

बहुतेक लोक व्यायाम सकाळीच करतात. हीच वेळ नाश्त्याचीदेखील असते. काही जण व्यायामाआधी नाश्ता करतात जेणेकरून ऊर्जा मिळेल तर काही जण व्यायामानंतर नाश्ता करतात. यापैकी कुणाची नाश्ता करण्याची वेळ योग्य आहे?


यूकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ बाथ आणि बर्मिंगहॅमच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार व्यायामानंतर नाश्ता केल्यानं जास्त फॅट बर्न होतात असं दिसून आलं आहे.


तज्ज्ञांनी मात्र उपाशीपोटी व्यायाम करण्यास हरकत नाही, पण शक्यतो तसं करू नये असा सल्ला दिला आहे.


जर मधुमेह किंवा इतर चयापचयसंबंधी समस्या असतील तर उपाशीपोटी व्यायाम करू नये असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.


मात्र व्यायाम करण्यापूर्वी काही खाणार असाल तर हलका नाश्ता करा. केळं किंवा इतर हलके पदार्थ खा. जड पदार्थ खाऊ नका, यामुळे अस्वस्थ वाटेल.


तर काही तज्ज्ञांनी सांगितलं ब्रेकफास्ट करण्यापूर्वी व्यायाम करणंही फायद्याचं आहे. इतकंच नव्हे तर व्यायाम करता करताही तुम्ही हलके पदार्थ खाण्यास हरकत नाही. कारण वर्कआऊट करताना फॅट्स बर्न होतात.