बाजारात प्लास्टिकच्या तांदळाची चर्चा, तुम्ही खरंच नकली भात तर खात नाही ना?
अनेक गोष्टींमध्ये भेसळ झाल्याच्या बातम्या ऐकू येत आहेत. खाण्याच्या पदार्थांत भेसळ झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. या अशा प्रकारामुळे अनेक लोक आजारी पडतात, तसेच यामुळे अनेकांचा जीव देखील गेला आहे. भाज्यांपासून ते कडधान्य, तांदूळ, गहू यांची देखील भेसळ होते. ज्यामुळे लोकांना दररोज ते खात असलेली वस्तू भेसळयुक्त तर नाही ना असा प्रश्न पडतो.
मधल्या काळात तर तांदूळ हे प्लास्टिकचं बनून येतं असं आपण ऐकलं होतं. ज्यामुळे अनेकांच्या मनात याबद्दल शंका उत्पन्न झाली आहे.
2/ 8
प्लास्टिकचा तांदूळ आपल्या आरोग्यालाच हानी पोहोचवत नाही, तर कॅन्सरसारख्या घातक आजारालाही आमंत्रण देतो. हे ऐकल्यानंतर घाबरू नका, आज आम्ही तुम्हाला खरा-नकली तांदूळ ओळखण्याचा सोपा मार्ग सांगत आहोत. हे वाचल्यानंतर तुम्हाला कमी वेळात नकली तांदूळ ओळखता येतील.
3/ 8
खरंतर प्लास्टिकचा तांदूळ शिजवल्यानंतरही तो खोटा आहे की खरा हे समजू शकत नाही. ज्यामुळे तो ओळखता येणं कठीण आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन तुम्ही तांदूळ प्लास्टिकचा आहे की नाही हे कळेल.
4/ 8
सुंगंधावरुन होऊ शकते ओळख बासमती तांदूळ सुगंधी तांदूळ आहे, जो भारत, पाकिस्तान आणि नेपाळमध्ये केला जातो. हा तांदूळ पारदर्शक, बारीक आणि सुगंधीत आहे. तसेच तो शिजवल्यानंतर तांदळाची लांबी दुप्पट होते. हा भात शिजल्यावरही चिकटत नाही, पण थोडा फुगतो.
5/ 8
चुना मिसळून ओळखा तांदळाचे काही नमुने एका भांड्यात ठेवा. त्यात चुना आणि पाणी मिसळून त्याचं मिश्रण तयार करा. आता या द्रावणात तांदूळ भिजवून काही वेळ राहू द्या. काही वेळाने भाताचा रंग बदलला किंवा रंग सुटला तर समजून घ्या की हा तांदूळ बनावट आहे.
6/ 8
बनावट तांदूळ ओळखण्याचे काही टीप्स 1. थोडा तांदूळ गॅसवर किंवा आगीवर ठेवा, जळताना प्लास्टिक जळल्यासारखा वास येत असेल, तर समजा की तो प्लास्टिकचा तांदूळ आहे. २. तांदूळ प्लास्टीकचा असेल तर तो गरम तेलात टाकल्यावर वितळू लागेल.
7/ 8
3. प्लास्टीकचा तांदूळ पाण्यात टाकल्यावर तो तरंगायला लागतो. 4. प्लॅस्टिकचा तांदूळ उकळताना भांड्याच्या वरचा भाग जाड थरासारखा दिसतो.
8/ 8
5. याशिवाय एक उपाय म्हणजे तांदूळ शिजवल्यानंतर काही दिवस असेच राहू द्या, हा जर प्लास्टिकचा तांदूळ असेल तर त्याचा वास येणार नाही कारण तो कुजत नाही.