तिस-या आघाडीची कर्नाटकमध्ये जाहीर सभा

तिस-या आघाडीची कर्नाटकमध्ये जाहीर सभा

12 मार्चनिवडणुकीच्या तोंडावर जागावाटपावरून एनडीए आणि युपीएच्या मित्रपक्षांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. ही दुही पाहून तिस-या आघाडीनं सत्तेत येण्यासाठी जमवाजमव सुरू केली आहे. तिस-या आघाडीची आज कर्नाटकमध्ये जाहीर सभा होणार आहे. पण त्यांच्यातले मतभेदही आता उघड होऊ लागले आहेत.कर्नाटकमधल्या सभेत आठ राजकीय पक्ष एकाच व्यासपीठावर येऊन तिस-या आघाडीची घोषणा करणार आहेत. पण शक्तीप्रदर्शनाच्या या कार्यक्रमातून काही नेत्यांनी अंग काढल्याचं दिसतंय. मायावती या रॅलीत सहभागी होणार नाहीत, तर जयललिता इथं आपला प्रतिनिधी पाठवणार आहेत. असं असलं तरी बिजेडी आणि भाजपमध्ये झालेला बेबनाव तिस-या आघाडीसाठी उत्साहवर्धक ठरला आहे. माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी आम्ही सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन करत आहोत असं म्हटलंय. या तिस-या आघाडीला निवडणुकीनंतर जास्त महत्त्व येऊ शकतं असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसंच निवडणुकीनंतरसुद्धा काही पक्ष तिस-या आघाडीत सहभागी होऊ शकतात. पण, भाजप आणि काँग्रेसला संपवण्याची भाषा करणा-या तिस-या आघाडीतल्या काही पक्षांविषयीही शंका आहे. कारण निवडणुकीच्या निकालानंतर त्यापैकी काही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एनडीए किंवा युपीएला पाठिंबा देऊ शकतात.

  • Share this:

First published: March 12, 2009, 7:20 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading