

इंटरनेटमुळे जग वेगवान होतं आहे. ज्या वेगाने इंटरनेटने आजूबाजूच्या गोष्टी बदलल्या आहेत त्या थक्क करणाऱ्या आहेत. भारतात इंटरनेट डेटा स्वस्त असल्यामुळे अनेक जण तासंतास स्मार्टफोनवर असतात. जगभरात एका मिनिटात 18 कोटी ई-मेल पाठवले जातात. तर 45 लाख व्हिडिओ पाहिले जातात. तुम्ही इंटरनेटवर करत असलेल्या गोष्टींचा काय परिणाम होते हे वाचून तुम्हाल देखील आश्चर्य वाटेल. जाणून एका मिनिटात इंटनेटवर काय होतं.


सध्या व्हॅट्सअप,टेलिग्राफ सारख्या मेसेजिंग अॅप प्रचंड लोकप्रिय आहेत. असे असताना देखील जगभरात प्रत्येक मिनिटाला 1 कोटी 81 लाख टेक्स्ट मेसेज पाठवले जातात. तुम्हाला आठवते का तुम्ही शेवटचा टेक्स्ट मेसेज कधी केला होता.


फोटो शेअरिंगसाठी सर्वात लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामवर प्रत्येक मिनिटाला 55 हजार 140 फोटो शेअर केले जातात.


आपल्या सर्वांचा गुरु असलेला आणि जे हव ते सर्व एका क्लिकवर सांगणाऱ्या गुगलवर प्रत्येक मिनिटाला 44 लाख 97 हजार 420 सर्च केला जातो.


ऑनलाइन डेटिंगचे अनेक अॅप्स सध्या लोकप्रिय आहेत. यातील टिंडरवर प्रत्येक मिनिटाला 14 लाख वेळा स्वाइप केले जाते.


व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरले जाणारे लोकप्रिय स्काईपवर प्रत्येक मिनिटाला 2 लाख 31 हजार 840 कॉल्स येतात. पाहा यातील तुमचे कॉल किती असतात.


स्मार्टफोनमध्ये अॅप नसतील असे व्यक्ती भेटणार नाही. जगात प्रत्येक मिनिटाला 3 लाख 90 हजार 030 अॅप्स डाऊनलोड केले जातात.