लिटिल चॅम्पस...

लिटिल चॅम्पस...

दिवाळीनिमित्त आयबीएन- लोकमतनं प्रेक्षकांसाठी दीपोत्सवचा फराळ सादर केला होता. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'सारेगमपा 'तील लिटिल चॅम्पियनस्‌नी गाणी सादर केली. ' सारेगमपा 'स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. कोण विजयी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मात्र दीपोत्सवच्या कार्यक्रमात लिटिल चॅम्पियन्स् सारं टेन्शन विसरुन झक्कास गाणी गायली. दहा मुलांनी उत्कृष्ट गाणी गाऊन सुरमय दिवाळी साजरी केली. अवंती पटेलनं संत ज्ञानेश्वर चित्रपटातील ' एक तत्त्व नाम ' गाणं गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. कातिर्की गायकवाडनं तिच्या वडिलांनी संगीतबद्ध केलेलं ' अछुडे बछुडे '.. हे गाणं गाऊन रसिकांची वाहवा मिळवली. शमिका भिडे, शमिर्ला सुखटणकर, मुग्धा वैश्यापन, आर्या आंबेकर, नेहा करमरकर, राधिका यांनी त्यांच्या आवडीची गाणी गायली. सर्वांच्या आवडीचा प्रथमेश लघाटेनं गझल गाऊन रसिकांना मोहित केलं. कार्यक्रमाचा शेवट नागपूरच्या रोहित राऊतनं ' जबरदस्त फंडा...' हे गाणं गाऊन केलं.

  • Share this:

First published: November 14, 2008, 12:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या