राजीव गांधींना 18 व्या पुण्यतिथीनिमित्त वीर भूमीत आदरांजली

21 मे, आज गुरूवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 18 वी पुण्यतिथी आहे. दिल्लीत वीर भूमी इथे राजीव गांधींच्या समाधी स्थळावर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरी केली जातेय. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 21 मे 1991 राजीव गांधी यांची लिट्टेच्या मानवी बॉम्बनं हत्या केली होती. श्रीपेरुंबुदूरमध्ये एका प्रचारसभेदरम्यान लिट्टेनं घडवून आणलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात राजीव गांधीसह 50 जणांचा बळी गेला होता. राजीव गांधी यांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना सलाम देऊन आज देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची काल बुधवारी संध्याकाळी भेट घेतली. शुक्रवारी 22 तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. आज 21 मे ला गुरूवारी राजीव गांधींचा स्मृतीदिन आहे. त्यामुळेच काँग्रेसनं हा शपथविधी 22 तारखेला म्हणजे शुक्रवारी ठेवल्याचं समजतंय.

  • Share this:

First published: May 21, 2009, 9:32 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading