

व्हॉट्सअॅपचे स्टेटस अपडेशन हे दिवसेंदिवस बदलतं चाललंय. सर्वांत आधी तुम्हाला टेक्स्टच्या मार्फत व्हॉट्सअॅपचे स्टेटस ठेवण्याची सुविधा होती. त्यानंतर आता फोटो, व्हिडिओच्या मार्फत तुम्ही तुमचा स्टेटस ठेऊ शकतात. पण आता व्हॉट्सअॅप एक नवीन अपडेशनच्या तयारीत आहे.


सध्या या अपडेशनचे काम सुरू आहे आणि २०१९ मध्ये हे प्रेक्षकांच्या सेवेत येणार आहे. या अपडेशननंतर तुम्ही व्हिडिओ स्वरूपात स्टेटस ठेऊ शकता. तुम्ही याद्वारे पैसे देखील कमवू शकतात.


व्हॉट्सअॅपचे देशभरात १.५ अब्ज यूझर्स आहेत आणि त्यापैकी ४५ कोटी युजर्स हे रोज व्हॉट्सअॅप स्टेटस अपडेट करत असतात. तसंच इंस्टाग्रामचे दररोज सुमारे ४० कोटी युजर्स आहेत. इंस्टाग्रामच्या तुलनेत व्हॉट्सअॅपचे युझर्स जास्त असल्याने याचा फायदा नक्कीच व्हॉट्सअॅपला होणार आहे.


इंस्टाग्रामच्या तुलनेत व्हॉट्सअॅपचे युझर्स जास्त असल्याने याचा फायदा नक्कीच व्हॉट्सअॅपला होणार आहे.


व्हॉट्सअॅपचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मैट इडिमा म्हणाले की, हे स्टेटस अपडेशनचे फेसबुकच्या प्रोग्रामचाच एक भाग असणार आहे.


नुकतीच एक बातमी आली होती की, व्हॉट्सअॅपच्या सर्विससाठी पैसे मोजावे लागणार. पण त्यानंतर त्यांच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले होते की, फक्त मार्केटिंग आणि कस्टमर सर्व्हिसेज़च्या मेसेजसाठी पैसे द्यावे लागणार आहे. व्हॉट्सअॅपचे युझर्स कमी झाल्याने आर्थिक दृष्ट्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता.