

एका विमानात प्रवासी चढले होते आणि फ्लाइट काही सेकंदात उड्डाण करणार होती, तेव्हाच एका व्यक्ती विमानाच्या विंगवर जाऊन फोटोसेशन करीत होता. तो काही वेळ विंगवर फिरत होता. त्यानंतर तो तिथेच झोपला. विमानातील प्रवाशांनी त्या तरुणाचे फोटो शेअर केले आहेत. (फोटोज साभार- Twitter/Erin Evans)


अलास्का एअरलाइन्स विमानाच्या पंखांवर एक तरुण फिरत असल्याची घटना अमेरिकेच्या लास वेगासमधील आहे. शनिवारी झालेल्या या घटनेमुळे उड्डाण चार तास लांबले.


पोलिसांनी त्या तरुणाला विमानाच्या विंगवरुन खाली उतरवण्याचा प्रयत्न केला असता त्याने जमिनीवर उडी मारली. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला वैद्यकीय सुविधेत ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


विंगवर चढलेला तरुण मानसिक आजाराने ग्रस्त आहे. रिपोर्ट्सनुसार पायलटने आधीच एका तरुणाला विमानाच्या दिशेने जाताना पाहिले होते आणि कंट्रोल टॉवरला याची माहिती दिली होती.