मराठी बातम्या /बातम्या /कार्यक्रम /

गर्जा महाराष्ट्र : स्त्री मुक्ती संघटना

गर्जा महाराष्ट्र : स्त्री मुक्ती संघटना

हुंडाबळी, स्त्रियांना मारहाण, विनयभंग, बलात्कार, स्त्रीभ्रूणहत्या, निरक्षरता, पुरुषसत्ताक समाज, स्त्रियांना दुय्यम स्थान, लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक छळ वर्षानुवर्षांची ही परिस्थिती याला जबाबदार कोण ?याच अस्वस्थेतून एकत्र आल्या काही उच्चशिक्षित तरुणी.. आणि त्यांच्या कार्याला कारण घडलं संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 साली जाहीर केलेलं महिला वर्ष.. आणि त्यासंबंधीचा अहवाल. असा विचार करून 1975 साली आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने ऑक्टोबरमध्ये पुण्यात स्त्री-मुक्ती संघर्ष परिषद भरवण्यात आली. यासाठी गाणी, प्रदर्शने, पोस्टर्स, आणि स्त्री-मुक्ती चळवळीच्या जाहिरनाम्याचीही तयारी झाली. आणीबाणी जाहीर झालेली असूनही परिषदेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून शेकडो स्त्रिया एकत्र आल्या होत्या. आज स्त्री-मुक्ती संघटनेचं कार्य वेगवेगळ्या माध्यमातून आणि उपक्रमातून दिसत असलं तरीही ही वाटचाल सोपी नव्हती..सुरुवातीच्या काळात संघटनेच्या कलापथकाने शेकडो गाणी लिहून, त्याचे कार्यक्रम करून प्रबोधनाचं काम केलं. १९७९ आणि ८० साली देशभरात झालेल्या हुंडाविरोधी चळवळ आणि बलात्कार विरोधी चळवळ या कायदा बदलणा-या चळवळींमध्ये संघटनेचा मोलाचा सहभाग होता. याच संदर्भात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कलापथकाने 'मुलगी झाली हो' नाटक लिहिलं. आणि त्याने इतिहास घडवला. एका नाटकावर थांबून न राहता या कलापथकाने स्त्रियांच्या प्रश्नावर विविध नाटकांची निर्मिती केली, महाराष्ट्रभरात दौरे करून यात्रा आणि कॅम्पेन्सद्वारा संघटनेनं स्त्री-मुक्तीचा विचार गावागावात पोहोचवला. मुखपत्राशिवाय संघटनेनं प्रकाशित केलेली पुस्तकं पाहिली तर लक्षात येतं की वरवर काम न करता निवडलेल्या क्षेत्रात मूळापर्यंत जाऊन आखीव आणि बांधीव काम करण्यावर कसा भर दिला. २००९ साली स्त्री मुक्ती संघटनेने आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय नाट्य लेखिका परिषदही याच धोरणात्मक कामाचं उदाहरण. एका इमारतीतील छोट्याशा ऑफिसपासून सुरू झालेला हा प्रवास.. आज राज्याच्या, देशाच्या सीमा पार करून कित्येक स्त्रियांना त्यांच्या न्याय्य हक्काचं अर्ध आकाश मिळवून देता झाला आहे.

पुढे वाचा ...

हुंडाबळी, स्त्रियांना मारहाण, विनयभंग, बलात्कार, स्त्रीभ्रूणहत्या, निरक्षरता, पुरुषसत्ताक समाज, स्त्रियांना दुय्यम स्थान, लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक छळ वर्षानुवर्षांची ही परिस्थिती याला जबाबदार कोण ?

याच अस्वस्थेतून एकत्र आल्या काही उच्चशिक्षित तरुणी.. आणि त्यांच्या कार्याला कारण घडलं संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 साली जाहीर केलेलं महिला वर्ष.. आणि त्यासंबंधीचा अहवाल. असा विचार करून 1975 साली आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने ऑक्टोबरमध्ये पुण्यात स्त्री-मुक्ती संघर्ष परिषद भरवण्यात आली. यासाठी गाणी, प्रदर्शने, पोस्टर्स, आणि स्त्री-मुक्ती चळवळीच्या जाहिरनाम्याचीही तयारी झाली. आणीबाणी जाहीर झालेली असूनही परिषदेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून शेकडो स्त्रिया एकत्र आल्या होत्या. आज स्त्री-मुक्ती संघटनेचं कार्य वेगवेगळ्या माध्यमातून आणि उपक्रमातून दिसत असलं तरीही ही वाटचाल सोपी नव्हती..

सुरुवातीच्या काळात संघटनेच्या कलापथकाने शेकडो गाणी लिहून, त्याचे कार्यक्रम करून प्रबोधनाचं काम केलं. १९७९ आणि ८० साली देशभरात झालेल्या हुंडाविरोधी चळवळ आणि बलात्कार विरोधी चळवळ या कायदा बदलणा-या चळवळींमध्ये संघटनेचा मोलाचा सहभाग होता. याच संदर्भात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कलापथकाने 'मुलगी झाली हो' नाटक लिहिलं. आणि त्याने इतिहास घडवला.

एका नाटकावर थांबून न राहता या कलापथकाने स्त्रियांच्या प्रश्नावर विविध नाटकांची निर्मिती केली, महाराष्ट्रभरात दौरे करून यात्रा आणि कॅम्पेन्सद्वारा संघटनेनं स्त्री-मुक्तीचा विचार गावागावात पोहोचवला. मुखपत्राशिवाय संघटनेनं प्रकाशित केलेली पुस्तकं पाहिली तर लक्षात येतं की वरवर काम न करता निवडलेल्या क्षेत्रात मूळापर्यंत जाऊन आखीव आणि बांधीव काम करण्यावर कसा भर दिला.

२००९ साली स्त्री मुक्ती संघटनेने आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय नाट्य लेखिका परिषदही याच धोरणात्मक कामाचं उदाहरण. एका इमारतीतील छोट्याशा ऑफिसपासून सुरू झालेला हा प्रवास.. आज राज्याच्या, देशाच्या सीमा पार करून कित्येक स्त्रियांना त्यांच्या न्याय्य हक्काचं अर्ध आकाश मिळवून देता झाला आहे.

First published: