खापर पुन्हा मराठी माणसावर...

खापर पुन्हा मराठी माणसावर...

7 फेब्रुवारीराहुल गांधींच्या विरोधात आंदोलन फसल्यामुळे निराश झालेल्या शिवसेनेने आता अपयशाचे खापर पुन्हा एकदा मराठी माणसावरच फोडले आहे. राहुल विरोधी आंदोलनात लोक उतरले नसतील तर त्यांनीच आता विचार करण्याची गरज आहे, असे शिवसेनेचे नेते मनोहर जोशी म्हणाले आहेत. ते ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. जोशींच्या आजच्या वक्तव्यामुळे राहुल यांच्या विरोधातले आंदोलन फसल्याची कबुलीच शिवसेनेने दिल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या राहुल गांधींना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न पुरता फसला होता. त्यावर सेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर टीका करत आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा केला होता. पण आता आंदोलन फसल्याची कबुलीच सेने नेते देऊ लागले आहेत, हे यानिमित्ताने समोर आले आहे. 'सामना'च्या कालच्या अग्रलेखातही अशीच हताश भावना व्यक्त करण्यात आली होती. तसेच निवडणुकीत अपयश आल्यानंतरही 'मराठी माणसानेच पाठीत खंजीर खुपसला' असे शिवसेनेने म्हटले होते. दरम्यान आजच शिवसेना स्वत:हून शाहरूखला 'मातोश्री'वर बोलवणार नाही. त्याने नस्ती उठाठेव करू नये. राजकारण हा त्याचा प्रांत नाही, असा सल्ला मनोहर जोशींनी नागपूर इथे दिला आहे. शाहरुखच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याच वेळी हिंदी-मराठी भाषिक वादात शिवसेनेचे भाजपशी मतभेद आहेत, असेही त्यांनी मान्य केले आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2010 10:26 AM IST

ताज्या बातम्या