दरी सांधताना... भाग 1

गेले काही दिवस महाराष्ट्रातलं वातावरण गढूळ झालं आहे. लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे. मराठी लोकांना असं वाटतंय की, आमच्यावर अन्याय होत आहे. अमराठी लोकांना असं वाटतंय की आमच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे एकूण एक दरी निर्माण झाली आहे. ही दरी कशामुळे निर्माण झाली आहे, निर्माण झालेली दरी सांधता येईल का, आपण सगळे एकत्र राहू शकतो का, या निर्माण झालेल्या प्रश्नांवर आपल्याकडे काही उपाय आहेत का, या सगळ्याचा शोध ' दरी सांधताना...' या कार्यक्रमातून आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतला. ' दरी सांधताना...' या 'आयबीएन-लोकमत ' च्या कार्यक्रमात जाणीवपूर्वक राजकारण्यांना बोलावण्यात आलं नव्हतं. राजकारणी प्रत्येक प्रश्नामध्ये तेल ओततात, आग भडकवतात आणि साध्या साध्या माणसांचे कोळसे किंवा निखारे करून टाकतात. ते 'आयबीएन- लोकमत ' ला टाळायचं असल्यामुळे कार्यक्रमात समाजाविषयी ज्यांना प्रेम आहे, ज्यांना समाजाविषयी काहीतरी करायचं आहे, ज्यांना समाजाविषयी काहीतरी कळकळ आहे, जे आपआपल्या क्षेत्रात खूप चांगली कामगिरी करून आहेत, अशांना या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. यशस्वी उद्योजक आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे संचालक टी.समीर, सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका चित्रा पालेकर, ' पुकार ' संस्थेच्या संचालिका अनिता पाटील-देशमुख, मेजर कृष्णेंदू सरकार, पत्रकार संयोगिता ढमढेरे, मल्याळम् असून स्वत:ला मुंबईकर म्हणवणारे आणि टेलिव्हिजन तसंच सिनेेमा क्षेत्राशी संबंधित जिबू रामचंद्रन, हिंदी भाषिक असूनही मुंबईत मराठी व्याख्यनमाला यशस्वीपणे चालवणारे साहित्यिक आणि अनुवादक रमेश यादव, मुंबईतील 92 दंगलीनंतर सर्वांना शांततेचा, सहिष्णुतेचा संदेश देणारे टॅक्सीचालक ग्यानसिंग यादव आणि 'आयबीएन 7' या हिंदी चॅनेलचे मुंबई ब्युरो चीफ संजय सिंग यांना ' दरी सांधताना...' मध्ये आंमत्रित करण्यात आलं होतं. निखिल वागळे - रोज कुठून तरी कुठलाही नेता मग तो महाराष्ट्रातला असो की,महाराष्ट्राबाहेरचा, काही तरी वक्तव्य करतो. त्यांच्या वक्तव्यामुळे लोकांची मनं भडकतात. दगडफेक होते, जाळपोळ होते, हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं ? संयोगिता ढमढेरे - 21 व्या शतकात भाषेच्या प्रश्नावरून असं काही व्हावं आणि मुंबईसारख्या शहरात होतंय, याचा मला सर्वात त्रास होतो. करिअरच्या निमित्तानं मी पुण्याहून मुंबईत आले होते. त्यावेळी मुंबईने आपलंसं केलं होतं. मी पंजाबी, मल्याळी घरांत राहिले होते. त्यावेळी मला मुंबईचं कॉस्मोपॉलिटन रूप आवडलं होतं. 1992 च्या दंगलीनंतर ब-याच वर्षांनी मुंबईतलं वातावरण पूर्ववत येत होतं. पण भाषिकतेच्या मुद्द्यावरून परत या मुंबईच्या मनावर ओरखडा आलेला आहे. ग्यानसिंग यादव - अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा वाईट वाटतं. लोकांनी मिळून मिसळून रहावं, असं खूप वाटतं. कारण खूपदा अशा घटनांत निरपराध लोकांचे बळी जातात. ही सर्वात भीषण गोष्ट आहे.टी. समीर - जेव्हा मी एखाद्या टॅक्सी वा रिक्षात बसून प्रवास करतो तेव्हा तिचा चालक युपीचा आहे की बिहारचा हा प्रश्नच मनाला शिवत नाही. हाच तर खरा या मुंबईचा डीएनए आहे. जेव्हा टीव्ही चॅनेल्सवर अशा घटना राजकारणी लोक तिखट-मीठ लावून सांगतात तेव्हा टीव्हीवर काय दाखवलं जातंय आणि वस्तुस्थिती काय आहे, याची कल्पना येते. किशोरी शहाणे - या गोष्टी मनाला न पटणार्‍या आहेत. हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. अनेकांच्या करियरसाठी मुंबई हे प्लेटफॉर्म आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना माझे सहकलाकार, कॅमेरामॅन, लेखक कुठल्या जातीचे, भाषेचे ते मी पाहत नाही. अनिता पाटील-देशमुख - हे सगळं पाहिल्यावर सर्वात आधी भीती वाटते. आपल्या लोकशाहीच्या मुळावर घाला घातला जातोय. मुंबईतील परप्रांतीय संपावर गेले तर हे शहर चालेल, का ? असा प्रश्न मनात येतो. चित्रा पालेकर - ही माझी मुंबई नाही, असंच वाटतं. मुंबईतील परिस्थितीबाबत बोलताना, मेजर कृष्णेंदू सरकार म्हणाले, लष्करात अनेक प्रांताचे लोक असतात. मी मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. मग मला लष्कारातले मित्र विचारतात, तू मराठी आहेस का ? तर मी सांगतो बंगाली आहे. मुंबई कशी आहे, विचारतात. मी सांगतो हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. रात्री कधीही फिरू शकतात. पण आता सुट्टीनंतर लष्करात परतल्यावर हे मी सांगणार नाही. ' दरी सांधताना ' च्या दुसर्‍या भागात मिक्स फॅमिली वर चर्चा करण्यात आली. जिबू रामचंद्रन हे मूळचे केरळचे पण त्यांची बायको महाराष्ट्रीय. याबाबत ते म्हणाले, मी मराठी कल्चरमध्ये वाढलो आहे. माझ्या बायकोकरता ते नवीन होतं. पण केरळात गेल्यावर तिनं तिथल्या संस्कृतीला आपलसं केलं. इव्हेंट मॅनेजर असलेले टी.समीर यांची बायको पंजाबी. पण शिक्षण मुंबईत. त्यामुळे आमच्या घरातील संस्कृतीला तिनं लवकरच अ‍ॅडॅप्ट केलं, असं समीर यांनी सांगितलं.अभिनेत्री किशोरी शहाणे यांनीही त्यांचा अनुभव सांगितला. मेजर कृष्णेंद्रू सरकार आणि संयोगिता ढमढेरे हे बंगाली -मराठी जोडपं. ' सुरूवातीपासून मला बंगाली भाषेची आवड होती. त्यामुळे कुष्णेंद्रूच्या घरामध्ये मला कोणतीही अडचण आली नाही. माझा कॉलम वाचण्यासाठी सासू मराठी शिकल्या होत्या, असं संयोगिता यांनी सांगितलं.मराठी संस्कृतीत वाढलेले रमेश यादव म्हणाले, परळ, लालबाग, चिंचपोकळी भागात मी फिरलो आहे. सामाजिक कार्याशी माझी नाळ जोडलेली आहे. मला मराठी संस्कृतीनं कधी वेगळं मानलं नाही '. पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेले आयबीएन सेव्हनचे मुंबई ब्युरो चीफ संजय सिंग म्हणाले, मी अमराठी आहे, असं कधी वाटलं नाही. सगळ्या सणात मी सहभागी होतो. सुरूवातीला कोणी ' भैया ' म्हटलं की विचित्र वाटायचं पण नंतर ही एक बोलण्याची पद्धत असल्याचं ध्यानी आलं '. मराठी आणि अमराठीमधील दरी वाढवण्यास कोण जबाबदार आहे ? राजकारणी, बाहेरून येणारे लोंढे की भाषा आणि संस्कृती. या निखिल वागळेंच्या थेट प्रश्नावर आंमत्रित पाहुण्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. यावर अनिता पाटील- देशमुख म्हणाल्या, बाहेरून येणारे लोंढे जबावदार नाहीत. परप्रांतीय मिळेल, त्या पैशात काम करतात. मराठी माणूस करेल का ?'. टी. समीर यांनी सांगितलं, टँलेंट आणि मेहनत करण्याची इच्छा असेल तर कुठलाही जॉब मिळू शकतो. बाहेरील राज्यातून येणारी मुले स्ट्रगल करण्यात पुढे असतात. मुंबईकर त्यात मराठी आणि अमराठीही. मुंबईकरांनी कॉम्पिटिटिव्हनेस वाढवला पाहिजे '. संयोगिता यांनी चर्चेत वेगळा मुद्दा मांडला.' मराठी संस्कृती लयाला जातेय, याचं भांडवल राजकारण्यांनी केलं आहे. इतर राज्यातील नागरिकांचं स्थलांतर सर्वत्रच होतं. बाहेरून आलेले लोंढे हा राजकारण्यांनी तयार केलेला हा प्रश्न आहे ', असं संयोगिता म्हणाल्या.मुंबईत येणारे लोंढे थांबले पाहिजे.कुठेतरी सीमा ठरवली पाहिजे, असं रमाकांत उपाध्याय यांनी सांगितलं. ते कल्याणला राहणारे असून बँकेत ते 25 वर्ष कार्यरतआहेत. बँकेत ते एकमेव उत्तर भारतीय आहेत.' असं उपाध्याय म्हणाले.यावर अनिता पाटील- देशमुख म्हणाल्या, तुम्ही बाहेरुन येणार्‍या लोढ्यांना नाकारता. जर तुम्ही दुसर्‍या राज्यात गेला आणि नाकारलं गेलं तर ? असा प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत प्रेक्षकांमधून नितीन खोट यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला.' मुंबईत फक्त गरिबांचे लोंढे येत नसतात तर टॉवरमध्ये राहणार्‍या श्रीमंतांचेही लोंढे येत असतात. त्यांना सुविधा पुरवल्या जातात. दंगली होतात, तेव्हा सामान्य मुंबईकरांच्या घरांचं नुकसान होतं, असं खोट म्हणाले. या सर्व प्रकरणाला मीडिया जबाबदार आहे का ? विशेषत: हिंदी मीडिया. यावर आयबीएन सेव्हनचे मुंबई ब्युरो चीफ संजय सिंग म्हणाले, हो. हिंदी मीडिया जबाबदार आहे. काही गोष्टी मोठ्या करुन दाखवण्यात येतात. टॅक्सी तोडफोडीची दृश्य पुन्हा पुन्हा दाखवली जातात. दिल्ली आणि नोएडा ऑफिसमधून ती दृश्य दाखवण्यास भाग पाडलं जातं पण काही अंशी समाजही याबाबत दोषी आहे. एखाद्या गावच्या विकासाची बातमी दाखवली तर ती बघणार नाही पण तोडफोडीची बातमी दाखवली तर वारंवारं बघतात '. याबाबत किशोरी शहाणे म्हणाल्या, जे विकलं जातंय तेच दाखवलं जातंय. काही लोकांना ते पाहायला आवडतं.'मराठी- अमराठीमधील दरी कशी सांधायची, यावर काही उपाय आहे का ? यावर मेजर कृष्णेंदू सरकार यांनी जुन्या काळाचं महत्त्व सांगत मराठी- अमराठीमध्ये जिव्हाळा निर्माण होणं गरजेचं आहे.' मला जुने दिवस आठवतात, माझ्या आईची मैत्री शेजारच्या काकूशी होती. मला कोणी मराठी शीक, असं सांगितलं नव्हतं. शेजारच्या घरातील रांगोळी, पुरणपोळी, आकाश कंदील तेच शिकत शिकत मी पुढे आलो. त्याकाळातही नेते होते, मीडिया होता पण आमचं कधी लक्ष गेलं नाही '. ' दरी सांधताना ' च्या माध्यमातून आयबीएन लोकमतच्या व्यासपीठावर मराठी-अमराठी एकत्र आले. एक दरी सांधली गेली. अनेकांनी स्वत:ची मत ठामपणे मांडली. उत्तर भारतीय शुद्ध मराठीत बोलत होते.महाराष्ट्राच्या संस्कृतीशी त्यांचं झालेलं अतूट नातं दिसून येत होतं. ही दरी शेवटी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सांधू शकेल, असं मत शेवटी व्यक्त केलं. आयबीएन लोकमत सारख्या मैत्रीच्या व्यासपीठावरून हे प्रयत्न कायम होतील, असं समारोपात संपादक निखिल वागळे म्हणाले.

  • Share this:

गेले काही दिवस महाराष्ट्रातलं वातावरण गढूळ झालं आहे. लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे. मराठी लोकांना असं वाटतंय की, आमच्यावर अन्याय होत आहे. अमराठी लोकांना असं वाटतंय की आमच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे एकूण एक दरी निर्माण झाली आहे. ही दरी कशामुळे निर्माण झाली आहे, निर्माण झालेली दरी सांधता येईल का, आपण सगळे एकत्र राहू शकतो का, या निर्माण झालेल्या प्रश्नांवर आपल्याकडे काही उपाय आहेत का, या सगळ्याचा शोध ' दरी सांधताना...' या कार्यक्रमातून आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतला.

' दरी सांधताना...' या 'आयबीएन-लोकमत ' च्या कार्यक्रमात जाणीवपूर्वक राजकारण्यांना बोलावण्यात आलं नव्हतं. राजकारणी प्रत्येक प्रश्नामध्ये तेल ओततात, आग भडकवतात आणि साध्या साध्या माणसांचे कोळसे किंवा निखारे करून टाकतात. ते 'आयबीएन- लोकमत ' ला टाळायचं असल्यामुळे कार्यक्रमात समाजाविषयी ज्यांना प्रेम आहे, ज्यांना समाजाविषयी काहीतरी करायचं आहे, ज्यांना समाजाविषयी काहीतरी कळकळ आहे, जे आपआपल्या क्षेत्रात खूप चांगली कामगिरी करून आहेत, अशांना या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं. यशस्वी उद्योजक आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे संचालक टी.समीर, सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका चित्रा पालेकर, ' पुकार ' संस्थेच्या संचालिका अनिता पाटील-देशमुख, मेजर कृष्णेंदू सरकार, पत्रकार संयोगिता ढमढेरे, मल्याळम् असून स्वत:ला मुंबईकर म्हणवणारे आणि टेलिव्हिजन तसंच सिनेेमा क्षेत्राशी संबंधित जिबू रामचंद्रन, हिंदी भाषिक असूनही मुंबईत मराठी व्याख्यनमाला यशस्वीपणे चालवणारे साहित्यिक आणि अनुवादक रमेश यादव, मुंबईतील 92 दंगलीनंतर सर्वांना शांततेचा, सहिष्णुतेचा संदेश देणारे टॅक्सीचालक ग्यानसिंग यादव आणि 'आयबीएन 7' या हिंदी चॅनेलचे मुंबई ब्युरो चीफ संजय सिंग यांना ' दरी सांधताना...' मध्ये आंमत्रित करण्यात आलं होतं.

निखिल वागळे - रोज कुठून तरी कुठलाही नेता मग तो महाराष्ट्रातला असो की,महाराष्ट्राबाहेरचा, काही तरी वक्तव्य करतो. त्यांच्या वक्तव्यामुळे लोकांची मनं भडकतात. दगडफेक होते, जाळपोळ होते, हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं ? संयोगिता ढमढेरे - 21 व्या शतकात भाषेच्या प्रश्नावरून असं काही व्हावं आणि मुंबईसारख्या शहरात होतंय, याचा मला सर्वात त्रास होतो. करिअरच्या निमित्तानं मी पुण्याहून मुंबईत आले होते. त्यावेळी मुंबईने आपलंसं केलं होतं. मी पंजाबी, मल्याळी घरांत राहिले होते. त्यावेळी मला मुंबईचं कॉस्मोपॉलिटन रूप आवडलं होतं. 1992 च्या दंगलीनंतर ब-याच वर्षांनी मुंबईतलं वातावरण पूर्ववत येत होतं. पण भाषिकतेच्या मुद्द्यावरून परत या मुंबईच्या मनावर ओरखडा आलेला आहे. ग्यानसिंग यादव - अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा वाईट वाटतं. लोकांनी मिळून मिसळून रहावं, असं खूप वाटतं. कारण खूपदा अशा घटनांत निरपराध लोकांचे बळी जातात. ही सर्वात भीषण गोष्ट आहे.टी. समीर - जेव्हा मी एखाद्या टॅक्सी वा रिक्षात बसून प्रवास करतो तेव्हा तिचा चालक युपीचा आहे की बिहारचा हा प्रश्नच मनाला शिवत नाही. हाच तर खरा या मुंबईचा डीएनए आहे. जेव्हा टीव्ही चॅनेल्सवर अशा घटना राजकारणी लोक तिखट-मीठ लावून सांगतात तेव्हा टीव्हीवर काय दाखवलं जातंय आणि वस्तुस्थिती काय आहे, याची कल्पना येते. किशोरी शहाणे - या गोष्टी मनाला न पटणार्‍या आहेत. हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. अनेकांच्या करियरसाठी मुंबई हे प्लेटफॉर्म आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना माझे सहकलाकार, कॅमेरामॅन, लेखक कुठल्या जातीचे, भाषेचे ते मी पाहत नाही.

अनिता पाटील-देशमुख - हे सगळं पाहिल्यावर सर्वात आधी भीती वाटते. आपल्या लोकशाहीच्या मुळावर घाला घातला जातोय. मुंबईतील परप्रांतीय संपावर गेले तर हे शहर चालेल, का ? असा प्रश्न मनात येतो. चित्रा पालेकर - ही माझी मुंबई नाही, असंच वाटतं. मुंबईतील परिस्थितीबाबत बोलताना, मेजर कृष्णेंदू सरकार म्हणाले, लष्करात अनेक प्रांताचे लोक असतात. मी मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. मग मला लष्कारातले मित्र विचारतात, तू मराठी आहेस का ? तर मी सांगतो बंगाली आहे. मुंबई कशी आहे, विचारतात. मी सांगतो हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. रात्री कधीही फिरू शकतात. पण आता सुट्टीनंतर लष्करात परतल्यावर हे मी सांगणार नाही. ' दरी सांधताना ' च्या दुसर्‍या भागात मिक्स फॅमिली वर चर्चा करण्यात आली. जिबू रामचंद्रन हे मूळचे केरळचे पण त्यांची बायको महाराष्ट्रीय. याबाबत ते म्हणाले, मी मराठी कल्चरमध्ये वाढलो आहे. माझ्या बायकोकरता ते नवीन होतं. पण केरळात गेल्यावर तिनं तिथल्या संस्कृतीला आपलसं केलं. इव्हेंट मॅनेजर असलेले टी.समीर यांची बायको पंजाबी. पण शिक्षण मुंबईत. त्यामुळे आमच्या घरातील संस्कृतीला तिनं लवकरच अ‍ॅडॅप्ट केलं, असं समीर यांनी सांगितलं.अभिनेत्री किशोरी शहाणे यांनीही त्यांचा अनुभव सांगितला. मेजर कृष्णेंद्रू सरकार आणि संयोगिता ढमढेरे हे बंगाली -मराठी जोडपं. ' सुरूवातीपासून मला बंगाली भाषेची आवड होती. त्यामुळे कुष्णेंद्रूच्या घरामध्ये मला कोणतीही अडचण आली नाही. माझा कॉलम वाचण्यासाठी सासू मराठी शिकल्या होत्या, असं संयोगिता यांनी सांगितलं.

मराठी संस्कृतीत वाढलेले रमेश यादव म्हणाले, परळ, लालबाग, चिंचपोकळी भागात मी फिरलो आहे. सामाजिक कार्याशी माझी नाळ जोडलेली आहे. मला मराठी संस्कृतीनं कधी वेगळं मानलं नाही '. पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेले आयबीएन सेव्हनचे मुंबई ब्युरो चीफ संजय सिंग म्हणाले, मी अमराठी आहे, असं कधी वाटलं नाही. सगळ्या सणात मी सहभागी होतो. सुरूवातीला कोणी ' भैया ' म्हटलं की विचित्र वाटायचं पण नंतर ही एक बोलण्याची पद्धत असल्याचं ध्यानी आलं '. मराठी आणि अमराठीमधील दरी वाढवण्यास कोण जबाबदार आहे ? राजकारणी, बाहेरून येणारे लोंढे की भाषा आणि संस्कृती. या निखिल वागळेंच्या थेट प्रश्नावर आंमत्रित पाहुण्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. यावर अनिता पाटील- देशमुख म्हणाल्या, बाहेरून येणारे लोंढे जबावदार नाहीत. परप्रांतीय मिळेल, त्या पैशात काम करतात. मराठी माणूस करेल का ?'. टी. समीर यांनी सांगितलं, टँलेंट आणि मेहनत करण्याची इच्छा असेल तर कुठलाही जॉब मिळू शकतो. बाहेरील राज्यातून येणारी मुले स्ट्रगल करण्यात पुढे असतात. मुंबईकर त्यात मराठी आणि अमराठीही. मुंबईकरांनी कॉम्पिटिटिव्हनेस वाढवला पाहिजे '. संयोगिता यांनी चर्चेत वेगळा मुद्दा मांडला.' मराठी संस्कृती लयाला जातेय, याचं भांडवल राजकारण्यांनी केलं आहे. इतर राज्यातील नागरिकांचं स्थलांतर सर्वत्रच होतं. बाहेरून आलेले लोंढे हा राजकारण्यांनी तयार केलेला हा प्रश्न आहे ', असं संयोगिता म्हणाल्या.

