रिवाइंड 2008 - साहित्य आणि पुरस्कार

रिवाइंड 2008 - साहित्य आणि पुरस्कार

संमेलन ते संमेलन-एक महाभारतमराठी सांस्कृतिक विश्वाच्या नववर्षाचा घंटानाद होतो साहित्य संमेलनानं. यावर्षी तो झाला सांगलीला आणि त्याचे उत्सवमूर्ती होते, ज्येष्ठ समीक्षक म. द. हातकणंगलेकर. पण आधी संमेलनात आणि नंतर मीडियात मिरवले ते साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील. त्यांनी आधी यशवंतराव चव्हाणांना टार्गेट केलं. आणि मग ते आपली एकेक टार्गेट पूर्ण करतच गेले. पहिल्यांदा त्यांनी 82 वं साहित्य संमेलन थेट अमेरिकेत भरवायचं ठरवलं. त्यावरून महाराष्ट्रात खळबळ उडाली. मग त्यांनी त्याचं बारसं पहिलं विश्व मराठी संमेलन असं केलं. शिवाय त्याच्या अध्यक्षपदी गंगाधर पानतावणे या अजातशत्रू समीक्षकाची निवड करून अनेकांना गप्प केलं. नंतर महाराष्ट्रातल्या संमेलनालाही पैसा मिळतोय हे पाहून महाबळेश्वरलाही 82 वं संमेलन जाहीर करून टाकलं. पण आधीच त्यांच्या चौफेर हल्ल्यानं मराठी साहित्य विश्व घायाळ झाल्यानं त्यानं या संमेलनाची नीट दखलही घेतली नाही. त्यामुळे पुन्हा कौतिकरावच सगळीकडे मिरवत राहिले. संमेलन अमेरिकेत घेण्यावरून गदारोळ करणार्‍यांनी मात्र नामदेव ढसाळांनी मुंबईत भरवलेल्या दुसर्‍या जागतिक साहित्य संमेलनाकडं फिरकण्याचंही सौजन्य दाखवलं नाही. 26 डिसेंबरला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि सगळंच कोलमडलं. त्यात फेब्रुवारीत मालगुंडला होणारं कोकण मराठी साहित्य परिषदेचं तर रत्नागिरीला डिसेंबरमध्ये होणारं शारदा साहित्य संमेलन रद्द झालं. एकीकडे संमेलनाचं महाभारत संपतं न संपतं तोच नाट्य संमेलनाच्या जागरण-गोंधळालाही नाट्य परिषदेचे मोहन जोशी यांनी सुरुवात केली. वामन केंद्रे यांचा अर्जच अवैध ठरवून नाट्य परिषेदनं विश्वास मेहेंदळे आणि रामदास कामत या दोन पर्यायातून अपेक्षेप्रमाणे रामदास कामत यांची निवड केली. आणि संगीत रंगभूमीवर काम करणार्‍यांच्या आशा पालवल्या. हे संमेलन आता जानेवरीत बीडला होतंय. या संमेलनाच्या महाभारताशिवाय मराठी साहित्य विश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडीत उल्लेख करावा लागेल तो दिवाळी अंकांच्या शताब्दीचा. 1909 साली काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी मासिक मनोरंजनचा पहिला दिवाळी अंक काढून सुरू केलेल्या एका वैभवशाली परंपरेला या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली. दरवर्षी मराठीत निघणारे 300-350 दिवाळी अंक मराठी सांस्कृतिक परंपरेचा भाग झाली आहेत. पुरस्कारभारतरत्नमहान शास्त्रीय गायक, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांना यंदाचा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जाणारा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. या बातमीनं सार्‍या महाराष्ट्राला आनंद आणि आश्चर्याचा सुखद धक्का दिला. भारतरत्न या सर्वोच्च सन्मानानं गौरविले जाणारे पंडित भीमेसन जोशी हे महाराष्ट्राचे सातवे रत्न ठरले. हा सन्मान म्हणजे भारतीय अभिजात संगीताचा सन्मान असल्याचं पंडितजी म्हणालेज्ञानपीठ पुरस्कारकोकणी साहित्यिक रवींद्र केळेकर यांना यंदाच्या ज्ञानपीठ पुरस्कारनं गौरवण्यात आलं. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणी भाषेचा दर्जा सुधारावा आणि ती भाषा जनमान्य होण्यासाठी सातत्यानं लिखाण करून उत्तम कोकणी साहित्याची निर्मिती केळेकरांनी केली होती. त्याचा या पुरस्काराच्या रूपानं सन्मान झाल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र भूषणगेली सहा दशके आनंदगाणे पसरविणारे ज्येष्ठ कवी मंगेश पाडगांवकर आणि ज्येष्ठ निरूपणकार नारायण विष्णू ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले. मंगेशाचे युग या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे हस्ते मंगेश पाडगावकरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आयुष्य वेचणारे नानासाहेब धर्माधिकारी हेही पुरस्कारेच मानकरी. नानासाहेबांचं निधन झाल्यानं, त्यांच्या मुलानं म्हणजे आप्पा धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार पेण इथं झालेल्या कार्यक्रमात स्वीकारला. मॅगसेसे पुरस्कारवैद्यकीय सेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आदिवासींच्या जीवनात प्रकाशाची ज्योत पेटविणारे डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे या परोपकारी दाम्पत्याला यंदाचा प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे दिवंगत बाबा आमटे यांनादेखील आयुष्यभर कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या सामाजिक कार्यासाठी हाच पुरस्कार 1985 साली प्राप्त झाला होता. पद्म पुरस्कारपद्म पुरस्काराचे मानकरी1. आशा भोसले - प्रख्यात पार्श्वगायिका2. सचिन तेंडुलकर - किक्रेटपटू3. प्रणव मुखर्जी - परराष्ट्र मंत्री4. डॉ. वसंत गोवारीकर - ख्यातनाम शास्त्रज्ञ5. नारायण मूर्ती - इन्फोसिसचे सर्वेसर्वा6. के.व्ही कामत - सीईओ, आयसीआयसीआय7. विक्रम पंडित - सीईओ, सिटी ग्रुप8. डॉ. तात्याराव लहाने - प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक9. भवरलाल जैन - जैन उद्योग समूह10 . राजदीप सरदेसाई - मुख्य संपादक, सीएनएन आयबीएन11. रतन टाटा - अध्यक्ष, टाटा उद्योग समूह12. माधुरी दीक्षित - अभिनेत्री13. सुखदेव थोरात - अध्यक्ष, युजीसी14. बाबा कल्याणी - उद्योजक रिवाइंड 2008 - सामाजिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा रिवाइंड 2008 - श्रद्धांजली पहाण्यासाठी येथे क्लिक करा रिवाइंड 2008 - दहशतवादाचा भस्मासूर पहाण्यासाठी येथे क्लिक करा रिवाइंड 2008 - राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा

  • Share this:

संमेलन ते संमेलन-एक महाभारतमराठी सांस्कृतिक विश्वाच्या नववर्षाचा घंटानाद होतो साहित्य संमेलनानं. यावर्षी तो झाला सांगलीला आणि त्याचे उत्सवमूर्ती होते, ज्येष्ठ समीक्षक म. द. हातकणंगलेकर. पण आधी संमेलनात आणि नंतर मीडियात मिरवले ते साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील. त्यांनी आधी यशवंतराव चव्हाणांना टार्गेट केलं. आणि मग ते आपली एकेक टार्गेट पूर्ण करतच गेले. पहिल्यांदा त्यांनी 82 वं साहित्य संमेलन थेट अमेरिकेत भरवायचं ठरवलं. त्यावरून महाराष्ट्रात खळबळ उडाली. मग त्यांनी त्याचं बारसं पहिलं विश्व मराठी संमेलन असं केलं. शिवाय त्याच्या अध्यक्षपदी गंगाधर पानतावणे या अजातशत्रू समीक्षकाची निवड करून अनेकांना गप्प केलं. नंतर महाराष्ट्रातल्या संमेलनालाही पैसा मिळतोय हे पाहून महाबळेश्वरलाही 82 वं संमेलन जाहीर करून टाकलं. पण आधीच त्यांच्या चौफेर हल्ल्यानं मराठी साहित्य विश्व घायाळ झाल्यानं त्यानं या संमेलनाची नीट दखलही घेतली नाही. त्यामुळे पुन्हा कौतिकरावच सगळीकडे मिरवत राहिले.

संमेलन अमेरिकेत घेण्यावरून गदारोळ करणार्‍यांनी मात्र नामदेव ढसाळांनी मुंबईत भरवलेल्या दुसर्‍या जागतिक साहित्य संमेलनाकडं फिरकण्याचंही सौजन्य दाखवलं नाही. 26 डिसेंबरला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि सगळंच कोलमडलं. त्यात फेब्रुवारीत मालगुंडला होणारं कोकण मराठी साहित्य परिषदेचं तर रत्नागिरीला डिसेंबरमध्ये होणारं शारदा साहित्य संमेलन रद्द झालं. एकीकडे संमेलनाचं महाभारत संपतं न संपतं तोच नाट्य संमेलनाच्या जागरण-गोंधळालाही नाट्य परिषदेचे मोहन जोशी यांनी सुरुवात केली. वामन केंद्रे यांचा अर्जच अवैध ठरवून नाट्य परिषेदनं विश्वास मेहेंदळे आणि रामदास कामत या दोन पर्यायातून अपेक्षेप्रमाणे रामदास कामत यांची निवड केली. आणि संगीत रंगभूमीवर काम करणार्‍यांच्या आशा पालवल्या. हे संमेलन आता जानेवरीत बीडला होतंय. या संमेलनाच्या महाभारताशिवाय मराठी साहित्य विश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडीत उल्लेख करावा लागेल तो दिवाळी अंकांच्या शताब्दीचा. 1909 साली काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी मासिक मनोरंजनचा पहिला दिवाळी अंक काढून सुरू केलेल्या एका वैभवशाली परंपरेला या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली. दरवर्षी मराठीत निघणारे 300-350 दिवाळी अंक मराठी सांस्कृतिक परंपरेचा भाग झाली आहेत. पुरस्कार

भारतरत्नमहान शास्त्रीय गायक, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांना यंदाचा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जाणारा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. या बातमीनं सार्‍या महाराष्ट्राला आनंद आणि आश्चर्याचा सुखद धक्का दिला. भारतरत्न या सर्वोच्च सन्मानानं गौरविले जाणारे पंडित भीमेसन जोशी हे महाराष्ट्राचे सातवे रत्न ठरले. हा सन्मान म्हणजे भारतीय अभिजात संगीताचा सन्मान असल्याचं पंडितजी म्हणाले

ज्ञानपीठ पुरस्कारकोकणी साहित्यिक रवींद्र केळेकर यांना यंदाच्या ज्ञानपीठ पुरस्कारनं गौरवण्यात आलं. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणी भाषेचा दर्जा सुधारावा आणि ती भाषा जनमान्य होण्यासाठी सातत्यानं लिखाण करून उत्तम कोकणी साहित्याची निर्मिती केळेकरांनी केली होती. त्याचा या पुरस्काराच्या रूपानं सन्मान झाल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र भूषणगेली सहा दशके आनंदगाणे पसरविणारे ज्येष्ठ कवी मंगेश पाडगांवकर आणि ज्येष्ठ निरूपणकार नारायण विष्णू ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले. मंगेशाचे युग या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे हस्ते मंगेश पाडगावकरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आयुष्य वेचणारे नानासाहेब धर्माधिकारी हेही पुरस्कारेच मानकरी. नानासाहेबांचं निधन झाल्यानं, त्यांच्या मुलानं म्हणजे आप्पा धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार पेण इथं झालेल्या कार्यक्रमात स्वीकारला. मॅगसेसे पुरस्कारवैद्यकीय सेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आदिवासींच्या जीवनात प्रकाशाची ज्योत पेटविणारे डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे या परोपकारी दाम्पत्याला यंदाचा प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे दिवंगत बाबा आमटे यांनादेखील आयुष्यभर कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या सामाजिक कार्यासाठी हाच पुरस्कार 1985 साली प्राप्त झाला होता.

पद्म पुरस्कारपद्म पुरस्काराचे मानकरी

1. आशा भोसले - प्रख्यात पार्श्वगायिका2. सचिन तेंडुलकर - किक्रेटपटू3. प्रणव मुखर्जी - परराष्ट्र मंत्री4. डॉ. वसंत गोवारीकर - ख्यातनाम शास्त्रज्ञ5. नारायण मूर्ती - इन्फोसिसचे सर्वेसर्वा6. के.व्ही कामत - सीईओ, आयसीआयसीआय7. विक्रम पंडित - सीईओ, सिटी ग्रुप8. डॉ. तात्याराव लहाने - प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक9. भवरलाल जैन - जैन उद्योग समूह10 . राजदीप सरदेसाई - मुख्य संपादक, सीएनएन आयबीएन11. रतन टाटा - अध्यक्ष, टाटा उद्योग समूह12. माधुरी दीक्षित - अभिनेत्री13. सुखदेव थोरात - अध्यक्ष, युजीसी14. बाबा कल्याणी - उद्योजक

रिवाइंड 2008 - सामाजिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा

रिवाइंड 2008 - श्रद्धांजली पहाण्यासाठी येथे क्लिक करा

रिवाइंड 2008 - दहशतवादाचा भस्मासूर पहाण्यासाठी येथे क्लिक करा

रिवाइंड 2008 - राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा

First published: December 29, 2008, 2:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या