पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा असलाच पाहिजे - मुख्यमंत्री

पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा असलाच पाहिजे - मुख्यमंत्री

29 मेपत्रकारांना संरक्षण देणारा कायदा असलाच पाहिजे असं मत व्यक्त करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या विधीमंडळ अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायद्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासंन दिलं आहे. ते रायगडमधील रोहा इथं बोलत होते. अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या 2 दिवसीय द्वैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री म्हणतात, '' पत्रकारांनी आपली नैतिकता जपली पाहिजे माध्यमांनी टीआरपी मिऴवण्यासाठी आणि वृत्तपत्रांनी खप वाढवण्यासाठी भडक बातम्या देऊ नये '' असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. जलसंपदा मंत्री सुनील तटकरे हे या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत. भाजप नेते गोपीनाथ मुंडेच्या हस्ते या अधिवेशनाचा आज समारोप होणार आहे.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या द्वैवार्षिक अधिवेशनाला आजपासून रोह्‌यात सुरूवात झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यावेऴी उपस्थित होते. पत्रकारांवर होणारे रोखण्यासाठी कायदा असलाच पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. सर्वच राजकीय पक्षांची या कायद्याला तत्त्वत: मान्यता असल्याचे आणि येत्या विधीमंडळ अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायद्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेऴी सांगितलं. मात्र पत्रकारांनी आपली नैतिकता जपली पाहिजे हे यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. माध्यमांनी टीआरपी मिळवण्यासाठी आणि वृत्तपत्रांनी आपला खप वाढवण्यासाठी भडक बातम्यांवर भर देऊ नये कारण अशा बातम्यांमुळे कोणाची तरी बदनामी होत असते याची जाणीव ठेवावी असा सल्ला चव्हाण यांनी दिला.राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे असं मत व्यक्त केलंय. राज्याचे माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांनी या अधिवेशनाला हजेरी लावली. माहितीच्या अधिकाराचा गैरवापर कसा केला जातो यावर त्यांनी भाष्य केलं. तर मराठी भाषा तंत्रज्ञानाने विकसीत झाली पाहिजे असं मत खासदार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केलं.समारोपाच्या कार्यक्रमाला भाजप नेते गोपीनाथ मुंडे उपस्थित राहणार आहे. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर या अधिवेशनात ठराव घेतले गेले.

  • Share this:

29 मे

पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा असलाच पाहिजे असं मत व्यक्त करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या विधीमंडळ अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायद्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासंन दिलं आहे. ते रायगडमधील रोहा इथं बोलत होते.

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या 2 दिवसीय द्वैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री म्हणतात, '' पत्रकारांनी आपली नैतिकता जपली पाहिजे माध्यमांनी टीआरपी मिऴवण्यासाठी आणि वृत्तपत्रांनी खप वाढवण्यासाठी भडक बातम्या देऊ नये '' असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

जलसंपदा मंत्री सुनील तटकरे हे या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत. भाजप नेते गोपीनाथ मुंडेच्या हस्ते या अधिवेशनाचा आज समारोप होणार आहे.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या द्वैवार्षिक अधिवेशनाला आजपासून रोह्‌यात सुरूवात झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यावेऴी उपस्थित होते.

पत्रकारांवर होणारे रोखण्यासाठी कायदा असलाच पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. सर्वच राजकीय पक्षांची या कायद्याला तत्त्वत: मान्यता असल्याचे आणि येत्या विधीमंडळ अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायद्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेऴी सांगितलं.

मात्र पत्रकारांनी आपली नैतिकता जपली पाहिजे हे यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. माध्यमांनी टीआरपी मिळवण्यासाठी आणि वृत्तपत्रांनी आपला खप वाढवण्यासाठी भडक बातम्यांवर भर देऊ नये कारण अशा बातम्यांमुळे कोणाची तरी बदनामी होत असते याची जाणीव ठेवावी असा सल्ला चव्हाण यांनी दिला.

राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे असं मत व्यक्त केलंय. राज्याचे माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांनी या अधिवेशनाला हजेरी लावली.

माहितीच्या अधिकाराचा गैरवापर कसा केला जातो यावर त्यांनी भाष्य केलं. तर मराठी भाषा तंत्रज्ञानाने विकसीत झाली पाहिजे असं मत खासदार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केलं.

समारोपाच्या कार्यक्रमाला भाजप नेते गोपीनाथ मुंडे उपस्थित राहणार आहे. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर या अधिवेशनात ठराव घेतले गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2011 09:40 AM IST

ताज्या बातम्या