Elec-widget

लातूरजवळ मिनी बस नदीत कोसळली, 11 ठार, 24 जखमी

8 नोव्हेंबर, लातूरलातूर शहराजवळ शुक्रवारी एक मिनी बस नदीत कोसळून झालेल्या अपघातातातील मृतांचा आकडा 11 वर पोहोचलाय. तर 24 जण जखमी झालेत. त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर काल संध्याकाळी साडे सात वाजता ही घटना घडली. एम एच-01-5888 ही बस लातूरहून 33 प्रवासी घेऊन अंबाजोगाईकडं जात होती. महापूर नदीच्या पुलावर आल्यावर ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि पुलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली. कोसळताना बस दोनदा पलटी झाली. घटनास्थळापासून जवळच एक फार्महाऊस आहे. तिथं काही लोक एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जमले होते. त्यांनी बसचा आवाज ऐकून पोलीस आणि हॉस्पिटलला संपर्क केला. त्यानंतर 26 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमींवर यशवंतराव चव्हाण जिल्हा ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांपैकी दोघांची ओळख अजून पटलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्तांना तातडीची मदत देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2008 05:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...