

गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेलया सिरीयल रेपिस्ट हा कोणालाच सापडत नव्हता. तो रेल्वेने प्रवास करायचा आणि आजूबाजूच्या परिसरातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करायचा. सिरीयल रेपिस्ट रेहान कुरेशी याला बुधवार 26 सप्टेबर रोजी सायंकाळी अटक करण्यात आली असल्याची माहिती गुरुवारी आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदे दिली.


तुझ्या अंगावर किडे पडलेत असं सांगून तो अल्पवयीन मुलींवर बलात्कार करायचा आणि त्यांना ठार मारण्याची धमकी द्यायचा.


त्याला पकडण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी मोठ्याप्रमाणात जनजागृती केली. आणि अखेरिस त्याचा शोध घेणाऱ्या तुळीज पोलीसांना यश आलं.


सिरीयल रेपीस्ट रेहान कुरेशी हा मिरारोड येथुन लोकल ट्रेनने निघायचा आणि गुन्हा करून परत मिरारोड स्टेशनला परतायचा, असे रात्रंदिवस केलेल्या तपासात निष्पन झालंय.


या माहितीच्या आधारे नवी मुंबई, मुंबई, ठाणे शहर आणि ग्रामीण जिल्हाचे पोलीस मिरारोड येथे तळ ठोकून होते. मिरारोडला राहणारा हा रेपीस्ट मिररोड स्टेशन परिसरात नवी मुंबई पोलीसाना गवसला. 2 वर्षा पासून फरार असलेला हा आरोपी पकडल्या मागे तुळींज पोलिसाचा मोलाचा वाटा आहे,


सिरीयल रेपिस्ट रेहान कुरेशी याला बुधवार 26 सप्टेबर रोजी सायंकाळी अटक करण्यात आली असल्याची माहिती गुरुवारी आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदे दिली.


या नराधमाने तब्बल 15 मुलींवर अत्याचार केलेत. नवी मुंबई 7, मुंबई 2, उरण 2 आणि पालघरमधील 4 अल्पवयीन मुलींवर त्याने बलात्कार केला.


घराच्या झडतीत सिरीयल रेपिस्टचे कपडे आणि चप्पल cctv मधील फुटेजेसला match झाल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.


विकृत मानसिकतेचा रेहान कुरेशी उत्तर प्रदेशातला राहणार आहे. मात्र, त्याचाकडून जप्त करण्यात आलेल्या पासपोर्टवर चेंबुरचा पत्ता आहे.


रेहानची मोंडस operenty वेगळी आहे. तुझ्या अंगावर किडे पडलेत असं सांगून तो अल्पवयीन मुलींवर बलात्कार करायचा.