दिलीप देशमुखांना मंत्रीपद

दिलीप देशमुखांना मंत्रीपद

1 मार्च मुंबईअखेर विलासराव देशमुखांची नाराजी दूर करण्यासाठी त्याचे भाऊ दिलीप देशमुखांना मंत्रीपद देण्याचं काँग्रेस श्रेष्ठींनी ठरवलं. त्यानुसार एका छोटेखानी कार्यक्रमात संध्याकाळी दिलीप देखमुखांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्रीपद सोडलं की दिलीप देशमुखांना मंत्री पद मिळतंअसं आता दुस-यांदा झालं. 2003 मध्ये विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्री पद गेलं आणि सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 25 जानेवारी 2003 रोजी शिंदेंनी दिलीप देशमुखांना राज्यमंत्री पद दिलं. या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. 3 डिसेंबर 2008 रोजी विलासराव देशमुख यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. पण मंत्रिमंडळात दिलीप देशमुख यांचा समावेश झाला नाही. दोन आठवडयापूर्वी नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील आणि नसीम खान यांचा शपथविधी झाला. तेव्हा गोविंदराव आदिक आणि दिलीप देशमुखांचा पत्ता कापला गेला. त्यामुळे विलासराव रुसले. तर गोविंदराव बंडाचा झेंडा फडकावत शरद पवारांकडे गेले. आणि विलासराव आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी अशोक चव्हाणांविरोधात टीका करू लागले. अखेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विलासरावांची नाराजी नको म्हणून काँग्रेस श्रेष्ठी आणि अशोक चव्हाणांनी दिलीप देशमुखांना मंत्री करण्याचा निर्णय घेतला. आता मंत्रीपद मिळाल्यानंतरही दिलीप देशमुखांना कोणतं खातं मिळतं याबद्दल उत्सुकता लागली आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2009 02:02 PM IST

ताज्या बातम्या