कलर प्लेट सारखं दिसतंय हे Colourful Home, किचनपासून टॉयलेटपर्यंत भन्नाट रंगांनी सजलंय घर
काही लोकांना आपल्या घरात पांढऱ्या किंवा क्रिम-ऑफ व्हॉइटसारखे क्लासी कलर्स आवडतात. तर काही लोकांना आपलं घर अतिशय ब्राइट कलर्सने सजवणं पसतं असतं. असंच एक घर आहे, जे वायब्रेंट कलर्सने सजवण्यात आलं आहे. या घराच्या मेकओव्हरचे फोटो व्हायरल झाले असून घरातील प्रत्येक कोपऱ्यातील आकर्षक सजावट पाहून सर्वच जण हैराण आहेत.
हे रंगबेरंगी घर इंग्लंडमधील (England) वेस्ट लंकाशायर (West Lancashire) नताशा मॅकब्रिन (Natasha McBrinn) यांचं आहे. 30 वर्षीय नताशा मॅकब्रिन ऑम्सकिर्कमध्ये राहतात. त्यांनी मर्यादित बजेटमध्ये आपल्या घराचं ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. हे पाहून तुम्हाला एका वेगळ्याच जगात आल्याचं वाटेल.
2/ 7
नताशाने त्यांना ब्राइट रंग, बोल्ड पॅटर्न अतिशय आवडत असल्याचं सांगितलं. म्हणूनच तिने आपलं भाड्याचं घरही अतिशय वेगळ्या पद्धतीने सजवलं आहे.
3/ 7
नताशाने Instagram अकाउंटवर @prettypocketprojects हे फोटो शेअर केल्यानंतर अनेक जण घराचा हा मेकओवर पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. काही लोकांनी या कलर्सचं, घराचं अतिशय कौतुक केलं असून काहींना हे वेगळेपण पसंद पडलं नाही.
4/ 7
Mirror च्या रिपोर्टनुसार, नताशाला काही लोकांचे अतिशय खराब रिअॅक्शन मिळाले. काही लोकांनी इतके भडक रंग पाहून डोकेदुखी झाल्याचं म्हटलं. नताशाने तिलाही मायग्रेनचा त्रास असल्याचं सांगितलं, परंतु हा त्रास या रंगांमुळे नसल्याचं तिने म्हटलं आहे.
5/ 7
काही लोकांना ही कल्पना अतिशय आवडली आहे. काही लोक नताशाकडून प्रेरणा घेत आपलं घरही अशाप्रकारे कलरफूल करत आहेत. नताशाने किचनपासून टॉयलेटपर्यंत ब्राइट कलर्स दिले आहेत. घरातील अधिकतर गोष्टी सेकंड हँड असून या कलर्समुळे त्या गोष्टींचा नक्शाचा बदलला आहे.
6/ 7
त्यांनी आपलं घर स्वत:चं पेंट केलं आहे. मूडनुसार रंगांचा वापर केला आहे. मुलांच्या रुपमध्ये सर्वात अधिक खर्च केला आहे आणि तिथे सर्व वस्तू नव्याने खरेदी केल्या आहेत.
7/ 7
िंतींसाठी स्वस्तातल्या वॉलपेपर्सची निवड केली आहे. घराचा प्रत्येक कोपरा सर्वांना आश्चर्यचकित करणार आहे. (Credit- Instagram/@prettypocketprojects)