नाराज आठवलेंची उद्धव ठाकरे काढणार समजूत

22 मार्चयुतीकडून राज्यसभा उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांची खुद्द शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आता समजूत घालणार आहे. त्यासाठी येत्या दोन-तीन दिवसात उद्धव ठाकरे रामदास आठवलेंची भेट घेणार आहेत. राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने रामदास आठवले यांनी काल बुधवारी आयबीएन लोकमतच्या 'प्राईम टाईम बुलेटीन'कार्यक्रमात उघड नाराजी व्यक्त केली होती. आमची नेहमीच फसवणूक झाली. उद्धव ठाकरेंनी भरलेलं ताट देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे यापुढची वाटचाल करार करुनच होईल असंही त्यांनी सांगितलं होतं. आरपीआयच्या नेत्यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. महायुतीतला तणाव निवळण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय या भेटीत घेण्यात आला. यापुढे युतीशी 'अग्रीमेंट'- आठवले

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2012 05:21 PM IST

नाराज आठवलेंची उद्धव ठाकरे काढणार समजूत

22 मार्च

युतीकडून राज्यसभा उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांची खुद्द शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आता समजूत घालणार आहे. त्यासाठी येत्या दोन-तीन दिवसात उद्धव ठाकरे रामदास आठवलेंची भेट घेणार आहेत. राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने रामदास आठवले यांनी काल बुधवारी आयबीएन लोकमतच्या 'प्राईम टाईम बुलेटीन'कार्यक्रमात उघड नाराजी व्यक्त केली होती. आमची नेहमीच फसवणूक झाली. उद्धव ठाकरेंनी भरलेलं ताट देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे यापुढची वाटचाल करार करुनच होईल असंही त्यांनी सांगितलं होतं. आरपीआयच्या नेत्यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. महायुतीतला तणाव निवळण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय या भेटीत घेण्यात आला.

यापुढे युतीशी 'अग्रीमेंट'- आठवले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2012 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...