माझं शहर, माझी माणसं- भाग 1

देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मुंबईनं अनुभवला. अंदाधुंद गोळीबार आणि ग्रेनेडनं बॉम्बस्फोट करुन 183 जणांचे जीव दहशतवाद्यांनी घेतले तर जखमींची संख्या 294 वर गेली. एकाएकी झालेल्या या हल्ल्यामुळे मुंबईकर घाबरले. सुरुवातीला काय झालंय, हे कोणालाही कळायला मार्ग नव्हता.नंतर ताज, ओबेरॉय आणि नरिमन हाऊस अतिरेक्यांनी वेठीस धरल्याची माहिती पुढे आली. तब्बल 60 तासांच्या एनएसजी कमांडो आणि लष्कराच्या कारवाईनंतर मुंबई दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त झाली. तीन दिवसानंतर मुंबईनं मोकळा श्वास घेतला. पण त्यासाठी 14 पोलिसांचं बलिदान द्यावं लागलं.' माझं शहर, माझी माणसं' या विशेष कार्यक्रमात आयबीएन- लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी कॅफे लिओपोल्ड, ताज हॉटेल, सीएसटी स्थानक, मेट्रो थिएटर, नरिमन हाऊस ते ओबेरॉय हॉटेल परिसरात भेटी देऊन निधड्या छातीनं दहशतवाद्यांना सामोर्‍या गेलेल्या मुंबईकरांच्या मनाचा वेध घेतला.बुधवार. तारीख 26 नोव्हेंबर. रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी कुलाब्यातील कॅफे लिओपोल्ड परिसरात पहिल्यांदा गोळीबार झाला. त्या दिवसाबद्दल सांगताना निशिकांत पाठक म्हणतात, दोन दिवस फक्त गोळ्यांचे आवाज ऐकतोय. अतिरेक्यांना अजिबात घाबरणार नाही. मी मुंबईकर आहे '. पोलिसांना अजिबात सुरक्षा दिली जात नाही, असं जवळच्या पोलीस कॉलनीत राहणारी मुलं सांगत होती. अतिरेक्यांविरुद्ध एनएसजी आणि लष्कराच्या सुरू असलेल्या ऑपरेशनची मिनिटागणिक माहिती देणार्‍या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांची भेट निखिल वागळे यांनी ताज हॉटेल बाहेर घेतली. ' माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतला हा माझा पहिला थरारक अनुभव. जे दिसतंय ते रिपोटिर्गआम्ही करतोय ', असं आयबीएन लोकमतचा रिपोर्टर महेंद्र मोरे यावेळी म्हणाला. तिथेच जखमी लोकांची मदत करणारा घनश्याम भेटला. ' काहीतरी करावसं वाटतंय. संकटकाळी कोणाच्या मदतीला धावावसं वाटतंय ', असं घनश्याम सहज म्हणून गेला. प्राणाची बाजी लावून ताजची आग विझवणारे फायर बिग्रेडचे जवान गेट वे जवळ उभे होते. ' कुठल्याही बुलेट प्रुफ जॅकेटशिवाय आम्ही काम करत होतो. लष्करी जवानांनी आमचं कौतुक केलं आहे. हॉटेलात काम करताना काही प्रसंग आमच्या जीवावर बेतणारं होते.आम्हालाही आता बॉम्बचं डिफ्युजचं ट्रेनिंग दिलं पाहिजे', असं बी.आर. तांबेकर सांगत होते. पुढचा टप्पा होता सीएसटी स्टेशन. टाइम्स ऑफ इंडियाचे फोटोग्रॉफर श्रीराम वेर्णेकर यांनी जीवाची बाजी लावून अतिरेक्यांचा फोटो काढला. तो अनुभव त्यांनी सांगितला. सीएसटी स्थानकात अतिरेक्यांनी घातलेल्या हैदोसानंतर आयबीएन सेव्हनचे मुंबई ब्युरो चीफ संजय सिंग यांनी तिथे रिपोटिर्ग केलं. एक न फुटलेल्या ग्रेनेडजवळ त्यांनी उभं राहून त्यांनी रिपोटिर्ग केलं.नंतर तो बॉम्ब डिफ्युज केला. ' खरी बातमी मिळवण्यासाठी रिस्क घ्यावीच लागते. 93 सालचे बॉम्बस्फोट मी पाहिले पण हा हल्ला फार वेगळा होता ', असं संजय सिंग सांगत होते. मेट्रो थिएटरजवळ पोलिसांची व्हॅन हायजॅक करुन इथे मीडियावर हल्ला झाला होता. ' पोलिसांची गाडी पाहून आम्हाला हुरुप आला. आम्ही गाफील राहिलो.त्या गाडीतून धडाधड गोळ्या आमच्यावर झाडल्या गेल्या.आम्ही खाली झोपलो. त्यात एक कॅमेरामन जखमी झाला ', असं आयबीएन लोकमतचा रिपोर्टर उदय जाधवनं सांगितलं. नरिमन हाऊस. अतिरेक्यांनी तळ बनवलेली आणखी एक इमारत. कारवाईसाठी या इमारतीच्या शेजारील रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं होतं. दोन दिवसांपासून ती लोक बाहेर होती. गोळ्या चालल्या की फटाके फुटाले, याबाबत कोणालाच सुरुवातीला कल्पना नव्हती. घरापासून दूर असलेला चुणचुणीत मुलगा जेरॉम जोसेफ म्हणाला, आधी आम्हाला वाटलं की हा एक व्हिडिओ गेम आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी सगळया मुलांना मिलिटिरीमध्ये टाकलं पाहिजं.मी सुद्धा मिलिटरीमध्ये जाणार आहे '.शेवटी निखिल वागळे पोहचले ओबेरॉय हॉटेल परिसरात. दहशतवादी हल्ल्यानंतर झालेलं नुकसान पाहण्याकरता तिथे गर्दी होत आहे. त्या लोकांच्या जमावालाच निखिल वागळे यांनी विचारलं, दहशतवाद्यांच्या हल्ल्यांनी तुम्ही घाबरलात का ? सर्वांनी एका आवाजात सांगितलं, आम्ही घाबरलेला नाही. घाबरण्यासारखं काहीच नाही '. कॅफे लिओपोल्ड ते ओबेरॉय या प्रवासात अनेक मुंबईकरांनी त्यांचे अनुभव सांगितले. हे शहर विस्कटलं असलं तरी उद्धवस्त झालेलं नाही. माणसं जखमी झाली असली तरी हार मानण्यास तेतयार नाहीत. हे शहर पुन्हा उभंच राहणार नाही तर वेगानं धावायला लागणार आहे, असं सांगत निखिल वागळे यांनी कार्यक्रमाचा शेवट केला.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Dec 2, 2008 11:35 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2008 11:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...