विवाहित जोडप्याच्या घटस्फोटानंतर त्यांच्या संपत्तीची (Property) आणि मुलांची कस्टडी पती-पत्नी या दोघांना दिली जात असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मात्र ब्राझीलमध्ये एका पती-पत्नी कुत्र्याची कस्टडी (Dog) घेण्यासाठी कोर्टात पोहोचले. ज्यावर कोर्टानेही निर्णय दिला.. यावेळी कोर्टाने सांगितलं की, जो कुत्र्यावर सर्वाधिक प्रेम करत असेल त्यालाच कस्टडी मिळेल. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)
दाम्पत्य विभक्त झाल्यानंतर महिलेने आपल्या एक्स पतीपासून कुत्र्याला लांब ठेवलं आणि त्याला कुत्र्याला भेटूही दिलं नाही. त्यानंतर महिलेचा एक्स पार्टनर कोर्टात गेला. जेथे कोर्टाने त्याला कुत्राला भेटण्याचा अधिकार दिला. सोबतच तो कुत्र्यासोबत सुट्टीही घालवू शकतो. कोर्टाने सांगितलं की तो सुट्टीच्या दिवशी आणि वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या सुट्टींमध्येही कुत्र्याला भेटू शकतो. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)