Elec-widget

मुंबईवर भगवा फडकत ठेवा

मुंबईवर भगवा फडकत ठेवा

1 मेहा महाराष्ट्र शिवसेनेने जगवला आहे. काहीही झाले तरी मुंबई हातातून जाऊ देऊ नका. गर्दीचे आणि टाळ्यांचे रुपांतर मतांमध्ये होऊ द्या. शिवसेनेचा झेंडा खाली ठेवू नका. मुंबई महापालिकेवर भगवा फडकत राहू द्या, असे भावनिक आवाहन आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज केले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शिवसेनेने मुंबईत आयोजित केलेल्या 'गर्जा जयजयकार' कार्यक्रमात बाळासाहेबांनी आज हजेरी लावली. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते मनोहर जोशी उपस्थित होते.भाषणाला सुरुवात करतानाच बाळासाहेब म्हणाले, तुम्ही काय केलेत हे? कोणाला निवडून दिले? किती वेळा? पहिले पाढे पंचावन्न...आता जमलेल्यांनी जरी उचलले असते, तरी सर्वत्र भगवा रंग दिसला असता.ही खंत व्यक्त करतानाच त्यांनी फिल्डमार्शल करिअप्पांची आठवण सांगितली. आम्ही करिअप्पांना ठाण्यातून उभे केले. पडले ते. शिवसेनेच्या मेळाव्यातील विराट समूह पाहून म्हणाले, ही मतं गेली कुठे? महाराष्ट्र शिवसेनेने जगवला आहे. संभाजीराजांचे हाल हाल करून मारले. म्हणून आम्ही औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर केले. उस्मानाबादचे नाव धाराशिव ठेवले. आता अजूनही आपल्याकडे औरंगाबाद रोड आहेत. 50 वर्षे झाली तरी मराठीसाठी रडावे लागते शी.. शी...आपणच मराठी भाषेचा वापर करून ती वाढवली पाहिजे, टिकवली पाहिजे. केवळ दर 1 मे रोजी हुतात्मा स्मारकावर फुलं वाहून चालणार नाही. शिवतिर्थावर आम्ही संयुक्त महाराष्ट्राचे दालन उघडले आहे. तुमचे थंड रक्त उसळेल ते पाहून. मुंबईत चाळी पडत आहेत. टॉवर्स उभे राहत आहेत. मंत्रीमंडळाचा रिमोट आता माझ्या हातात नाही. पण शिवसेनेचा भगवा मुंबईवर फडकत ठेवा. शिवसेनेलाच निवडून द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर याचवेळी सीमाभाग महाराष्ट्रात आल्यानंतरच आपण पुढचे भाषण करू, असे बाबासाहेब पुरंदरे म्हणाले. त्यावर हा सीमाभाग महाराष्ट्रात आलाच पाहिजे. पण त्यासाठी मराठी माणसानेच स्वाभीमानाने उभे राहिले पाहिजे, असेही बाळासाहेब म्हणाले.

  • Share this:

1 मे

हा महाराष्ट्र शिवसेनेने जगवला आहे. काहीही झाले तरी मुंबई हातातून जाऊ देऊ नका. गर्दीचे आणि टाळ्यांचे रुपांतर मतांमध्ये होऊ द्या. शिवसेनेचा झेंडा खाली ठेवू नका. मुंबई महापालिकेवर भगवा फडकत राहू द्या, असे भावनिक आवाहन आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज केले.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शिवसेनेने मुंबईत आयोजित केलेल्या 'गर्जा जयजयकार' कार्यक्रमात बाळासाहेबांनी आज हजेरी लावली. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते मनोहर जोशी उपस्थित होते.

भाषणाला सुरुवात करतानाच बाळासाहेब म्हणाले, तुम्ही काय केलेत हे? कोणाला निवडून दिले? किती वेळा? पहिले पाढे पंचावन्न...आता जमलेल्यांनी जरी उचलले असते, तरी सर्वत्र भगवा रंग दिसला असता.ही खंत व्यक्त करतानाच त्यांनी फिल्डमार्शल करिअप्पांची आठवण सांगितली. आम्ही करिअप्पांना ठाण्यातून उभे केले. पडले ते. शिवसेनेच्या मेळाव्यातील विराट समूह पाहून म्हणाले, ही मतं गेली कुठे?

महाराष्ट्र शिवसेनेने जगवला आहे. संभाजीराजांचे हाल हाल करून मारले. म्हणून आम्ही औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर केले. उस्मानाबादचे नाव धाराशिव ठेवले. आता अजूनही आपल्याकडे औरंगाबाद रोड आहेत.

50 वर्षे झाली तरी मराठीसाठी रडावे लागते शी.. शी...आपणच मराठी भाषेचा वापर करून ती वाढवली पाहिजे, टिकवली पाहिजे. केवळ दर 1 मे रोजी हुतात्मा स्मारकावर फुलं वाहून चालणार नाही. शिवतिर्थावर आम्ही संयुक्त महाराष्ट्राचे दालन उघडले आहे. तुमचे थंड रक्त उसळेल ते पाहून.

मुंबईत चाळी पडत आहेत. टॉवर्स उभे राहत आहेत. मंत्रीमंडळाचा रिमोट आता माझ्या हातात नाही. पण शिवसेनेचा भगवा मुंबईवर फडकत ठेवा. शिवसेनेलाच निवडून द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तर याचवेळी सीमाभाग महाराष्ट्रात आल्यानंतरच आपण पुढचे भाषण करू, असे बाबासाहेब पुरंदरे म्हणाले. त्यावर हा सीमाभाग महाराष्ट्रात आलाच पाहिजे. पण त्यासाठी मराठी माणसानेच स्वाभीमानाने उभे राहिले पाहिजे, असेही बाळासाहेब म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2010 04:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...