राज ठाकरे यांची भाजप कार्यालयात हजेरी

20 डिसेंबरमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाजप कार्यालयात हजेरी लावली. भाजपचे राज्यातले नेते सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, मधु चव्हाण, माधव भंडारी यावेळी भाजप कार्यालयात उपस्थित होते. नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात ही चर्चा झाली. आणि बीएमसी निवडणूकीच्यासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या भेटीचं खरं कारण अजून गुलदस्त्यात आहे. दरम्यान, मुंबईतल्या नरिमन पॉईंट इथल्या एलआयसी बिल्डींगमध्ये आज मनसेच्या जनाधिकार सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला राज ठाकरे येणार असल्याने साहजिकच मनसैनिकांची गर्दी होती. त्याच वेळी संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिष्टमंडळ एलआयसीच्या संचालकांना भेटण्यासाठी तिथे आलं होतं. दोन्ही सेनेचे सैनिक एकमेकासमोर आले आणि जोरदार घोषणाबाजी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना बाजूला नेलं आणि वातावरण शांत झालं.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Dec 20, 2010 10:02 AM IST

राज ठाकरे यांची भाजप कार्यालयात हजेरी

20 डिसेंबर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाजप कार्यालयात हजेरी लावली. भाजपचे राज्यातले नेते सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, मधु चव्हाण, माधव भंडारी यावेळी भाजप कार्यालयात उपस्थित होते. नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात ही चर्चा झाली. आणि बीएमसी निवडणूकीच्यासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या भेटीचं खरं कारण अजून गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, मुंबईतल्या नरिमन पॉईंट इथल्या एलआयसी बिल्डींगमध्ये आज मनसेच्या जनाधिकार सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला राज ठाकरे येणार असल्याने साहजिकच मनसैनिकांची गर्दी होती. त्याच वेळी संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिष्टमंडळ एलआयसीच्या संचालकांना भेटण्यासाठी तिथे आलं होतं. दोन्ही सेनेचे सैनिक एकमेकासमोर आले आणि जोरदार घोषणाबाजी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना बाजूला नेलं आणि वातावरण शांत झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2010 10:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...