सोनियांच्या रॅलीसाठी साठमारी

सोनियांच्या रॅलीसाठी साठमारी

14 ऑक्टोबरराजकीय पक्ष कसे चालतात, त्यामगचे अर्थकारण काय असते, हे जनतेला सांगण्याची गरज नाही. हा सगळा समजून घेण्याचा मामला असतो. पण महात्मा गांधींचा वारसा सांगणार्‍या काँग्रेस पक्षाकडूनच या पडद्यामागील गोष्टी आता चव्हाट्यावर आणल्या गेल्या आहेत. याला निमित्त झाले आहे, सोनिया गांधींच्या 15 तारखेच्या सभेच्या आयोजनाचे. राजकारणाचे सोनिया गांधी यांची सभा येत्या 15 तारखेला वर्ध्यामध्ये होत आहे. पण अशा सभांसाठीचे काँग्रेसचे अर्थकारण नेमके कसे असते, हे आता चव्हाट्यावर आले आहे. आणि हे चव्हाट्यावर आणले आहे, खुद्द माणिकराव ठाकरे यांनीच. सोनियांच्या सभेची माहिती देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्या गप्पा रंगल्या...आणि या गप्पांमध्ये त्यांची चर्चा झाली ती या सभेसाठी जमवल्या जाणार्‍या निधीवर...या सभेसाठी प्रत्येक मंत्र्याकडून 10 - 10 लाख रुपये घेतले गेल्याची माहिती या दोघांच्या गप्पांमधून उघड झाली. तसेच एरवी अशा कार्यक्रमांसाठी पैसे खर्च न करणार्‍या मुख्यमंत्र्यांनाही दोन कोटी रुपये द्यावे लागले, असेही या दोघांच्या बोलण्यातून उघड झाले. मुख्यमंत्र्यांकडून सारवा सारवया एकंदर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी बरीच सारवासारव करायचा प्रयत्न केला. 'अब आया वो लाईन पे' या वाक्याचा अर्थ सांगताना तर मुख्यमंत्री वेगळ्याच लाईनवर गेले. माझा फोन बर्‍याचदा अनऍव्हेलेबल असतो. त्या संदर्भात चतुर्वेदी आणि माणिकराव ठाकरे बोलत असावेत, असे सांगण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न होता.वनमंत्री पतंगराव कदम यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया म्हणून डोक्यावर हातच मारुन घेतला.आणि मग त्यानंतर एकंदरीत प्रकरणामध्ये मीडियाचीच कशी चूक आहे, याचा पाढाच त्यांनी वाचला.विरोधकांची टीका विरोधकांनीसुध्दा याच प्रकरणावरुन काँग्रेस पक्षावर टीकेची संधी सोडली नाही. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष एकनाथ खडसे यांनी यावर जोरदार टीका केली आहे.तर 'गांधीजी स्वर्गात रडत असतील' अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर टीका केली आहे. माणिकरावांची कानउघडणीदरम्यान या प्रकरणावरून दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी माणिकरावांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते. सोनिया गांधींच्या सभेच्या आधी एक दिवस हा प्रकार उघडकीस आल्याने काँग्रेस हायकमांड माणिकरावांवर नाराज आहे.

  • Share this:

14 ऑक्टोबर

राजकीय पक्ष कसे चालतात, त्यामगचे अर्थकारण काय असते, हे जनतेला सांगण्याची गरज नाही. हा सगळा समजून घेण्याचा मामला असतो.

पण महात्मा गांधींचा वारसा सांगणार्‍या काँग्रेस पक्षाकडूनच या पडद्यामागील गोष्टी आता चव्हाट्यावर आणल्या गेल्या आहेत.

याला निमित्त झाले आहे, सोनिया गांधींच्या 15 तारखेच्या सभेच्या आयोजनाचे. राजकारणाचे सोनिया गांधी यांची सभा येत्या 15 तारखेला वर्ध्यामध्ये होत आहे.

पण अशा सभांसाठीचे काँग्रेसचे अर्थकारण नेमके कसे असते, हे आता चव्हाट्यावर आले आहे. आणि हे चव्हाट्यावर आणले आहे, खुद्द माणिकराव ठाकरे यांनीच.

सोनियांच्या सभेची माहिती देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्या गप्पा रंगल्या...आणि या गप्पांमध्ये त्यांची चर्चा झाली ती या सभेसाठी जमवल्या जाणार्‍या निधीवर...या सभेसाठी प्रत्येक मंत्र्याकडून 10 - 10 लाख रुपये घेतले गेल्याची माहिती या दोघांच्या गप्पांमधून उघड झाली.

तसेच एरवी अशा कार्यक्रमांसाठी पैसे खर्च न करणार्‍या मुख्यमंत्र्यांनाही दोन कोटी रुपये द्यावे लागले, असेही या दोघांच्या बोलण्यातून उघड झाले.

मुख्यमंत्र्यांकडून सारवा सारव

या एकंदर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी बरीच सारवासारव करायचा प्रयत्न केला. 'अब आया वो लाईन पे' या वाक्याचा अर्थ सांगताना तर मुख्यमंत्री वेगळ्याच लाईनवर गेले.

माझा फोन बर्‍याचदा अनऍव्हेलेबल असतो. त्या संदर्भात चतुर्वेदी आणि माणिकराव ठाकरे बोलत असावेत, असे सांगण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न होता.

वनमंत्री पतंगराव कदम यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया म्हणून डोक्यावर हातच मारुन घेतला.

आणि मग त्यानंतर एकंदरीत प्रकरणामध्ये मीडियाचीच कशी चूक आहे, याचा पाढाच त्यांनी वाचला.

विरोधकांची टीका

विरोधकांनीसुध्दा याच प्रकरणावरुन काँग्रेस पक्षावर टीकेची संधी सोडली नाही.

राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष एकनाथ खडसे यांनी यावर जोरदार टीका केली आहे.

तर 'गांधीजी स्वर्गात रडत असतील' अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर टीका केली आहे.

माणिकरावांची कानउघडणी

दरम्यान या प्रकरणावरून दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी माणिकरावांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते.

सोनिया गांधींच्या सभेच्या आधी एक दिवस हा प्रकार उघडकीस आल्याने काँग्रेस हायकमांड माणिकरावांवर नाराज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2010 12:23 PM IST

ताज्या बातम्या