पुण्यात 13 आणि 14 मार्चला रंगणार शनिवारवाडा फेस्टिव्हल

पुण्यात 13 आणि 14 मार्चला रंगणार शनिवारवाडा फेस्टिव्हल

02 मार्चपुण्यामध्ये येत्या 13 आणि 14 मार्चला शनिवारवाडा फेस्टिव्हल रंगणार आहे. नृत्याचे वेगवेगळे प्रकार एकाच मंचावर सादर करण्याची संधी यावेळी देशभरातल्या दिग्गज कलाकारांना मिळणार आहे. पुण्यामध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत संयोजन कमिटीचे सदस्य सबिना संघवी आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी ही माहिती दिली. या फेस्टिव्हलचं हे दहावं वर्ष आहे. यंदा या फेस्टिव्हल मध्ये ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल. पहिल्या दिवशी 13 मार्चला मधु नटराज यांचा कथ्थकचा कार्यक्रम होईल. यामध्ये योगा, मार्शल आर्ट आणि कथ्थक यंाचा मिलाफ पाहायला मिळेल. 14 तारखेला कथ्थ विविधा हा कार्यक्रम असेल. महाराष्ट्राची संस्कृती कथ्थक मधून दाखवणारा हा कार्यक्रम असेल. तसेच 14 तारखेला दुसर्‍या सत्रात सितारादेवी यांच्या कन्या जयंती माला, त्यांची कन्या रिषिका मिश्रा आणि सहकारी विशाल कृष्णा हे कथ्थक सादर करतील.

  • Share this:

02 मार्च

पुण्यामध्ये येत्या 13 आणि 14 मार्चला शनिवारवाडा फेस्टिव्हल रंगणार आहे. नृत्याचे वेगवेगळे प्रकार एकाच मंचावर सादर करण्याची संधी यावेळी देशभरातल्या दिग्गज कलाकारांना मिळणार आहे. पुण्यामध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत संयोजन कमिटीचे सदस्य सबिना संघवी आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी ही माहिती दिली. या फेस्टिव्हलचं हे दहावं वर्ष आहे. यंदा या फेस्टिव्हल मध्ये ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल.

पहिल्या दिवशी 13 मार्चला मधु नटराज यांचा कथ्थकचा कार्यक्रम होईल. यामध्ये योगा, मार्शल आर्ट आणि कथ्थक यंाचा मिलाफ पाहायला मिळेल. 14 तारखेला कथ्थ विविधा हा कार्यक्रम असेल. महाराष्ट्राची संस्कृती कथ्थक मधून दाखवणारा हा कार्यक्रम असेल. तसेच 14 तारखेला दुसर्‍या सत्रात सितारादेवी यांच्या कन्या जयंती माला, त्यांची कन्या रिषिका मिश्रा आणि सहकारी विशाल कृष्णा हे कथ्थक सादर करतील.

Tags:
First Published: Mar 3, 2011 03:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading