दिवाळी अंक एक अनोखी ठेव

दिवाळी अंक एक अनोखी ठेव

'आयबीएन-लोकमत'वर दिवाळी निमित्ताने विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यातला एक कार्यक्रम दिवाळी अंकांच्या शताब्दी निमित्ताने घेतला गेला. या कार्यक्रमाचं नाव होतं 'दिवाळी अंक एक अनोखी ठेव'. या कार्यक्रमात दिवाळी अंक, दिवाळी अंक काढण्यामागची संपादकांची भूमिका , दिवाळी अंकात हाताळले जाणारे निरनिराळे साहित्य प्रकार, दिवाळी अंकांचा लेखकांना होणारा फायदा, दिवाळी अंकांची मुखपृष्ठं, अंकाची आतली मांडणी, सजावट, निरनिराळ्या विषयांना वाहिलेले दिवाळी अंक अशा निरनिराळ्या मुद्द्यांवरून 'दिवाळी अंक एक अनोखी ठेव' या कार्यक्रमात चर्चा रंगली. या चर्चेत गेली 50 वर्षं दिवाळी अंकांचे वाचक, लेखक आणि समीक्षक ह.मो.मराठे, 'मॅजेस्टिक' या प्रकाशन संस्थेचे अशोक कोठावळे, 'शतायुषी'या दिवाळी अंकाचे संपादक डॉ. अरविन्द संगमनेरकर आणि सुलेखनकार (कॅलिओग्राफर) अच्युत पालव यांच्या सहभागामुळे चर्चेची रंगत उत्तरोत्तर वाढली. मराठी माणूस म्हटला की काहीगोष्टी हक्काच्या मराठी असतात. अनेक लेखक जसे आपल्या या मराठी भाषेत आहेत तसा अजून एक साहित्यिक ठेवा मराठीने गेली 100 वर्षं जपला आहे. आणि तो आहे प्रत्येक दिवाळीत प्रसिद्ध होणा-या दिवाळी अंकांचा. का. र. मित्रंनी सुरू केलेल्या दिवाळी अंकाला 2008 सालात 100 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यावरून लक्षात आलं की गेली 100 वर्षं मराठीमध्ये दिवाळी अंकांची परंपरा अजूनही अखंडपणे चालू आहे. ह.मो. गेली 50 वर्ष दिवाळी अंकाचा प्रवाास पाहिला आहे. दिवाळी अंकांचा संपादक, आणि साक्षेपी लेखक म्हणून आपल्याला दिवाळी अंकांनी खूप काही दिलंअसल्याचं ह.मो. म्हणाले. "दिवाळी अंकांनी मुख्यत:साहित्यामध्ये खूपच भर घातली आहे. दिवाळी अंकांच्या निमित्ताने किती तरी कथालेखन मराठीत होतं. मराठीत लघुकथांचं दालन समृद्ध झालं आहे ते दिवाळी अंकांसाठी लिहिलेल्या कथालेखनामुळे. त्याखेरीज दिवाळी अंकांमध्ये लघुकादंब-या छापण्याचीही पद्धत होती. मराठीतल्या कितीतरी उत्तमोत्तम लघुकादंब-या फक्त दिवाळी अंकांच्या मुळे लिहिल्या गेल्या आहेत. याचाच अर्थ लघुकादंब-यांचं विश्वही दिवाळी अंकांमुळे समृद्ध झालं आहे. दिवाळी अंकाकडे कर्मशियल अँगलने बघून चालणार नाही. जाहिरांतीतलं उत्पन्न हा दिवाळी अंकाच्या निर्मितीतला छोटा भाग आहे. पण दिवाळी अंकांनी आपल्याला जो साहित्याचा आस्वाद दिला आहे, तो वाखाणण्या जोगा आहे. दिवाळी अंकांमुळेच मराठीत एवढं साहित्य लिहिलं गेलं आहे. आणि याचं चालतं बोलतं उदाहरण मी स्वत: आहे. माझी पहिली कादंबरी दिवाळी अंकामध्येच छापली गेली आहे." __PAGEBREAK__दिवाळी अंकांमुळे वाचकांना साहित्य मिळालं पण संपादकाला काय मिळालं, या प्रश्नाचं उत्तर देताना अशोक कोठावळे म्हणाले, "मी ज्यावेळेस संपादन करायला लागलो तेव्हा आमच्यावर असे आरोप केले जायचे की आमच्याकडे तेचतेच लेखक लिहितात. पण मी प्रत्यक्षात संपादन हातात घेतल्यावर माझ्याकडे नवनवीन लेखक लिहितील कसे याचा शोध घ्यायला सुरुवात केली. म्हणजे नव्या दमाच्या लेखकांची नवीन भूमिका रुजवण्याचा प्रयत्न केला. ब-याचवेळेला दिवाळी अंकातून चांगल्या चांगल्या लेखकांचा जन्म झाला आहे. आता साप्ताहिकं तसंच मासिकांचे दिवस गेले आहेत. त्यामुळे लघुकथालेखक, दीर्घ कथालेखक लघुकादंबरीकार, दीर्घ कादंबरीकार यांना दिवाळी अंक हे एकमेव लिखाणाचं दालन निर्माण झालं आहे. मी तरी दिवाळी अंकाच्या माध्यमातून चांगल्या आणि दर्जेदार लेखकाचा, लिखाणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते करत असताना मला तरुण नव्या दमाचे लेखक मिळाले. ओळखीच्या लेखकांचं लिखाण मला ठाऊक आहे. पण नव्या दमाच्या लेखकांच्या लिखाणाचा अंदाज येण्यासाठी मी निरनिराळ्या प्रकारच्या कादंबरी, कथा लेखनाच्या स्पर्धा घेतो. त्यातून मी चांगले लेखक निवडतो. मधुकर धर्मापुरीकरसारख्या लेखक दिवाळी अंकांतून पुढे आला आहे. आता तो सात्यत्याने लिखाण करत आहे. चांगल्या व्यंगचित्रकारांसाठी व्यंगचित्रांची स्पर्धा भरवली होती. त्यातून नव्या दमाचे व्यंगचित्रकार मिळाले. विजय पाडळकर, साईनाथ रावराणे, अभिमन्यू पाटीलसारखा व्यंगचित्रकार अशा स्पर्धांतूनच पुढे आला आहे. नव्या दमाचे लेखक लिखाण आणि केलेच्या बाबतीत चांगले आहेत."मराठी वाड्मयसोडून वाड्मयेतर विषयांवरही दिवाळी अंक निघाले आहेत. याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे 'शतायुषी'सारखा दिवाळी अंक. 'शातायुषी'मधून आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या लेखकांनी लिहिलं आहे ते डॉक्टर आहेत. त्यातल्या काहींचं लिखाण तर आपण 'शतायुषी'मधून पहिल्यांदाच वाचलं आहे. आपल्या गुंतागुंतीच्या वेळापत्रकातून वेळ काढून हे डॉक्टर मंडळी लिहितात कशी याचंच सगळ्यांना आश्चर्य वाटतं. या लेखकांना लिहतं करण्याची कला 'शतायुषी'चे संपादक डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी अचूक साधली आहे. त्याविषयी डॉक्टर सांगतात, "मुळातच हे डॉक्टर अाहेत व्यावसायिक असतात. त्यामुळे त्यांच्याकडून भरपूर आधीपासून मी लिहून घेतो. एकतर हे डॉक्टर आपल्याकडे लिहायला फारसे उत्सुक नसतात. कारण त्यांना त्यांची डॉक्टर म्हणून इमेज बरीच असते. आता उदाहरणादाखल आपण 'शतायुषी'च्या ह्रदयरोग स्पेशल दिवाळी अंकाचं घेऊ. अमेरिकेचे जगप्रसिद्ध ह्रदयरोगतज्ज्ञ डेण्टन कुली यांची अपॉईण्टमेण्ट घ्यायला वर्षवर्ष दोनदोनवर्षं वाट बघावी लागते. पण त्यांनी आमच्याकडे लिहिलं कारण त्यांना आम्ही खूप आधीपासून कळवलं होतं, ही एक गोष्ट झाली. त्यात डॉ. कुलींना आमच्या दिवाळी अंकांची संकल्पना आवडलीही होती. म्हणजे अशा चांगल्या चांगल्या डॉक्टर लेखकांना आधी हेरावं लागतं. विशेषत: परदेशातल्या माणसांना वर्षभर आधीपासून सांगून लिहून घ्यावं लागतं. त्यासाठी आपलं वेळापत्रक असतं. त्या वेळापत्रकाप्रमाणे काम करावं लागतं." "दिवाळी अंकांना मांडणीचीही उत्तम परंपरा आहे. वाचकांना आपल्या दिवाळी अंकांच्या माध्यमातून काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न प्रत्येक आर्टिस्ट करत असतो. कारण प्रत्येक कलाकारासाठी ते एकप्रकारचं आव्हान असतं. आव्हान एवढ्यासाठी की प्रत्येक वेळेला तो काहीतरी नवीन देत असतो. नवीन देण्याच्या प्रयत्नात साहित्य आणि तयार इलस्ट्रेशनलाही तेवढाच न्याय द्यायचा असतो. त्यामुळे प्रत्येक आर्टिस्ट दिवाळी अंकांचा अधिक खोलात वचार करत असतो," असं दिवाळी अंकांच्या मांडणी आणि सजावटीबाबतचं मत सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केलं. 'दिवाळी अंक एक अनोखी ठेव' या दिवाळी अंकावरच्या चर्चेच्या कार्यक्रमात मान्यवर लेखक आणि कथालेखक आसाराम लोमटे यांनीही भाग घेतला होता. शेतकरी पार्श्वभूमीवरच्या त्यांच्या अनेक कथा गाजल्या आहेत. दिवाळी अंकांचं इतकेवर्षं केंद्र मुंबई आणि पुणे हे होतं. मराठवाड्यात वाढत असताना तिथल्या वाचकांना काय दिलं त्याबाबात आसाराम लोमटे सांगतात, "एकतर दिवाळी अंक ही मराठीतली समृद्ध अशी परंपरा आहे. मुंबई आणि पुणे ही दिवाळी अंकांची मुख्य केंद्र होती आणि आहेत. पण आता महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतून उत्तमोत्तम दिवाळी अंकांची निर्मिती झाली आहे. अगदी संगमनेरच्या 'शब्दालय'पासून खेड तालुक्यातल्या 'उद्गार'सारख्या दिवाळी अंकांनी ही परंपरा जपली आहे. या सगळ्या दिवाळी अंकांमुळे लिहण्याची उत्कट इच्छा असणारा तरुणवर्ग लिहू लागला आहे. त्यामुळे या नव्या दमाच्या लेखकांचं जाणकार मंडळी रूचीपूर्णतेने वाचतात. त्याचं कल्पनाविश्व पाहतात. त्यामुळे दिवाळी अंकांसाठी उगाच लिहायचं म्हणून लिहू नये. तर गांभीर्याने एक बांधिलकी म्हणून लिहावं."या मान्यवरांच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात आणि ती अशी की, दिवाळी अंकांचा विषय हा न संपणारा आहे. ती परंपरा कशी उज्ज्वल करायची ते आपल्या हातात आहे.

  • Share this:

'आयबीएन-लोकमत'वर दिवाळी निमित्ताने विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यातला एक कार्यक्रम दिवाळी अंकांच्या शताब्दी निमित्ताने घेतला गेला. या कार्यक्रमाचं नाव होतं 'दिवाळी अंक एक अनोखी ठेव'. या कार्यक्रमात दिवाळी अंक, दिवाळी अंक काढण्यामागची संपादकांची भूमिका , दिवाळी अंकात हाताळले जाणारे निरनिराळे साहित्य प्रकार, दिवाळी अंकांचा लेखकांना होणारा फायदा, दिवाळी अंकांची मुखपृष्ठं, अंकाची आतली मांडणी, सजावट, निरनिराळ्या विषयांना वाहिलेले दिवाळी अंक अशा निरनिराळ्या मुद्द्यांवरून 'दिवाळी अंक एक अनोखी ठेव' या कार्यक्रमात चर्चा रंगली. या चर्चेत गेली 50 वर्षं दिवाळी अंकांचे वाचक, लेखक आणि समीक्षक ह.मो.मराठे, 'मॅजेस्टिक' या प्रकाशन संस्थेचे अशोक कोठावळे, 'शतायुषी'या दिवाळी अंकाचे संपादक डॉ. अरविन्द संगमनेरकर आणि सुलेखनकार (कॅलिओग्राफर) अच्युत पालव यांच्या सहभागामुळे चर्चेची रंगत उत्तरोत्तर वाढली.

मराठी माणूस म्हटला की काहीगोष्टी हक्काच्या मराठी असतात. अनेक लेखक जसे आपल्या या मराठी भाषेत आहेत तसा अजून एक साहित्यिक ठेवा मराठीने गेली 100 वर्षं जपला आहे. आणि तो आहे प्रत्येक दिवाळीत प्रसिद्ध होणा-या दिवाळी अंकांचा. का. र. मित्रंनी सुरू केलेल्या दिवाळी अंकाला 2008 सालात 100 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यावरून लक्षात आलं की गेली 100 वर्षं मराठीमध्ये दिवाळी अंकांची परंपरा अजूनही अखंडपणे चालू आहे. ह.मो. गेली 50 वर्ष दिवाळी अंकाचा प्रवाास पाहिला आहे. दिवाळी अंकांचा संपादक, आणि साक्षेपी लेखक म्हणून आपल्याला दिवाळी अंकांनी खूप काही दिलंअसल्याचं ह.मो. म्हणाले. "दिवाळी अंकांनी मुख्यत:साहित्यामध्ये खूपच भर घातली आहे. दिवाळी अंकांच्या निमित्ताने किती तरी कथालेखन मराठीत होतं. मराठीत लघुकथांचं दालन समृद्ध झालं आहे ते दिवाळी अंकांसाठी लिहिलेल्या कथालेखनामुळे. त्याखेरीज दिवाळी अंकांमध्ये लघुकादंब-या छापण्याचीही पद्धत होती. मराठीतल्या कितीतरी उत्तमोत्तम लघुकादंब-या फक्त दिवाळी अंकांच्या मुळे लिहिल्या गेल्या आहेत. याचाच अर्थ लघुकादंब-यांचं विश्वही दिवाळी अंकांमुळे समृद्ध झालं आहे. दिवाळी अंकाकडे कर्मशियल अँगलने बघून चालणार नाही. जाहिरांतीतलं उत्पन्न हा दिवाळी अंकाच्या निर्मितीतला छोटा भाग आहे. पण दिवाळी अंकांनी आपल्याला जो साहित्याचा आस्वाद दिला आहे, तो वाखाणण्या जोगा आहे. दिवाळी अंकांमुळेच मराठीत एवढं साहित्य लिहिलं गेलं आहे. आणि याचं चालतं बोलतं उदाहरण मी स्वत: आहे. माझी पहिली कादंबरी दिवाळी अंकामध्येच छापली गेली आहे." __PAGEBREAK__दिवाळी अंकांमुळे वाचकांना साहित्य मिळालं पण संपादकाला काय मिळालं, या प्रश्नाचं उत्तर देताना अशोक कोठावळे म्हणाले, "मी ज्यावेळेस संपादन करायला लागलो तेव्हा आमच्यावर असे आरोप केले जायचे की आमच्याकडे तेचतेच लेखक लिहितात. पण मी प्रत्यक्षात संपादन हातात घेतल्यावर माझ्याकडे नवनवीन लेखक लिहितील कसे याचा शोध घ्यायला सुरुवात केली. म्हणजे नव्या दमाच्या लेखकांची नवीन भूमिका रुजवण्याचा प्रयत्न केला. ब-याचवेळेला दिवाळी अंकातून चांगल्या चांगल्या लेखकांचा जन्म झाला आहे. आता साप्ताहिकं तसंच मासिकांचे दिवस गेले आहेत. त्यामुळे लघुकथालेखक, दीर्घ कथालेखक लघुकादंबरीकार, दीर्घ कादंबरीकार यांना दिवाळी अंक हे एकमेव लिखाणाचं दालन निर्माण झालं आहे. मी तरी दिवाळी अंकाच्या माध्यमातून चांगल्या आणि दर्जेदार लेखकाचा, लिखाणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते करत असताना मला तरुण नव्या दमाचे लेखक मिळाले. ओळखीच्या लेखकांचं लिखाण मला ठाऊक आहे. पण नव्या दमाच्या लेखकांच्या लिखाणाचा अंदाज येण्यासाठी मी निरनिराळ्या प्रकारच्या कादंबरी, कथा लेखनाच्या स्पर्धा घेतो. त्यातून मी चांगले लेखक निवडतो. मधुकर धर्मापुरीकरसारख्या लेखक दिवाळी अंकांतून पुढे आला आहे. आता तो सात्यत्याने लिखाण करत आहे. चांगल्या व्यंगचित्रकारांसाठी व्यंगचित्रांची स्पर्धा भरवली होती. त्यातून नव्या दमाचे व्यंगचित्रकार मिळाले. विजय पाडळकर, साईनाथ रावराणे, अभिमन्यू पाटीलसारखा व्यंगचित्रकार अशा स्पर्धांतूनच पुढे आला आहे. नव्या दमाचे लेखक लिखाण आणि केलेच्या बाबतीत चांगले आहेत."

मराठी वाड्मयसोडून वाड्मयेतर विषयांवरही दिवाळी अंक निघाले आहेत. याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे 'शतायुषी'सारखा दिवाळी अंक. 'शातायुषी'मधून आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या लेखकांनी लिहिलं आहे ते डॉक्टर आहेत. त्यातल्या काहींचं लिखाण तर आपण 'शतायुषी'मधून पहिल्यांदाच वाचलं आहे. आपल्या गुंतागुंतीच्या वेळापत्रकातून वेळ काढून हे डॉक्टर मंडळी लिहितात कशी याचंच सगळ्यांना आश्चर्य वाटतं. या लेखकांना लिहतं करण्याची कला 'शतायुषी'चे संपादक डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी अचूक साधली आहे. त्याविषयी डॉक्टर सांगतात, "मुळातच हे डॉक्टर अाहेत व्यावसायिक असतात. त्यामुळे त्यांच्याकडून भरपूर आधीपासून मी लिहून घेतो. एकतर हे डॉक्टर आपल्याकडे लिहायला फारसे उत्सुक नसतात. कारण त्यांना त्यांची डॉक्टर म्हणून इमेज बरीच असते. आता उदाहरणादाखल आपण 'शतायुषी'च्या ह्रदयरोग स्पेशल दिवाळी अंकाचं घेऊ. अमेरिकेचे जगप्रसिद्ध ह्रदयरोगतज्ज्ञ डेण्टन कुली यांची अपॉईण्टमेण्ट घ्यायला वर्षवर्ष दोनदोनवर्षं वाट बघावी लागते. पण त्यांनी आमच्याकडे लिहिलं कारण त्यांना आम्ही खूप आधीपासून कळवलं होतं, ही एक गोष्ट झाली. त्यात डॉ. कुलींना आमच्या दिवाळी अंकांची संकल्पना आवडलीही होती. म्हणजे अशा चांगल्या चांगल्या डॉक्टर लेखकांना आधी हेरावं लागतं. विशेषत: परदेशातल्या माणसांना वर्षभर आधीपासून सांगून लिहून घ्यावं लागतं. त्यासाठी आपलं वेळापत्रक असतं. त्या वेळापत्रकाप्रमाणे काम करावं लागतं."

"दिवाळी अंकांना मांडणीचीही उत्तम परंपरा आहे. वाचकांना आपल्या दिवाळी अंकांच्या माध्यमातून काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न प्रत्येक आर्टिस्ट करत असतो. कारण प्रत्येक कलाकारासाठी ते एकप्रकारचं आव्हान असतं. आव्हान एवढ्यासाठी की प्रत्येक वेळेला तो काहीतरी नवीन देत असतो. नवीन देण्याच्या प्रयत्नात साहित्य आणि तयार इलस्ट्रेशनलाही तेवढाच न्याय द्यायचा असतो. त्यामुळे प्रत्येक आर्टिस्ट दिवाळी अंकांचा अधिक खोलात वचार करत असतो," असं दिवाळी अंकांच्या मांडणी आणि सजावटीबाबतचं मत सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केलं.

'दिवाळी अंक एक अनोखी ठेव' या दिवाळी अंकावरच्या चर्चेच्या कार्यक्रमात मान्यवर लेखक आणि कथालेखक आसाराम लोमटे यांनीही भाग घेतला होता. शेतकरी पार्श्वभूमीवरच्या त्यांच्या अनेक कथा गाजल्या आहेत. दिवाळी अंकांचं इतकेवर्षं केंद्र मुंबई आणि पुणे हे होतं. मराठवाड्यात वाढत असताना तिथल्या वाचकांना काय दिलं त्याबाबात आसाराम लोमटे सांगतात, "एकतर दिवाळी अंक ही मराठीतली समृद्ध अशी परंपरा आहे. मुंबई आणि पुणे ही दिवाळी अंकांची मुख्य केंद्र होती आणि आहेत. पण आता महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतून उत्तमोत्तम दिवाळी अंकांची निर्मिती झाली आहे. अगदी संगमनेरच्या 'शब्दालय'पासून खेड तालुक्यातल्या 'उद्गार'सारख्या दिवाळी अंकांनी ही परंपरा जपली आहे. या सगळ्या दिवाळी अंकांमुळे लिहण्याची उत्कट इच्छा असणारा तरुणवर्ग लिहू लागला आहे. त्यामुळे या नव्या दमाच्या लेखकांचं जाणकार मंडळी रूचीपूर्णतेने वाचतात. त्याचं कल्पनाविश्व पाहतात. त्यामुळे दिवाळी अंकांसाठी उगाच लिहायचं म्हणून लिहू नये. तर गांभीर्याने एक बांधिलकी म्हणून लिहावं."या मान्यवरांच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात आणि ती अशी की, दिवाळी अंकांचा विषय हा न संपणारा आहे. ती परंपरा कशी उज्ज्वल करायची ते आपल्या हातात आहे.

First published: November 14, 2008, 1:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या