लोकपालवर उद्या चर्चा ; अण्णा उपोषण सोडणार ?

26 ऑगस्टअखेर लोकपालवर संसदेत उद्या चर्चा होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी उद्या सकाळी 11 वाजता लोकसभेत निवेदन करतील. नियम 193 नुसार चर्चा होणार आहे. त्यात मतदानाचा समावेश नाही. भाजपने आज जनलोकपालमधील काही मुद्द्यांना पाठिंबा दिला. अण्णांच्या तीन प्रमुख मागण्यांवर संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी भाजपने केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रस्थानी आणल्याबद्दल अण्णा हजारेंचं कौतुक केलं. पण अण्णांच्या आंदोलनावर टीका करून वादही निर्माण केला.लोकपालवर संसदेत उद्या कलम 193 नुसार चर्चा होणार आहे. त्यात मतदानाचा समावेशासह चर्चा उद्या होणार असल्यामुळे अण्णांचं उपोषणही लांबलंय. भाजपने आज जनलोकपालमधील काही मुद्द्यांना पाठिंबा दिला. अण्णांच्या तीन प्रमुख मागण्यांवर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी भाजपने केली. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींनी अण्णांच्या उपोषणाच्या 11 व्या दिवशी आपलं मौन सोडलं. अण्णांपर्यंत पोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लोकपालच्या मुद्द्यावर राहुल यांनी भाष्य केलं. तसेच अण्णांच्या आंदोलनाचं कौतुकही केलं. पण अण्णांच्या आंदोलनावर टीकाही केली.सर्वांनाच भ्रष्टाचार निपटून काढायचा आहे. मात्र याला सक्षम कार्यक्रमाची आवश्यकता आहे. बर्‍याच लोकांना असं वाटतं की एका विधेयकानं भ्रष्टाचार समाप्त होईल. पण मला शंका आहे. नव्या कायद्याची गरज आहे. पण केवळ लोकपाल विधेयकानं भ्रष्टाचार समूळ नष्ट होईल असं वाटत नाही. हे विधेयक त्यावर पुरेसा उपाय नाही. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती करण्याचं मोठ काम केलं. मी त्यांना धन्यवाद देतो. पण त्यापेक्षाही मोठी पावलं उचलण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्याकरता निवडणूक आयोगासारखी स्वतंत्र यंत्रणा हवी, असंही ते म्हणाले. अण्णांचं आंदोलन संसदेवर अधिकार गाजवल्याने लोकशाहीला घातक असंच आहे, असंही ते म्हणाले.राहुल गांधींच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी मोठा गदारोळ केला. पंतप्रधान गोंधळ पाहत होते. तर राहुलची यंग ब्रिगेड राहुल यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. या गदारोळातच राहुल यांनी निवडणूक आयोगासारखाच घटनात्मक दर्जा लोकपालला द्यावा अशी सूचनाही केली.राहुल गांधी आपली बाजू उचलून धरतील अशी टीम अण्णांना अपेक्षा होती. पण राहुल यांच्या वक्तव्यांमुळे त्यांना धक्का बसला. त्यानंतर लगेचच राहुल यांच्या घराला घेराव घालण्यात आला. राहुल यांच्या वक्तव्यानंतर भाजपने आपली भूमिका बदलली. आणि जनलोकपाल विधेयकावर आतापर्यंत ठाम नसणार्‍या भाजपने काही अटींसह जनलोकपालाच्या बाजूनं आपलं वजन टाकण्याचा निर्णय घेतला. आणि मतदानासह चर्चा व्हावी, यासाठी दोन्ही सभागृहांत नोटीस दिली. सरकारने मतदानासह चर्चा करण्याचा भाजपचा प्रस्ताव नाकारला. नियम 193 अंतर्गत शनिवारी चर्चेची तयारी सरकारने दाखवली. शनिवारी सकाळी 11 वाजता प्रणव मुखर्जी संसदेत निवेदन करतील. त्यानंतर सरकार चर्चेसाठी पुढाकार घेईल.पंतप्रधानांनी आश्वासन दिल्याप्रमाणे शुक्रवारी संसदेत चर्चा होईल अशी आशा होती. पण सरकारने घोळ घालत शुक्रवारचा दिवस घालवला. आता शनिवारी ठरल्याप्रमाणे चर्चा होऊन अण्णांचे उपोषण बाराव्या दिवशी तरी सुटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.दरम्यान, गोपीनाथ मुंडे आणि अनंतकुमार यांनी आज रामलीला मैदानावर जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. संसदेत जनलोकपाल विधेयकावर भाजपची भूमिका काय आहे ते त्यांनी अण्णांपुढे स्पष्ट केलं. नियम 184 अन्वये चर्चा करून सक्षम लोकपाल आणण्याची भाजपची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजपचा अण्णांना पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितले. टीम अण्णा, भाजप आणि सरकार यांच्यातील तीन मतभेदाचे मुद्दे 1. सर्व अधिकारी लोकपालाच्या कक्षेत टीम अण्णा - कनिष्ठ अधिकारीही लोकपालाच्या कक्षेत आणावेतकाँग्रेस - नाही, फक्त वरिष्ठ अधिकारीच भाजप - हो, पण काही अटींवर2. लोकायुक्ताचा मुद्दाटीम अण्णा - सर्व राज्यांत लोकायुक्त नेमाकाँग्रेस - नाही, त्यामुळे संघराज्याच्या तत्वाला धोका निर्माण होईलभाजप - हो, सर्व राज्यांत लोकायुक्त असावेत3. सिटीझन्स चार्टरटीम अण्णा - विशिष्ट मुदतीत काम संपवण्याचे बंधन अधिकार्‍यांवर असावेकाँग्रेस - नाही, हा मुद्दा लोकपालाच्या कक्षेत नसावाभाजप - हो, कामासाठी विशिष्ट मुदतीचं बंधन हवे सरकारच्या 5 चुका 1. मसुदा समितीत विरोधी पक्षांना न घेणे, त्यांच्याशी चर्चा न करणे2. अण्णांच्या पसंतीच्या ठिकाणी उपोषणाला परवानगी नाकारणे3. उपोषण सुरू करण्यापूर्वीच अण्णांना अटक करणे 4. अण्णांशी राजकीय वाटाघाटी न करणे 5. सतत धरसोड वृत्तीनं वागणे

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2011 04:37 PM IST

लोकपालवर उद्या चर्चा ; अण्णा उपोषण सोडणार ?

26 ऑगस्ट

अखेर लोकपालवर संसदेत उद्या चर्चा होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी उद्या सकाळी 11 वाजता लोकसभेत निवेदन करतील. नियम 193 नुसार चर्चा होणार आहे. त्यात मतदानाचा समावेश नाही. भाजपने आज जनलोकपालमधील काही मुद्द्यांना पाठिंबा दिला.

अण्णांच्या तीन प्रमुख मागण्यांवर संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी भाजपने केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रस्थानी आणल्याबद्दल अण्णा हजारेंचं कौतुक केलं. पण अण्णांच्या आंदोलनावर टीका करून वादही निर्माण केला.

लोकपालवर संसदेत उद्या कलम 193 नुसार चर्चा होणार आहे. त्यात मतदानाचा समावेशासह चर्चा उद्या होणार असल्यामुळे अण्णांचं उपोषणही लांबलंय. भाजपने आज जनलोकपालमधील काही मुद्द्यांना पाठिंबा दिला. अण्णांच्या तीन प्रमुख मागण्यांवर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी भाजपने केली.

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींनी अण्णांच्या उपोषणाच्या 11 व्या दिवशी आपलं मौन सोडलं. अण्णांपर्यंत पोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लोकपालच्या मुद्द्यावर राहुल यांनी भाष्य केलं. तसेच अण्णांच्या आंदोलनाचं कौतुकही केलं. पण अण्णांच्या आंदोलनावर टीकाही केली.

सर्वांनाच भ्रष्टाचार निपटून काढायचा आहे. मात्र याला सक्षम कार्यक्रमाची आवश्यकता आहे. बर्‍याच लोकांना असं वाटतं की एका विधेयकानं भ्रष्टाचार समाप्त होईल. पण मला शंका आहे. नव्या कायद्याची गरज आहे. पण केवळ लोकपाल विधेयकानं भ्रष्टाचार समूळ नष्ट होईल असं वाटत नाही. हे विधेयक त्यावर पुरेसा उपाय नाही.

अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती करण्याचं मोठ काम केलं. मी त्यांना धन्यवाद देतो. पण त्यापेक्षाही मोठी पावलं उचलण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्याकरता निवडणूक आयोगासारखी स्वतंत्र यंत्रणा हवी, असंही ते म्हणाले. अण्णांचं आंदोलन संसदेवर अधिकार गाजवल्याने लोकशाहीला घातक असंच आहे, असंही ते म्हणाले.

राहुल गांधींच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी मोठा गदारोळ केला. पंतप्रधान गोंधळ पाहत होते. तर राहुलची यंग ब्रिगेड राहुल यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. या गदारोळातच राहुल यांनी निवडणूक आयोगासारखाच घटनात्मक दर्जा लोकपालला द्यावा अशी सूचनाही केली.

राहुल गांधी आपली बाजू उचलून धरतील अशी टीम अण्णांना अपेक्षा होती. पण राहुल यांच्या वक्तव्यांमुळे त्यांना धक्का बसला. त्यानंतर लगेचच राहुल यांच्या घराला घेराव घालण्यात आला. राहुल यांच्या वक्तव्यानंतर भाजपने आपली भूमिका बदलली. आणि जनलोकपाल विधेयकावर आतापर्यंत ठाम नसणार्‍या भाजपने काही अटींसह जनलोकपालाच्या बाजूनं आपलं वजन टाकण्याचा निर्णय घेतला. आणि मतदानासह चर्चा व्हावी, यासाठी दोन्ही सभागृहांत नोटीस दिली.

सरकारने मतदानासह चर्चा करण्याचा भाजपचा प्रस्ताव नाकारला. नियम 193 अंतर्गत शनिवारी चर्चेची तयारी सरकारने दाखवली. शनिवारी सकाळी 11 वाजता प्रणव मुखर्जी संसदेत निवेदन करतील. त्यानंतर सरकार चर्चेसाठी पुढाकार घेईल.

पंतप्रधानांनी आश्वासन दिल्याप्रमाणे शुक्रवारी संसदेत चर्चा होईल अशी आशा होती. पण सरकारने घोळ घालत शुक्रवारचा दिवस घालवला. आता शनिवारी ठरल्याप्रमाणे चर्चा होऊन अण्णांचे उपोषण बाराव्या दिवशी तरी सुटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

दरम्यान, गोपीनाथ मुंडे आणि अनंतकुमार यांनी आज रामलीला मैदानावर जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. संसदेत जनलोकपाल विधेयकावर भाजपची भूमिका काय आहे ते त्यांनी अण्णांपुढे स्पष्ट केलं. नियम 184 अन्वये चर्चा करून सक्षम लोकपाल आणण्याची भाजपची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजपचा अण्णांना पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितले.

टीम अण्णा, भाजप आणि सरकार यांच्यातील तीन मतभेदाचे मुद्दे

1. सर्व अधिकारी लोकपालाच्या कक्षेत टीम अण्णा - कनिष्ठ अधिकारीही लोकपालाच्या कक्षेत आणावेतकाँग्रेस - नाही, फक्त वरिष्ठ अधिकारीच भाजप - हो, पण काही अटींवर2. लोकायुक्ताचा मुद्दाटीम अण्णा - सर्व राज्यांत लोकायुक्त नेमाकाँग्रेस - नाही, त्यामुळे संघराज्याच्या तत्वाला धोका निर्माण होईलभाजप - हो, सर्व राज्यांत लोकायुक्त असावेत3. सिटीझन्स चार्टरटीम अण्णा - विशिष्ट मुदतीत काम संपवण्याचे बंधन अधिकार्‍यांवर असावेकाँग्रेस - नाही, हा मुद्दा लोकपालाच्या कक्षेत नसावाभाजप - हो, कामासाठी विशिष्ट मुदतीचं बंधन हवे

सरकारच्या 5 चुका 1. मसुदा समितीत विरोधी पक्षांना न घेणे, त्यांच्याशी चर्चा न करणे2. अण्णांच्या पसंतीच्या ठिकाणी उपोषणाला परवानगी नाकारणे3. उपोषण सुरू करण्यापूर्वीच अण्णांना अटक करणे 4. अण्णांशी राजकीय वाटाघाटी न करणे 5. सतत धरसोड वृत्तीनं वागणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2011 04:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...