असाही झिनझनाट

असाही झिनझनाट

आयबीएन लोकमत दीपोत्सव कार्यक्रमात नामवंत कवींचं कविसंमेलन पार पडलं. 'असाही झिनझनाट' असं कार्यक्रमाचं नाव होतं. यात कवी शशिकांत तिरोडकर, सौमित्र उर्फ किशोर कदम, विनोदी कवितांसाठी प्रसिद्ध असलेले अकोल्याचे मिर्झा बेग आणि फ.मु. शिंदे सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचं खुमासदार सूत्रसंचालन कवी महेश केळुस्कर यांनी केलं.या कविसंमेलनाची सुरुवात शशिकांत कोठेकर यांच्या ' ती 'कवितेने झाली. त्यानंतर प्रसिद्ध कवी सौमित्र यांनी 'गालीब तू कुठे आहे ?' ही कविता सादर केली. या कवितेतून कलावंतांचं दु:ख सांगण्यात आलं आहे. अकोल्याहुन कवी मिर्झा बेग यांनी शाब्दिक विनोदातून निर्माण होणारी कविता सादर केली. खास वर्‍हाडी भाषेतील त्यांची कविता अनेकांना भावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कवी महेश केळुस्कर यांनी ' पुरस्कार ' आणि ' झिनझनाट 'ह्या कविता ऐकवल्या. सौमित्र यांनी ' एकमेकांशी किंवा फोनवर ' ही कविता सादर केली. दीपोत्सव कार्यक्रमात ' असाही झिनझिनाट ' हा चांगलाच रंगला. रसिकांनी जोरदार स्वागत केलं.

  • Share this:

First published: November 14, 2008, 12:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या