नववर्षाच्या स्वागतासाठी प्रशांत दामलेचा नवा प्रयोग 'रंग सुरांचे'

नववर्षाच्या स्वागतासाठी प्रशांत दामलेचा नवा प्रयोग 'रंग सुरांचे'

29 डिसेंबरनेहमी आपल्या वेगवेगळ्या प्रयोगांनी विक्रम रचणारे प्रशांत दामले पुन्हा एकदा त्यांच्या नवीन प्रयोगासाठी सज्ज झाले आहेत. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन आयोजित आणि चंद्रलेखा प्रकाशित संस्थेने रंग सुरांचे या संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे. 31 डिसेंबरला दुपारी 12 ते पहाटे 2 वाजेपर्यंत दादरच्या शिवाजी मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. मोहन वाघांनंतर ही परंपरा पुढे चालविण्याचा प्रशांत दामले यांचा प्रयत्न आहे. राज ठाकरे आणि विठ्ठल कामत यांची प्रकट मुलाखत हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहे. तसेच किशोरी आमोणकर, राहुल देशपांडे, भीमराव पांचाळे, स्वप्निल बांदोडकर, श्रीधर फडके अशा 17 दिग्गजांच्या गायनाने नविन वर्षाचे स्वागत होणार आहे.

  • Share this:

29 डिसेंबर

नेहमी आपल्या वेगवेगळ्या प्रयोगांनी विक्रम रचणारे प्रशांत दामले पुन्हा एकदा त्यांच्या नवीन प्रयोगासाठी सज्ज झाले आहेत. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन आयोजित आणि चंद्रलेखा प्रकाशित संस्थेने रंग सुरांचे या संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे. 31 डिसेंबरला दुपारी 12 ते पहाटे 2 वाजेपर्यंत दादरच्या शिवाजी मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. मोहन वाघांनंतर ही परंपरा पुढे चालविण्याचा प्रशांत दामले यांचा प्रयत्न आहे. राज ठाकरे आणि विठ्ठल कामत यांची प्रकट मुलाखत हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहे. तसेच किशोरी आमोणकर, राहुल देशपांडे, भीमराव पांचाळे, स्वप्निल बांदोडकर, श्रीधर फडके अशा 17 दिग्गजांच्या गायनाने नविन वर्षाचे स्वागत होणार आहे.

First published: December 29, 2010, 11:29 AM IST
Tags:

ताज्या बातम्या