नांदेडमध्ये गुरू- ता- गद्दी उत्सवात मुस्लीम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

29 ऑक्टोबर, नांदेडकाशिबाई थोरातनांदेडचा गुरू- ता- गद्दी सोहळा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरतोय. नांदेडकरांना यंदा दिवाळीसाठी देशभरातून पाहुणे लाभले आहेत. तर गुरू- ता- गद्दी सोहळ्यासाठी येणार्‍या शीख बांधवांकरता नांदेडमधल्या मुस्लीम बांधवांनी विविध उपक्रम राबवले आहेत. शीख धर्मात ग्रंथाला गुरु मानलं जातो. शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंग यांच्यानंतर ग्रंथाला गुरू मानलं गेलं आहे. या घटनेला 300 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं गुरू- ता- गद्दी सोहळ्याचा कार्यक्रम होत आहे. या सोहळ्यासाठी जगभरातून शीख बांधव आले आहेत. त्यांच्या सरबराईसाठी मुस्लीम बांधव सज्ज झाले आहेत.' ग्रंथसाहेबामध्ये हिंदू , मुस्लीम आणि शीख यांचा उल्लेख आहे. त्यांच्यात सलोखा असावा असा संदेश त्यात दिला आहे ' , असं न्यानजितसिंग यांनी सांगितलं. तहानलेल्यांना पाणी देणं, त्यांच्यासाठी फराळ आणि जेवणाची सोय करण्याचं काम मुस्लीम बांधवांना स्वीकारलं आहे. धर्म कोणताही असो,भारतीय संस्कृतीमध्ये माणसानेच माणूसकी जपली आहे. ते आज आपल्याला गुरुता गद्दी सोहळ्यात दिसून येतं.म्हणूनच हा सोहळा ऐतिहासिक असून फक्त शीख बांधवांचाच नाही सर्व नांदेडकरांचा आहे, हेच यातून सिद्ध होत आहे.

  • Share this:

First published: October 29, 2008, 7:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या