मुंबईत येणारे लोंढे थांबले पाहिजे.कुठेतरी सीमा ठरवली पाहिजे, असं रमाकांत उपाध्याय यांनी सांगितलं. ते कल्याणला राहणारे असून बँकेत ते 25 वर्ष कार्यरतआहेत. बँकेत ते एकमेव उत्तर भारतीय आहेत.' असं उपाध्याय म्हणाले.यावर अनिता पाटील- देशमुख म्हणाल्या, तुम्ही बाहेरुन येणार्‍या लोढ्यांना नाकारता. जर तुम्ही दुसर्‍या राज्यात गेला आणि नाकारलं गेलं तर ? असा प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत प्रेक्षकांमधून नितीन खोट यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला.' मुंबईत फक्त गरिबांचे लोंढे येत नसतात तर टॉवरमध्ये राहणार्‍या श्रीमंतांचेही लोंढे येत असतात. त्यांना सुविधा पुरवल्या जातात. दंगली होतात, तेव्हा सामान्य मुंबईकरांच्या घरांचं नुकसान होतं, असं खोट म्हणाले. या सर्व प्रकरणाला मीडिया जबाबदार आहे का ? विशेषत: हिंदी मीडिया. यावर आयबीएन सेव्हनचे मुंबई ब्युरो चीफ संजय सिंग म्हणाले, हो. हिंदी मीडिया जबाबदार आहे. काही गोष्टी मोठ्या करुन दाखवण्यात येतात. टॅक्सी तोडफोडीची दृश्य पुन्हा पुन्हा दाखवली जातात. दिल्ली आणि नोएडा ऑफिसमधून ती दृश्य दाखवण्यास भाग पाडलं जातं पण काही अंशी समाजही याबाबत दोषी आहे. एखाद्या गावच्या विकासाची बातमी दाखवली तर ती बघणार नाही पण तोडफोडीची बातमी दाखवली तर वारंवारं बघतात '. याबाबत किशोरी शहाणे म्हणाल्या, जे विकलं जातंय तेच दाखवलं जातंय. काही लोकांना ते पाहायला आवडतं.'

मराठी- अमराठीमधील दरी कशी सांधायची, यावर काही उपाय आहे का ? यावर मेजर कृष्णेंदू सरकार यांनी जुन्या काळाचं महत्त्व सांगत मराठी- अमराठीमध्ये जिव्हाळा निर्माण होणं गरजेचं आहे.' मला जुने दिवस आठवतात, माझ्या आईची मैत्री शेजारच्या काकूशी होती. मला कोणी मराठी शीक, असं सांगितलं नव्हतं. शेजारच्या घरातील रांगोळी, पुरणपोळी, आकाश कंदील तेच शिकत शिकत मी पुढे आलो. त्याकाळातही नेते होते, मीडिया होता पण आमचं कधी लक्ष गेलं नाही '. ' दरी सांधताना ' च्या माध्यमातून आयबीएन लोकमतच्या व्यासपीठावर मराठी-अमराठी एकत्र आले. एक दरी सांधली गेली. अनेकांनी स्वत:ची मत ठामपणे मांडली. उत्तर भारतीय शुद्ध मराठीत बोलत होते.महाराष्ट्राच्या संस्कृतीशी त्यांचं झालेलं अतूट नातं दिसून येत होतं. ही दरी शेवटी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सांधू शकेल, असं मत शेवटी व्यक्त केलं. आयबीएन लोकमत सारख्या मैत्रीच्या व्यासपीठावरून हे प्रयत्न कायम होतील, असं समारोपात संपादक निखिल वागळे म्हणाले.

First published: November 17, 2008, 10:16 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading