बेमिसाल उलाढाल

बेमिसाल उलाढाल

हिंदीबरोबरच आता मराठी सिनेमांचं प्रमोशन्सही मॉलमध्ये करण्यात येत आहे. 'उलाढाल' हा मराठी सिनेमा यापैकीच एक आहे. अंकुश चौधरी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, मधुरा वेलणकर, मकरंद अनासपुरे, अदिती सारंगधर, लोकेश गुप्ते अशी बडी स्टारकास्ट मंडळी या सिनेमात आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. आदित्यचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. सिनेमाच्या प्रमोशनबरोबरच तगड्या बजेटसाठीही हा सिनेमा सध्या बराच चर्चेत आहे. 'आयबीएन-लोकमत'च्या 'दीपोत्सव' या कार्यक्रमात 'उलाढाल'चे कलाकार आले होते. नेमकी 'उलाढाल' या सिनेमाची थीम कशावर आधारित आहे आणि मराठीत इतका 'बिग बजेट' सिनेमा काढायची कल्पना कशी काय सुचली या दोन मुद्यांवरून गप्पांना सुरुवात झाली.मराठीतल्या नाववाल्या मोठ्या स्टारकास्ट मंडळींना एकत्र आणण्याचं तंत्र सिनेमाचे दिग्दर्शक अजय सरपोतदार यांना चांगलं जमलेलं आहे. पण हा योग जुळून तरी कसा आला याबाबत अजय सरपोतदार म्हणाले, "उलाढालची कथा-पटकथा जेव्हा तयार झाली तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर काही नावं होती. ती या कलाकारांची होती. माझी या कलाकारांशी काही व्यक्तिगत ओळख आहे, असंही नाही. तर 'उलाढाल'साठी लिहिलेल्या व्यक्तिरेखांना साजेशा कलाकारांना मी फोन केला. त्यांना सिनेमाची थीम सांगितली. ती त्यांना आवडली. प्रत्येकाने मला आपला होकार कळवला. त्यांनी जसा होकार कळवला तसा मी पुढच्या तयारीला लागलो. घेण्यासारखी बाब म्हणजे माझी दिग्दर्शनाची पहिलीच वेळ असूनही या कलाकारांनी आढेवेढे घेतले नाहीत." सांगितल्याप्रमाणे उलाढाल हा मराठीतला बिग बजेटचा सिनेमा आहे. तो 'ढाल' या एका वस्तू भोवती फिरतो. मराठीतल्या मल्टीस्टारर सिनेमाला अजय अतुल जोडीनं धमाकेदार संगीत दिलं आहे. 104 लोकेशन्सला सिनेमाचं शुटिंग झालं आहे. सिनेमात स्पेशल इफेक्टस्‌चा भरपूर वापर करण्यात आला आहे. स्पेशल इफेक्टचा वापर सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदारच दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा मकरंद सिनेमाची वेगळी भूमिका आहे. संपूर्ण सिनेमा एका ढाली भोवती फिरतो.

  • Share this:

First published: November 14, 2008, 1:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या