मराठी बातम्या /बातम्या /कार्यक्रम /

गर्जा महाराष्ट्र : नॅशनल डिफेन्स अॅकेडमी (एनडीए)

" जब एक गोली निकलती है तब वो सर से पाव तक मेहसूस होती है, एनडीएमे आने के लिये मेहनत नही वो जसबा होना जरुरी है, वो जुनून चाहिये एक एनडीए कॅडेट आपको हर चीज मे आगे मिलेगा, चाहे वो फिजिकल, मेंटल, सोशल या कोई भी क्रायटेरिया हो.... एनडीए देश की जान है.."एनडीए... नॅशनल डिफेन्स अॅकेडमी... आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलांसाठी ऑफिसर्स घडवणारी, कॅडेट्स... त्यांची मनं आणि मनगटं तयार करणारी ही संस्था. जी आहे पुण्याच्या खडकवासला येथे. सात हजार एकरहूनही जास्त भूभाग व्यापून असलेलं हे महाराष्ट्राचं भूषण. देशाचं भूषण. पराक्रम, शौर्य आणि धैर्याची ही वीरगाथा.हे धैर्य, हे शौर्य आणि हा पराक्रम तुला जाणवत राहतो सतत. कारण तुम्ही एनडीएत प्रवेश करताय हे तुमच्या मनात असतं आणि हळूहळू ते तुमच्या रक्तात भिनतं. याचंच मूर्तस्वरुप तुम्हाला दिसतं ते पाषाण गेटच्या सुरुवातीलाच असलेल्या एनडीएच्या बोधचिन्हावरून. आर्मीचा लढवय्येपणा, सागरावर राज्य गाजवणारा नौसेनेचा अथांग धीरोद्दातपणा आणि नभ आक्रमिणा-या वायुसेनेचा 'हिमालयन इगल' या तिघांचा अंतर्भाव असलेलं एनडीएचं हे बोधचिन्ह. जे सदैव झळकत असतं एनडीएच्या ध्वजावर. हा तो ध्वज ज्यानं माणसं घडवली देशाचा ध्वज कधीही खाली न पडू देणारी.एनडीएचं प्रोडक्ट, एनडीएचे कॅडेट्स आहेत. हे असे कॅडेट्स ज्यांना वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी एनडीए उचलतं आणि चार वर्षात त्याचा कायापालट करून त्याला बनवतं मिलिट्रीलिडर.असं तन, असं मन, अशी बुद्धी, अशी नीती, अशी मनगटं आणि अशी माणसं घडवणारी ही संस्था. एका भव्य ध्येयाने झपाटलेली आणि याच भव्यतेचं प्रतीक हा सुदान ब्लॉक. प्रत्येक कॅडेटच्या मनात ही इमारत अभेद्य आहे. आणि 'अक्षर' आहेत इथली अक्षरं... 'सर्व्ह बिफोर सेल्फ'. लॉर्ड माऊंटबेटनच्या प्रयत्नातून एनडीएच्या स्थापनेला चालना मिळाली. दुस-या महायुद्धात भारतीय सैन्याने सुदानच्या संरक्षणासाठी गाजवलेला पराक्रम आणि त्याग याने प्रभावित होऊन सुदान सरकारने एक हजार पौंडची मदत केली होती. ती रक्कम या इमारतीच्या निर्मीतीसाठी वापरण्यात आली. म्हणूनच याचं नाव सुदान ब्लॉक. १९४९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. आज भारतासह इतरही इतरही मित्रराष्ट्रातले कॅडेट्स इथे येऊन ट्रेनिंग घेतात. एनडीए हे एक ब्रँड नेम आहे. तिन्ही दलांचं प्रशिक्षण एकत्रितरीत्या देणारी ही जगातली पहिली सैनिकी संस्था. बारावीनंतर १९ वयोगटाच्या आतील विद्यार्थी इथे प्रवेश घेऊ शकतो. त्यासाठी प्रवेश परीक्षा असते. आणि नंतर तुमची वैद्यकीय चाचणी आणि इंटरव्ह्यू. या सगळ्यातून बाहेर पडल्यावर सुरू होतो प्रशिक्षणाचा खडतर कालावधी. देशभक्तीच्या, स्वातंत्र्यसमराच्या स्फूर्तीदायी आठवणींनी, यशोगाथांनी, रक्ताच्या थेंबा-थेंबाची किंमत मोजून इंच इंच लढवणा-या जवानांच्या शौर्यस्मृतींनी आणि आयुष्याची आहुती देणा-या प्रखर तेजस्वी बलिदानांनी या प्रशिक्षण काळात इथल्या प्रत्येकाची मनं प्रज्ज्वलित होत असतात. इथल्या कॅडेट्सनीच बांधलेलं हे शहीद स्मारक एनडीएच्या प्रत्येक सुपुत्राची आठवण जिवंत ठेवतं. 3 परमवीर चक्र, ७ अशोकचक्र, २ सर्वोत्तम युद्धसेवा मेडल, ९० परमविशिष्ठ सेवा मेडल, ३१ महावीर चक्र, ३१ कीर्तीचक्र, १५८ अतिविशिष्ठ सेवा मेडल, १४७ वीर चक्र, ११२ शौर्य चक्र, २५८ विशिष्ठ सेवा मेडल, ३०८ सेना, नौसेना, वायुसेना मेडल. एनडीएच्या वीरांची ही गाथा न संपणारी आहे.

पुढे वाचा ...

First published: