिशन घेऊन आपल्या पिस्तुलांनी दहशतवाद्यावर हल्ला चढवला.पीएसआय किरण भोसले सांगतात, हल्ला झाला त्यावेळी ते रिझर्व्हेशन काउन्टरसमोर होते. लोकांना त्यांनी पळताना पाहिलं. दोघा जखमींनाही त्यांनी टॅक्सीतून हॉस्पिटलमध्ये पाठवलं. त्याच वेळी दोन दहशतवादी पळणा-या लोकांवर गोळीबार करणार इतक्यात भोसलेंनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यामुळे त्या दोघांनी भोसलेंच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांच लक्ष विचलित झाल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. रेल्वे पोलीस झिल्लू यादव तेव्हा बाहेरच्या गेटवर उभे असताना त्यांनी दहशतवाद्यांना बंदुकीत मॅगझिन टाकताना पाहिलं. त्यांच्याकडे काठी असल्यामुळे ते काहीही करू शकले नाही.त्यांनी बाजूच्या सुरक्षा रक्षकाकडून रायफल घेतली आणि त्या दोघावर गोळीबार केला. प्रतिउत्तरादाखल दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. आणि दहशतवादी पुढे गेले. पण सीएसटीवरील सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारातून दहशतवादी ठार झाले नाहीत यांची खंत या तिघांनाही आहे.विष्णू झेंडे सीएसटीचे असे अनाउन्सर आहेत ज्यांनी याघटनेचं गांभीर्य ओळखून हल्ल्याच्या दिवशी कित्येकांचे प्राण वाचवले. झेंडे सांगतात, फायरिंग झाल्यानंतर लोक वाट दिसेल तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्याच वेळी सीएसटीवर तीन लोकल आल्या. लोक दहशतवाद्याचं टार्गेट होऊ नये म्हणून झेंडेंनी प्रथम सुरक्षारक्षकांना सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या दिशेने यायला सांगितलं. त्यानंतर सर्व लोकांना प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या मागच्या दिशेने बाहेर जायला सांगितलं. ह्या सूचना ते जवळ-जवळ 10 मिनिटं सतत करत होते. त्यांच्या सूचनामुळे अनेकांचे प्राण वाचले. पण झेंडे ज्यावेळी सूचना करत होते त्यावेळी दहशतवादी बेछूट गोळीबार करत होते. त्यापैकी एक गोळीअनाउन्समेंट केबिनमध्येही शिरली होती. तरीही विष्णू झेंडे अनाउन्समेंट करत राहीले. अशाच छोट्या वाटणा-या पण कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे अनेकांचे प्राण वाचू शकले.कर्तव्यदक्षतेच आणखी एक उदाहरण म्हणजे जे.जे. हॉस्पिटलचे कर्मचारी. 26/11च्या हल्ल्यानंतर इथल्या डॉक्टरांनी जे काम केलं त्याला तोड नाही. जे.जे. हॉस्पिटलचे डॉक्टर बक्षी सांगतात, 26/11च्या वेळी इथे 140 पेशंट आले होते. त्यातील अनेक पेशंट सिरियस होते. आम्ही प्रथम तीन प्रकारची टीम तयार केली. पहिली टीम पेशंटवर प्राथमिक उपचार करत होती. दुसरी ऑपरेशन थिएटरमध्ये होती तर तिसरी टीम आयसीयुमध्ये होती. इथल्या प्रत्येक व्यक्तीने 48 तासांपेक्षा जास्तवेळ काम केल्यानंतरच विश्रांती घेतली. जेजेच्या टीमने सलग इतके तास काम करून अनेकांचे प्राण वाचवण्यात यश मिळवलं याचं समाधान डॉ.बक्षी आणि त्यांच्या टीमला त्यावेळी वाटलं.अशाच डॉक्टरांपैकी नरेंद्र निकम असे डॉक्टर आहेत त्यांचं 26/11च्या दुस-याच दिवशी किडनीच ऑपरेशन होणार होतं.पण स्वत:चा त्रास विसरून डॉक्टर निकम ड्युटीवर हजर झाले. आणि अनेकांचे प्राण वाचवले.दीपक ढोले हे कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर आहेत. हल्ल्याच्या दिवशी कुलाबा पोलीस ठाण्यावरून ते ताजमध्ये गेले होते. त्यावेळी गोळीबार आणि ग्रेनेडचा हल्ला होत होता. ताजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा रूममध्ये ते होते. तिथे आग लागली असल्यामुळे त्यांची टीम बाहेर पडली त्याच वेळी दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्लाकरून गोळीबार केला त्यात त्यांच्या टीममधला एसआरपी जवान राहुल शिंदेंना गोळी लागली. इन्स्पेक्टर ढोले यांची टीम पुन्हा कॅमेरा रूममध्ये आली. पण त्यारूमला खिडकी नव्हती त्यामुळे आगीतूनच दहशतवाद्यांच्या गोळीबाराचा मुकाबला करत त्यांना बाहेर पडावं लागलं.26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसांसोबत मुंबई अग्निशमन दलानेही मोलाची कामगिरी बजावली आहे. ताजमधल्या कारवाईत ते कित्येक तास काम करत होते. या जवानांनी आगीशी खेळत कित्येकांचे प्राण वाचवले आहेत.फोर्ट विभागाचे फायर ऑफिसर सुधीर अमीन ताजच्या ऑपरेशनमध्ये सतत 4 दिवस काम करत होते. ते सांगतात, अशाप्रकारचा हल्ला याआधी मुंबईवर काय तर देशावर झाला नव्हता. त्यामुळे हा त्यांचा पहिला अनुभव होता. पण फायर ब्रिगेडचं एकच ध्येय असतं आग लागली आहे तिथे ती आग विझवा आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढा. मग तो कोणताही प्रसंग का असू नये किंवा कोणत्याही प्रकारचा हल्ला असला तरी. आम्हाला आमचं काम केलेच पाहिजे. म्हणून ताज ऑपरेशनमध्ये आम्हाला वेगळी जाणीव झाली नाही. आम्ही आमची ड्युटी पूर्ण केली. फायर ब्रिगेडचे स्टेशन ऑफिसर संजय राणे सांगतात, त्यांना पहिला सीएसटी रेल्वे स्टेशनचा कॉल मिळाला त्यानंतर त्यांना ताजकडे बोलावण्यात आलं. ताजला आग लागलेलीच होती परंतु दहशतवाद्यांचा गोळीबारही चालू होताच. अशा परिस्थितीत कोणतही शस्त्र नसताना फायर ब्रिगेडच्या जवानानी ताज हॉटेलमधून 300 लोकांची सुटका केली. स्वत: जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणारे ह्या जवानांना साधा पुरेसा इन्शुअरन्स देखील मिळत नाही यांचीच खंत वाटते.ताज हॉटेलमध्ये सर्वात प्रथम दहशतवाद्याशी मुकाबला केला तो डीसीपी विश्वास नांगरे-पाटील यांनी. डीसीपी पाटील सांगतात, हल्ल्याची माहिती मिळाल्यावर ते ताजकडे निघाले. त्यावेळी त्यांच्या पिस्तुल होतं. ताजच्या मागच्या बाजूला ताजचा चीफ सिक्युरिटी सुनील कुडीयादी त्यांची वाट पाहत होता.त्यांच्या मदतीने डीसीपी विश्वास पाटील ताजमध्ये शिरले. तेथे दुस-या मजल्यावर त्यांना तीन अतिरेकी दिसले. त्यांनी दहशतवाद्यांवर फायरिंग केली आणि त्यांतील एकाला जखमी केलं. वरून टार्गेट मिळेल म्हणून ते सहाव्या मजल्यावर गेले. पण तिथे कोणीही सापडलं नाही. म्हणून प्रत्येक माळा तपासत ते खाली येत असताना दहशतवाद्यांनी त्याच्यावर ग्रेनेड टाकून फायरिंग केलं. ते दहशतवाद्यांशी लढत राहिले. हल्ल्याच्या प्रसंगाबाबत डीसीपी नागरे-पाटील सांगतात, सिस्टिमवर विश्वास ठेवा. तसंच अशा प्रसंगी सर्वांनी मिळून सिस्टिमला मदत केली पाहिजे.नरिमन हाऊसवरील कामगिरी ही मुंबई हल्ल्याच्यावेळी केलेली यशस्वी कमांडो कारवाई.ही कामगिरी यशस्वी करणारे अमित तिवारी सांगतात, नरिमन हाऊच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये त्यांना जाण्यास सांगितलं गेलं.त्या बिल्डिंगमधून ते दहशतवाद्यांची हालचाल पाहत होते. आजूबाजूलाही कमांडो होतेच आम्ही एकमेकांना दहशतवाद्यांच्या पोझिशनची माहिती देत होतो. ते सगळीकडे गोळीबार करत होते दोनवेळा दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. तिस-यावेळेला मात्र कमांडोअमित यांना दहशतवाद्यांवर गोळीबार केला त्यात एक दहशतवादी टार्गेट झाला. अमित नॅशनल शूटिंग चॅम्पियन आहे. पण त्याचं हे टार्गेट त्यांना सर्वांत मोठी अचिव्हमेंट वाटते.मुंबई हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी स्फोटकं, बॉम्ब होते. ओबेरॉयमध्ये असलेले बॉम्ब डिफ्युझ करण्यात आलेल्या पथकाचेही विशेष आभार मानले पाहिजे. कारण गोळीबार चालू असताना इतरांची काळजी घेऊन त्यांनी आपली कामगिरी यशस्वी पार पाडली. त्याच्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.त्यांच्या सोबत काम करणा-या इमानी श्वान पथकाची आठवण काढणं महत्वाचं आहे. कॉन्स्टेबल जाधव यांच्यासूचनेनुसार डी.बी.मार्ग पोलीस स्टेशनने नाकाबंदी केली होती. जेव्हा स्कोडा गाडी नाकाबंदी जवळ आली तेव्हा दहशतवाद्यांनी पुन्हा मागे पळण्याचा प्रयत्न केला. पण ते दोघे पळून जाऊ शकले नाही. ड्रायव्हरच्या जागेवरच्या अतिरेक्यांनी प्रथम हल्ला केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यात तो ठार झाला. त्याचवेळी कसाब पोलिसांना शरण आला. म्हणून पोलीस त्याला पकडायला पुढे गेले पण जखमी कसाबने पोलिसांवर गोळीबार केला. प्रसंगावधान पाहून एएस आय ओंबळेनी त्याच्यावर झडप टाकली आणि कसाबला पकडलं. 26/11च्या हल्ल्याच्यावेळी मुंबई पोलिसांनी जे धैर्य दाखवलं त्याला तोड नाही. ज्यावेळी मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी प्रत्येकाने आपल्या जिवाची पर्वा न करता दहशतवाद्यांसमोर लढण्याची जी हिंमत दाखवली त्यामुळे प्रत्येक मुंबईकरांचा पोलिसांवरील विश्वास पुन्हा वाढला.आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी प्रत्येक शूरवीराला भेट देऊन या कार्यक्रमातून बहादुरीची गाथा उलगडून दाखवली.

  • Share this:

First published: December 29, 2008, 6:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या