H1N1 च्या पार्श्वभूमीवर दहीहंडी मंडळांनी घेतली खबरदारी

12 ऑगस्टH1N1चा वाढता प्रसार लक्षात घेता पुणे,मुंबई, नाशिक या शहरांमध्ये काही मंडळांनी यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी उत्सवाच्या ठिकाणची गर्दी मंडळांनी हाताळावी असं आवाहन केलं होतं. दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा न करता प्रतिकात्मक पूजा करुन साजरा करा असं आवाहन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. या पाश्‍र्वभूमीवर गर्दीचा जल्लोष टाळून हा उत्सव साधेपणानेच साजरा करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेपाठोपाठ मनसेनेही आपल्या सगळ्या दहीहंड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानने यावर्षी H1N1च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना रस्त्यावर येण्यापेक्षा दहीहंडी टिव्हीवर पाहण्याचं आवाहन केलं आहे. H1N1चा संसर्ग उत्सव पाहणा•यांना होऊ नये यासाठी काही मंडळांनी मास्क पुरवण्याचाही निर्णय घेतला आहे. त्याबरोबरच खबरदारी म्हणून उत्सवाच्या ठिकाणी ICU व्हॅन आणि ऍम्ब्यूलन्स सज्ज ठेवण्याचा निर्णय संस्कृती प्रतिष्ठानने घेतला आहे. नवी मुंबईतही H1N1फैलाव वाढतो आहे. त्यामुळे तिथल्याही काही मंडळांनी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून नागरीकांनी लहान मुलांना उत्सवाच्या ठिकाणी घेवून येऊ नये असं आवाहन काही मंडळांनी केलं आहे. यातच जर मुख्यमंत्र्यांनी यावर्षीचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला तर आमचा त्याला पाठिंबा राहील असं काही मंडळांंनी सांगितलं आहे. अशा परिस्थित दहीहंडी उत्सव कसा साजरा करायचा याचा निर्णय या बैठकित घेणार असं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे.पुण्यामध्ये H1N1 वाढता प्रसार आणि उत्सवा निमित्तानं होणारी गर्दी लक्षात घेता दोन मोठ्या मंडळांनी दहीहंडीचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे यात पुण्यातल्या अखिल मंडई मंडळ आणि दगडूशेट हलवाई गणेश मंडळाचा समावेश आहे. त्याप्रमाणे दहिहंडी निमित्त होणा•या देखाव्याचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. H1N1च्या वाढत्या प्रसाराबद्दल लोकांनी घाबरुन जाऊ नये असं अवाहनही पुण्यतल्या काही मंडळांनी केलं. बारामतीमधलाही दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. याशिवाय दहीहंडी फोडण्यासाठी पुण्यात न जाण्याचा निर्णय बारामतीतल्या गोविंदा पथकांनी घेतला आहे. दहीहंडीसाठी ही पथकं दरवर्षी पुण्यात येत असतात. पुण्यातल्या H1N1ची परिस्थिती पाहून गोविंदांनी हा निर्णय घेतला आहे. H1N1च्या संसर्गापासून बचाव करण्यासाठीचा एक भाग म्हणून नाशिकमधला दिशा संस्थेचा सर्वात मोठा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. ही सर्वात मोठी दहीहंडी आहे, H1N1चा संसर्ग पसरु नये म्हणून ही दहीहंडी रद्द केल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2009 10:22 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2009 10:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...