धन्य माझी मायभूमी मराठी...

30 एप्रिलमहाराष्ट्रात जन्मलो आणि वाढलो याचा मला सार्थ अभिमान आहे. या महाराष्ट्राच्या मातीत दम आहे. म्हणूनच अनेक हिरे इथे जन्माला आले. मी माझ्या मुलांवरही या महाराष्ट्र संस्कृतीचे संस्कार करतो आहे...हे भावपूर्ण उद्गार आहेत, क्रिकेटच्या देवाचे...सचिन तेंडुलकरचे! महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सचिनचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्याला सोन्याची मूठ असलेली भवानी तलवारीची प्रतिकृती देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, अभिनेते सचिन पिळगावकर उपस्थित होते. राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मनसेच्या 'महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते पाच हुतात्म्यांच्या नातेवाईकांचाही सत्कार करण्यात आला. हुतात्मा रामनाथ पांडुरंग अमृते, हुतात्मा विजय सदाशिव मढेकर, हुतात्मा पांडुरंग विष्णू वाळके, हुतात्मा अनंत विश्वनाथ गोलतकर, हुतात्मा विठ्ठल दौलत साळुंके यांच्या नातेवाईकांनी हा सत्कार स्वीकारला. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचाही सत्कार करण्यात आला.अजय-अतुल यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला रसिकांनी यावेळी मोठा प्रतिसाद दिला.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 1, 2010 10:41 AM IST

धन्य माझी मायभूमी मराठी...

30 एप्रिल

महाराष्ट्रात जन्मलो आणि वाढलो याचा मला सार्थ अभिमान आहे. या महाराष्ट्राच्या मातीत दम आहे. म्हणूनच अनेक हिरे इथे जन्माला आले. मी माझ्या मुलांवरही या महाराष्ट्र संस्कृतीचे संस्कार करतो आहे...हे भावपूर्ण उद्गार आहेत, क्रिकेटच्या देवाचे...सचिन तेंडुलकरचे!

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सचिनचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्याला सोन्याची मूठ असलेली भवानी तलवारीची प्रतिकृती देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, अभिनेते सचिन पिळगावकर उपस्थित होते.

राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मनसेच्या 'महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते पाच हुतात्म्यांच्या नातेवाईकांचाही सत्कार करण्यात आला.

हुतात्मा रामनाथ पांडुरंग अमृते, हुतात्मा विजय सदाशिव मढेकर, हुतात्मा पांडुरंग विष्णू वाळके, हुतात्मा अनंत विश्वनाथ गोलतकर, हुतात्मा विठ्ठल दौलत साळुंके यांच्या नातेवाईकांनी हा सत्कार स्वीकारला.

माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचाही सत्कार करण्यात आला.

अजय-अतुल यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला रसिकांनी यावेळी मोठा प्रतिसाद दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2010 10:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...