ईशान्य भारतीयांवर हल्ल्याप्रकरणी दोन हल्लेखोरांना अटक

ईशान्य भारतीयांवर हल्ल्याप्रकरणी दोन हल्लेखोरांना अटक

17 ऑगस्टपुण्यात ईशान्य भारतीयांवर हल्ल्यांप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. त्यामुळे याप्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता 15 झाली आहे. ईशान्य भारतीय नागरिकांन्साठी पोलिसांनी आज एका खास कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी कोणीही शहर सोडून जाऊ नये असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे. तसेच फेसबुक, गुगल आणि ट्विटर या वेबसाईट्सनंही आक्षेपार्ह व्हिडिओ आपल्या साईट्सवर काढून टाकल्याची माहिती पुण्याचे सहपोलीस आयुक्त संजीव सिंघल यांनी दिली आहे. दरम्यान, पुण्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ईशान्य भारतात परतत आहेत त्यांनी जाऊ नये असं आवाहन करण्यासाठी मणिपूरहून एक आमदार पुण्यामध्ये दाखल झालेत. त्यांचं स्वत:चही शिक्षण पुण्यामध्ये झालंय. पुण्यासारखं दुसरं सुरक्षित शहर कुठलंही नाही फक्त अफवांमुळे भीती पसरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरु जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलंय.

  • Share this:

17 ऑगस्ट

पुण्यात ईशान्य भारतीयांवर हल्ल्यांप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. त्यामुळे याप्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता 15 झाली आहे. ईशान्य भारतीय नागरिकांन्साठी पोलिसांनी आज एका खास कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी कोणीही शहर सोडून जाऊ नये असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे. तसेच फेसबुक, गुगल आणि ट्विटर या वेबसाईट्सनंही आक्षेपार्ह व्हिडिओ आपल्या साईट्सवर काढून टाकल्याची माहिती पुण्याचे सहपोलीस आयुक्त संजीव सिंघल यांनी दिली आहे. दरम्यान, पुण्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ईशान्य भारतात परतत आहेत त्यांनी जाऊ नये असं आवाहन करण्यासाठी मणिपूरहून एक आमदार पुण्यामध्ये दाखल झालेत. त्यांचं स्वत:चही शिक्षण पुण्यामध्ये झालंय. पुण्यासारखं दुसरं सुरक्षित शहर कुठलंही नाही फक्त अफवांमुळे भीती पसरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरु जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2012 11:17 AM IST

ताज्या बातम्या