आयबीएन-लोकमतचा पहिला वाढदिवस

आयबीएन-लोकमतचा पहिला वाढदिवस

27 मार्च, मुंबईआज गुढीपाडवा. मराठी नववर्ष. सण नाविन्याचा...मांगल्याचा...याच मंगल प्रसंगी एक वर्षापूर्वी आयबीएन लोकमतने मराठी टीव्ही चॅनलच्या विश्वात पाऊल ठेवलं. बघता बघता आयबीएन-लोकमतला एक वर्ष पूर्ण झालं. टीव्ही जर्नलिजमच्या विश्वात नव्या पर्वाची गुढी उभारली...आयबीएन-लोकमतनं.टीव्ही जर्नालिझममध्ये आयबीएन-लोकमतने इतिहास घडवला. बातम्या तर सर्वच जण देतात पण आम्ही चाकोरीबद्ध बातम्या देण्याऐवजी वेगळ्या धाटणीच्या बातम्या देण्याचं पथ्य पाळलं. बातमीच्या मुळाशी गेलो आणि सतत आमच्या दर्शकांना खरी बातमी दिली. त्यातील काही बातम्या ठरल्या सर्वप्रथम तर काही बातम्यांनी इतिहास घडवला. आयबीएन-लोकमतवरील बातम्यांचा इम्पॅक्ट झाला. या काळात आम्ही अनेक कॅम्पेन्स राबवली. जिथं समस्या होत्या, लोकांवर अन्याय सुरू होता त्या-त्या ठिकाणी आम्ही धडक पोहोचलो. आमच्या या अभियानात सर्वसामान्यांनाही सहभागी केलं आणि सुरू केली सिटिजन जर्नलिस्टची चळवळ. त्यामुळे लोकही निर्भीडपणे बोलू लागले. सर्वोत्तम देणं, बातमीतलं सत्य सांगणं हा आम्ही आमचा धर्म मानला. त्यामुळे आमची प्रत्येक बातमी सर्वोत्कृष्ट ठरली. मग ते खेळाचं मैदान असो किंवा राजकारणाचा आखाडा...26 नोव्हेंबरसारख्या घटनांचा थरारही आम्ही टिपला. हे सारं करताना सामाजिक भानही जपलं आणि लोकांना नेमकं काय हवं ते टिपलं. सणांची मजा...मग ते पारंपरिक सण असो किंवा राष्ट्रीय... प्रत्येक क्षणाची मजा आयबीएन-लोकमतच्या दर्शकांच्या आयुष्यात आणून नवे रंग भरण्याचा प्रयत्न आवर्जून केला. मराठी माणसाला प्रथमच शेअरमार्केटच्या रडारावर आणलं. ' आजचा सवाल ', ' ग्रेट भेट ', ' रिपोर्ताज ' आणि तरूणाईचे अंतरंग टिपणा-या ' युथट्युब 'सारख्या कार्यक्रमांची मेजवानीही सोबत आणली. लोकांची बातम्यांची भूक आम्ही भागवली. आयबीएन-लोकमत लोकांचा खरा साथी बनला. त्यांच्या सुःख...दुःखातील सोबती असा लौकिक ' आयबीएन लोकमत 'नं मिळवला ते उगाच नाही... ? आयबीएन-लोकमतच्या एक वर्षातील वाटचालीवर टाकलेला दृष्टिक्षेप पाहाण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2009 08:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading