मराठी बातम्या /बातम्या /कार्यक्रम /

गर्जा महाराष्ट्र : पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर

शौर्य, हिंमत आणि जिद्द यांचा एक अध्याय जेव्हा संपला तेव्हा या इथं त्याला जोडूनच एक दुसरा अध्याय सुरू झाला. एका न थकणार्‍या हिंमतीचा. एका न हरणार्‍या जिद्दीचा कारण यांच्या धमन्यांमधून वाहणारं रक्त रडणारं नव्हतं तर ते लढणारं होतं. कारण या रक्ताला सहानुभूतीची अपेक्षा नव्हती आणि नाही कारण ते रक्त होतं आणि आहे फौजीचं. असे अनेक फौजी पुण्याच्या पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये तुम्हाला पहायला मिळतील. लढताना, विविध लष्करी सेवांमध्ये काम करताना झालेल्या गंभीर दुखापतींमुळे पॅराप्लेजिक झालेल्या तिन्ही दलातील जवानांचं पूनर्वसन इथे केलं जातं. 1974 साली हे सेंटर स्थापन झालं. विविध लष्करी सेवेतील 109 जवानांसाठी इथे कायमस्वरुपी राहण्याची सोय आहे. अनेकजण इथल्या उपचारांचा लाभ घेऊन आपल्या घरी गेले आहेत. 26 जवानांना त्यांच्या कुटुंबीयांसकट इथे पुनर्वसनाची संधी प्राप्त झालीय. दक्षिण आशियाई देशांमधलं अशाप्रकारचं हे सगळ्यात मोठं सेंटर.तर काही जवान वेगवेगळ्या खेळादरम्यान किंवा ड्रायव्हिंग करताना झालेल्या अपघातात पॅराप्लेजिक झालेले आहेत. या सर्वांचं आताचं आयुष्य हे व्हीलचेअरवरचं आहे. व्हीलचेअरचा वापर करून जास्तीत जास्त स्वावलंबी होण्याचं प्रशिक्षण त्यांना इथे दिलं जातं. मेजर बिश्त कार चालवण्यापासून स्वतःची बहुतेक सर्व कामं स्वतःचं करतात. इथला प्रत्येक जण सैन्यात तर दाखल झालेला वेगळी स्वप्न घेऊन. पण आता एक नवीच लढाई त्याला लढाई लागती. स्पायनल कॉर्ड इंजुरीमुळे आलेल्या परावलंबीपणाची. या लढाईत या जवानांनी आपली शस्त्र टाकू नयेत म्हणून या सेंटरतर्फे हरप्रकारे प्रयत्न केला जातोय. शारीरिक आणि मानसिक पूनर्वसनासोबतच आर्थिक पूनर्वसनाकडे इथे लक्ष पुरवलं जातं. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वर्कशॉप्स चालवली जातात. यात त्यांच्या कुटुंबीयांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. आणि एक प्रमुख काळजी इथे घेतली जाते ती यांच्या सेक्शुअल रिहॅबिलिटेशनची. इथे प्रत्येकजण संगणक साक्षर आहे, इंटरनेट सॅव्ही आहे. आपापल्या आजारासंबंधीची माहिती, जगभरात त्यावर होणारी संशोधनं याची माहिती तो घेत असतो. एल सिट्लहऊ सध्या स्वतःच लिहिलेल्या गाण्यावरचा अल्बम पाहतायत. मणिपूरमधल्या एका ग्रामीण बोलीभाषेतलं हे गाणं त्यांच्या मुलीने गायलंय.सिटलहाऊंप्रमाणे अशाप्रकारे कोण पुढल्या जन्मीची स्वप्न बघतोय. तर कोण तीन युद्ध लढल्यावरही सीमेवर जाऊन याच जन्मात कुर्बान होण्याचं स्वप्न जपतोय. अशी जगण्याची ही जीजिविषा आणि झुंजण्याची ही जिद्द इथे ठायी ठायी आहे. मर्ढेकर म्हणतात त्याप्रमाणे, "या दुःखाच्या कढईची गा अशीच देवा घडण असू दे... जळून गेल्या लोखंडातही जळण्याची पण पुन्हा ठसू दे...कणखर शक्ती... ताकद बळकट...हे ते ठिकाण आहे... हे असं ठिकाण आहे...

पुढे वाचा ...

शौर्य, हिंमत आणि जिद्द यांचा एक अध्याय जेव्हा संपला तेव्हा या इथं त्याला जोडूनच एक दुसरा अध्याय सुरू झाला. एका न थकणार्‍या हिंमतीचा. एका न हरणार्‍या जिद्दीचा कारण यांच्या धमन्यांमधून वाहणारं रक्त रडणारं नव्हतं तर ते लढणारं होतं. कारण या रक्ताला सहानुभूतीची अपेक्षा नव्हती आणि नाही कारण ते रक्त होतं आणि आहे फौजीचं. असे अनेक फौजी पुण्याच्या पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये तुम्हाला पहायला मिळतील. लढताना, विविध लष्करी सेवांमध्ये काम करताना झालेल्या गंभीर दुखापतींमुळे पॅराप्लेजिक झालेल्या तिन्ही दलातील जवानांचं पूनर्वसन इथे केलं जातं. 1974 साली हे सेंटर स्थापन झालं.

विविध लष्करी सेवेतील 109 जवानांसाठी इथे कायमस्वरुपी राहण्याची सोय आहे. अनेकजण इथल्या उपचारांचा लाभ घेऊन आपल्या घरी गेले आहेत. 26 जवानांना त्यांच्या कुटुंबीयांसकट इथे पुनर्वसनाची संधी प्राप्त झालीय. दक्षिण आशियाई देशांमधलं अशाप्रकारचं हे सगळ्यात मोठं सेंटर.

तर काही जवान वेगवेगळ्या खेळादरम्यान किंवा ड्रायव्हिंग करताना झालेल्या अपघातात पॅराप्लेजिक झालेले आहेत. या सर्वांचं आताचं आयुष्य हे व्हीलचेअरवरचं आहे. व्हीलचेअरचा वापर करून जास्तीत जास्त स्वावलंबी होण्याचं प्रशिक्षण त्यांना इथे दिलं जातं.

मेजर बिश्त कार चालवण्यापासून स्वतःची बहुतेक सर्व कामं स्वतःचं करतात. इथला प्रत्येक जण सैन्यात तर दाखल झालेला वेगळी स्वप्न घेऊन. पण आता एक नवीच लढाई त्याला लढाई लागती. स्पायनल कॉर्ड इंजुरीमुळे आलेल्या परावलंबीपणाची. या लढाईत या जवानांनी आपली शस्त्र टाकू नयेत म्हणून या सेंटरतर्फे हरप्रकारे प्रयत्न केला जातोय. शारीरिक आणि मानसिक पूनर्वसनासोबतच आर्थिक पूनर्वसनाकडे इथे लक्ष पुरवलं जातं. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वर्कशॉप्स चालवली जातात. यात त्यांच्या कुटुंबीयांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. आणि एक प्रमुख काळजी इथे घेतली जाते ती यांच्या सेक्शुअल रिहॅबिलिटेशनची.

इथे प्रत्येकजण संगणक साक्षर आहे, इंटरनेट सॅव्ही आहे. आपापल्या आजारासंबंधीची माहिती, जगभरात त्यावर होणारी संशोधनं याची माहिती तो घेत असतो. एल सिट्लहऊ सध्या स्वतःच लिहिलेल्या गाण्यावरचा अल्बम पाहतायत. मणिपूरमधल्या एका ग्रामीण बोलीभाषेतलं हे गाणं त्यांच्या मुलीने गायलंय.सिटलहाऊंप्रमाणे अशाप्रकारे कोण पुढल्या जन्मीची स्वप्न बघतोय. तर कोण तीन युद्ध लढल्यावरही सीमेवर जाऊन याच जन्मात कुर्बान होण्याचं स्वप्न जपतोय. अशी जगण्याची ही जीजिविषा आणि झुंजण्याची ही जिद्द इथे ठायी ठायी आहे. मर्ढेकर म्हणतात त्याप्रमाणे, "या दुःखाच्या कढईची गा अशीच देवा घडण असू दे... जळून गेल्या लोखंडातही जळण्याची पण पुन्हा ठसू दे...कणखर शक्ती... ताकद बळकट...हे ते ठिकाण आहे... हे असं ठिकाण आहे...

First published: