मादागास्करमधल्या (Madagaskar) मालागासी समाजात अशीच एक विचित्र परंपरा आहे. दर 7 वर्षांनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या या परंपरेचं नाव फामादिहाना. मालागासी समाजातले लोक आपल्या पूर्वजांचं दफन केलेलं पार्थिव कबरीतून काढून त्याला नव्या कपड्यांमध्ये पुन्हा गुंडाळतात आणि पुन्हा दफन करतात. त्यानंतर कबरीभोवती संगीतावर नृत्य केलं जातं. असं केल्याने पूर्वजांकडून त्यांना सुखी आणि संपन्न जीवनाचा आशीर्वाद मिळत असल्याचा, या समाजातल्या लोकांचा समज आहे.
जपानमध्ये (Japan) पेनिस फेस्टिव्हल (Penis Festival) म्हणजेच पुरुषाच्या लिंगाचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. या फेस्टिव्हलला जपानी भाषेत कानामारा मात्सुरी असं म्हणतात. या फेस्टिव्हलमध्ये श्रद्धाळू व्यक्ती पेनिसची प्रतिकृती तयार करून तिची मिरवणूक काढतात. या फेस्टिव्हलचं आयोजन दर वर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या रविवारी केलं जातं. हा फेस्टिव्हल साजरा केल्यामुळे सेक्स लाइफ (Sex Life) समाधानकारक आणि आनंदी राहतं, असं मानलं जातं.
तिबेटमध्ये (Tibet) मृत्यू झाल्यानंतर मृतदेह एका विशिष्ट डोंगरावर फरपटत नेला जातो आणि तिथे मृतदेहाचे बारीक तुकडे केले जातात. त्यानंतर ते तुकडे तेथे तसेच टाकून दिले जातात. मृत्यूनंतर शरीर कोणत्याही कामाचं नसतं, असा विश्वास बौद्ध धर्मामध्ये आहे, त्यामुळे प्राण्यांचं पोट भरण्यासाठी मृतदेह तसाच सोडून देण्याची पद्धत तिथे आहे.
कंबोडियातले (Cambodia) नागरिक आपल्या मुलींसाठी असं काही करतात, की त्याची कल्पनाही करणं कठीण. मुलीचे पीरियड्स अर्थात मासिक पाळी सुरू झाल्यानंतर म्हणजेच ती 13 ते 15 वर्षाची झाल्यानंतर मुलीचा पिता तिच्यासाठी वेगळी झोपडी बांधतो. या झोपडीत झोपण्यासाठी एक बेड आणि अन्य गरजेच्या वस्तू ठेवल्या जातात. याला कंबोडियात लव्ह हट म्हणतात. यानंतर तिथले पालक आपल्या मुलीला तिचा पती निवडता यावा याकरिता मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचं स्वातंत्र्य देतात. जोपर्यंत मुलीला आपल्या आवडीचा पती मिळत नाही, तोपर्यंत ती असं करू शकते. मुलीने आपल्या नियोजित पतीची निवड केल्यानंतर तिचा त्या मुलाशी विवाह लावण्यात येतो.
इंडोनेशियातल्या (Indonesia) तिदोंग समाजात एक अजब प्रथा प्रचलित आहे. या प्रथेनुसार तिथली नवदांपत्यं लग्नानंतर 3 दिवस बाथरूमचा वापर करू शकत नाहीत. याचाच अर्थ ते 3 दिवस ना शौचाला जाऊ शकत, ना मूत्रविसर्जन करू शकत. तसंच आंघोळ करण्यावरही 3 दिवस बंदी असते. यातून या नवदांपत्यांच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जाते. हे केल्यास वैवाहिक आयुष्य चांगलं जातं, असा त्यांचा विश्वास आहे.