Elec-widget

के रोसय्या यांचा राजीनामा

के रोसय्या यांचा राजीनामा

24 नोव्हेंबरमहाराष्ट्र आणि कर्नाटकातलं राजीनाम्याचं नाटक संपतंय तोच आंध्रप्रदेशमध्येही आता नविन सत्तानाट्य सुरू झालं आहे.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के.रोसय्या यांनी आपल्या राजीनामा दिला. आपली तब्येत बरी नसल्यानं आपण राजीनामा दिल्याचं रोसय्या यांनी म्हटलं आहे. काल (मंगळवारी) त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.मात्र काँग्रेस हायकमांडही रोसय्या यांच्या कारभारावर खुश नव्हते. दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचा मुलगा जगन रेड्डी यानं त्यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला होता. पण काँग्रेस हायकमांडनं त्यांना मुख्यमंत्री बनवलं नाही. त्यानंतर उघडपण बंड पुकारत त्यांनी ओडारपू यात्रा काढली होती. त्यातच जगन रेड्डी यांच्या मालकीच्या साक्षी न्यूज चॅनेलवर सोनिया गांधी यांच्याविरूद्ध कार्यक्रम दाखवला गेला होता.त्यानंतर या दोघांमधला संघर्ष तीव्र झाला. नवा नेता निवडीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी आणि अहमद पटेल हैदराबादला रवाना झालेत. आज संध्याकाळी सहा वाजता हैदराबादमध्ये काँग्रेसच्या हायकमांडची बैठक होत आहे.

  • Share this:

24 नोव्हेंबर

महाराष्ट्र आणि कर्नाटकातलं राजीनाम्याचं नाटक संपतंय तोच आंध्रप्रदेशमध्येही आता नविन सत्तानाट्य सुरू झालं आहे.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के.रोसय्या यांनी आपल्या राजीनामा दिला. आपली तब्येत बरी नसल्यानं आपण राजीनामा दिल्याचं रोसय्या यांनी म्हटलं आहे. काल (मंगळवारी) त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.मात्र काँग्रेस हायकमांडही रोसय्या यांच्या कारभारावर खुश नव्हते. दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचा मुलगा जगन रेड्डी यानं त्यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला होता. पण काँग्रेस हायकमांडनं त्यांना मुख्यमंत्री बनवलं नाही. त्यानंतर उघडपण बंड पुकारत त्यांनी ओडारपू यात्रा काढली होती. त्यातच जगन रेड्डी यांच्या मालकीच्या साक्षी न्यूज चॅनेलवर सोनिया गांधी यांच्याविरूद्ध कार्यक्रम दाखवला गेला होता.त्यानंतर या दोघांमधला संघर्ष तीव्र झाला. नवा नेता निवडीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी आणि अहमद पटेल हैदराबादला रवाना झालेत. आज संध्याकाळी सहा वाजता हैदराबादमध्ये काँग्रेसच्या हायकमांडची बैठक होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2010 10:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...