लष्कराकडे 10 दिवसांपुरता शस्त्रसाठा

लष्कराकडे 10 दिवसांपुरता शस्त्रसाठा

05 एप्रिललष्कराकडचा शस्त्रसाठा संपत चालल्याचं लष्करप्रमुखांनी व्ही के सिंग यांनी पंतप्रधानांना लिहलेलं पत्र फुटलं आणि एकच खळबळ उडाली. पण भारतीय सैन्याकडचा शस्त्रसाठा संपत चालल्याची माहिती सरकारला गेल्या दोन वर्षांपासून होती. याबाबत गेल्या दोन वर्षात लष्करी अधिकारी सरकारकडे वारंवार पाठपुरावा करत होते. पण परिस्थिती बदलली नाही. आयबीएन नेटवर्कनं या वृत्ताचा पाठपुरावा केला. त्यात ही धक्कादायक माहिती आमच्या हाती लागली. भारतीय सैन्याकडे शस्त्र सामग्रीचा मोठा तुटवडा आहे ! आणि ही धक्कादायक माहिती लष्करी अधिकारी गेल्या 4 वर्षांपासून.. वरिष्ठ राजकीय नेत्यांना आणि अधिकार्‍यांना सांगत आहे. त्याची एक प्रत आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलीय. यात अतिशय खळबळजनक बाबी उघड होतायत. युद्धसदृश परिस्थिती उद्भवली तर भूदलाकडे लढण्यासाठी पुरेसा शस्त्रसाठाच नाही.परदेशातून आयात करण्यात आलेल्या दारुगोळ्याबद्दल...- युद्धासाठी महत्त्वाच्या 125 एमएम रणगाड्यांसाठीचा दारुगोळा फक्त 6 दिवस पुरेल एवढाच शिल्लक आहे. रशियाकडून 2009 साली हा साठा मागवण्यात आला; पण तो अजून आलेला नाही. - तोफखान्यासाठी वापरण्यात येणारा दारुगोळाही फक्त दीड दिवस पुरेल एवढाच आहे; तो ही रशियाकडून मागवण्यात आलाय.देशातल्या ऑर्डिनन्स फॅक्ट्री बोर्ड म्हणजेच शस्त्रास्त्र कारखान्यांमध्ये बनवण्यात येणार्‍या दारुगोळ्याची परिस्थितीही अशीच आहे. हा शस्त्रसाठाही फार-फार तर दहा दिवस पुरेल एवढाच आहे.- जून 2008 साली 120 एमएम मॉर्टर बॉम्बचा फक्त साडे सात दिवस पुरेल एवढाच साठा भूदलाकडे होता. याची निविदा प्रक्रिया अजून रखडली आहे- 155 एमएम इल्युमिनेटिंग गन्स यांचा साठाही युद्धकाळात फक्त साडे चार दिवस पुरेल एवढाच आहे. तो ही मागवण्यात आलेला नाही- 155 एसएमके (SMK) बंदुकाही फक्त साडे सहा दिवस पुरेल एवढ्‌याच आहेतऑर्डिनन्स फॅक्ट्रीत दरवर्षी युद्धकाळात फक्त पावणे दोन दिवस पुरेल एवढ्याच एसएमके बंदुका तयार करते. त्यामुळे त्यांची नेहमीच कमतरता असते. एवढंच नाही तर देशातल्या या फॅक्ट्रीमध्ये तयार होणार्‍या दारुगोळ्यापैकी बराच निकृष्ट आणि सदोष असतो.- 2008 साली ऑर्डिनन्स फॅक्ट्रीतून तयार झालेल्या 125 एमएम बंदुकीच्या 86 हजार गोळ्या सदोष होत्या- लहान बंदुका, रायफल्स यांच्यासाठीच्या 137 लाख गोळ्या या सदोष होत्यादारुगोळा पुरवणार्‍या अनेक कंपन्या ब्लॅकलिस्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळेही दारुगोळ्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालाय. रणगाडे आणि तोफांसाठीचा दारुगोळा जवळपास संपलाय. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक परिस्थिती असताना त्याकडे गेल्या दोन वर्षांपासून अक्षम्य दुर्लक्ष होतंय. वायू दलाची परिस्थितीही काही वेगळी नाही... दुसर्‍या महायुद्धात वापरलेली काही शस्त्रास्त्रं अजूनही भारतीय हवाई दलात वापरली जात आहे. हवाई दलाकडची तब्बल 97 टक्के शस्त्रसामग्री कालबाह्य झाली आहे.वायुदलाच्या महासंचालकांनी केलेला खुलासा अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहे. वायुदलाकडे असलेली 97 टक्के शस्त्रसामग्री आता जुनी झालीय. वायुदलाच्या शस्त्रास्त्रांसबंधीची धक्कादायक माहिती आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली. हवाई हल्ल्यापासून सैन्याच्या महत्त्वाच्या यंत्रणा आणि आर्मी फिल्डचं रक्षण करण्यासाठीचं नेटवर्क आता पुरतं जुनं झालंय. आर्मी स्टाफचे माजी प्रमुख जनरल व्ही. पी. मलिक म्हणतात, काही शस्त्रास्त्र तर दुसर्‍या जागतिक युद्धातली आहेत. वायु दलाकडे शस्त्रास्त्रांची कमतरता - वायु दलाकडे असलेली बहुतांश शस्त्रसामग्रीची मुदत संपलीय. - यापैकी एक असलेलं क्वादरात क्षेपणास्त्र गेल्या तीस वर्षांपासून कार्यरत आहे. पण दोन वर्षांपूर्वीच त्याची मुदत संपली.- हवाई हल्ल्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारी एल-70 गन गेल्या 44 वर्षांपासून वायुदलात आहे. - तर शिल्का रणगाडे गेल्या 34 वर्षांपासून सेवा बजावतायत.- आणि ट्विन बॅरेल गनसुद्धा गेल्या 31 वर्षांपासून सेवेत आहेत. काही शस्त्रसामग्रींची वरवर दुरुस्ती करण्यात आली आहे. पण येणार्‍या काही काळातच ही सामग्री पूर्णपणे निकामी होईल, असं लष्कराकडून सांगण्यात आलंय. त्रिशूल आणि आकाश क्षेपणास्त्र कार्यक्रमही एकतर फसलेत किंवा वेळेत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सैन्याची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे.

  • Share this:

05 एप्रिल

लष्कराकडचा शस्त्रसाठा संपत चालल्याचं लष्करप्रमुखांनी व्ही के सिंग यांनी पंतप्रधानांना लिहलेलं पत्र फुटलं आणि एकच खळबळ उडाली. पण भारतीय सैन्याकडचा शस्त्रसाठा संपत चालल्याची माहिती सरकारला गेल्या दोन वर्षांपासून होती. याबाबत गेल्या दोन वर्षात लष्करी अधिकारी सरकारकडे वारंवार पाठपुरावा करत होते. पण परिस्थिती बदलली नाही. आयबीएन नेटवर्कनं या वृत्ताचा पाठपुरावा केला. त्यात ही धक्कादायक माहिती आमच्या हाती लागली. भारतीय सैन्याकडे शस्त्र सामग्रीचा मोठा तुटवडा आहे ! आणि ही धक्कादायक माहिती लष्करी अधिकारी गेल्या 4 वर्षांपासून.. वरिष्ठ राजकीय नेत्यांना आणि अधिकार्‍यांना सांगत आहे. त्याची एक प्रत आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलीय. यात अतिशय खळबळजनक बाबी उघड होतायत. युद्धसदृश परिस्थिती उद्भवली तर भूदलाकडे लढण्यासाठी पुरेसा शस्त्रसाठाच नाही.परदेशातून आयात करण्यात आलेल्या दारुगोळ्याबद्दल...

- युद्धासाठी महत्त्वाच्या 125 एमएम रणगाड्यांसाठीचा दारुगोळा फक्त 6 दिवस पुरेल एवढाच शिल्लक आहे. रशियाकडून 2009 साली हा साठा मागवण्यात आला; पण तो अजून आलेला नाही. - तोफखान्यासाठी वापरण्यात येणारा दारुगोळाही फक्त दीड दिवस पुरेल एवढाच आहे; तो ही रशियाकडून मागवण्यात आलाय.

देशातल्या ऑर्डिनन्स फॅक्ट्री बोर्ड म्हणजेच शस्त्रास्त्र कारखान्यांमध्ये बनवण्यात येणार्‍या दारुगोळ्याची परिस्थितीही अशीच आहे. हा शस्त्रसाठाही फार-फार तर दहा दिवस पुरेल एवढाच आहे.

- जून 2008 साली 120 एमएम मॉर्टर बॉम्बचा फक्त साडे सात दिवस पुरेल एवढाच साठा भूदलाकडे होता. याची निविदा प्रक्रिया अजून रखडली आहे- 155 एमएम इल्युमिनेटिंग गन्स यांचा साठाही युद्धकाळात फक्त साडे चार दिवस पुरेल एवढाच आहे. तो ही मागवण्यात आलेला नाही- 155 एसएमके (SMK) बंदुकाही फक्त साडे सहा दिवस पुरेल एवढ्‌याच आहेत

ऑर्डिनन्स फॅक्ट्रीत दरवर्षी युद्धकाळात फक्त पावणे दोन दिवस पुरेल एवढ्याच एसएमके बंदुका तयार करते. त्यामुळे त्यांची नेहमीच कमतरता असते. एवढंच नाही तर देशातल्या या फॅक्ट्रीमध्ये तयार होणार्‍या दारुगोळ्यापैकी बराच निकृष्ट आणि सदोष असतो.

- 2008 साली ऑर्डिनन्स फॅक्ट्रीतून तयार झालेल्या 125 एमएम बंदुकीच्या 86 हजार गोळ्या सदोष होत्या- लहान बंदुका, रायफल्स यांच्यासाठीच्या 137 लाख गोळ्या या सदोष होत्या

दारुगोळा पुरवणार्‍या अनेक कंपन्या ब्लॅकलिस्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळेही दारुगोळ्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालाय. रणगाडे आणि तोफांसाठीचा दारुगोळा जवळपास संपलाय. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक परिस्थिती असताना त्याकडे गेल्या दोन वर्षांपासून अक्षम्य दुर्लक्ष होतंय.

वायू दलाची परिस्थितीही काही वेगळी नाही... दुसर्‍या महायुद्धात वापरलेली काही शस्त्रास्त्रं अजूनही भारतीय हवाई दलात वापरली जात आहे. हवाई दलाकडची तब्बल 97 टक्के शस्त्रसामग्री कालबाह्य झाली आहे.

वायुदलाच्या महासंचालकांनी केलेला खुलासा अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहे. वायुदलाकडे असलेली 97 टक्के शस्त्रसामग्री आता जुनी झालीय. वायुदलाच्या शस्त्रास्त्रांसबंधीची धक्कादायक माहिती आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली. हवाई हल्ल्यापासून सैन्याच्या महत्त्वाच्या यंत्रणा आणि आर्मी फिल्डचं रक्षण करण्यासाठीचं नेटवर्क आता पुरतं जुनं झालंय. आर्मी स्टाफचे माजी प्रमुख जनरल व्ही. पी. मलिक म्हणतात, काही शस्त्रास्त्र तर दुसर्‍या जागतिक युद्धातली आहेत. वायु दलाकडे शस्त्रास्त्रांची कमतरता

- वायु दलाकडे असलेली बहुतांश शस्त्रसामग्रीची मुदत संपलीय. - यापैकी एक असलेलं क्वादरात क्षेपणास्त्र गेल्या तीस वर्षांपासून कार्यरत आहे. पण दोन वर्षांपूर्वीच त्याची मुदत संपली.- हवाई हल्ल्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारी एल-70 गन गेल्या 44 वर्षांपासून वायुदलात आहे. - तर शिल्का रणगाडे गेल्या 34 वर्षांपासून सेवा बजावतायत.- आणि ट्विन बॅरेल गनसुद्धा गेल्या 31 वर्षांपासून सेवेत आहेत.

काही शस्त्रसामग्रींची वरवर दुरुस्ती करण्यात आली आहे. पण येणार्‍या काही काळातच ही सामग्री पूर्णपणे निकामी होईल, असं लष्कराकडून सांगण्यात आलंय. त्रिशूल आणि आकाश क्षेपणास्त्र कार्यक्रमही एकतर फसलेत किंवा वेळेत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सैन्याची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे.

First published: April 5, 2012, 5:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या