काही वस्तू या महिला आणि पुरुषांसाठी ठरलेल्या असतात. पण तरी काही पुरुष महिलांच्या आणि काही महिला पुरुषांच्या वस्तू वापरताना दिसतात. पण काही अशा वस्तू ज्या खरंतर पुरुषांसाठी बनवण्यात आल्या होत्या, ज्या आता महिला वापरतात.(प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
2/ 6
तुम्ही महिलांना ड्रेस किंवा टॉपखाली स्टॉकिंग घातलेलं पाहिलं असेल. पण ऑडी वेबसाईटच्या रिपोर्टनुसार नवव्या शतकापर्यंत असे स्टॉकिंग पुरुष वापरत असत. श्रीमंत पुरुष याचा सर्वाधिक वापर करत असत. अठराव्या शतकापासून महिला स्टॉकिंग घालू लागल्या. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
3/ 6
थाँग म्हणजे जी स्ट्रिंगवाली अंडरविअर आज महिलांच्या ग्लॅमरस लूकसाठी वापरल्या जातात. पण जुन्या काळात ग्रीस आणि जपानमध्ये फक्त पुरुष या अंडरविअर वापरायचा. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
4/ 6
मेकअप म्हणजे महिलांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण प्राचीन इजिप्तमध्ये पुरुषही मेकअप करायचे, ज्यामुळे ते श्रीमंत दिसायचे. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
5/ 6
हल्ली बऱ्याच तरुणी क्रॉप टॉप घालतात. अमेरिकन फुटबॉल प्लेअर्स असे टॉप घालायचे. 80-90 च्या दशकात पुरुषांचं सर्वात खास वस्त्र मानलं जायचं. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
6/ 6
पर्शियन सैनिक सुरुवातीला हाय हिल्स घालायचे. घोड्यावर बसून ते युद्ध करायचे. कारण यामुळे घोड्यावरील पकड मजबूत राहायची. सतराव्या शतकात फ्रेंच पुरुषही हाय हिल्स घालू लागले. अठराव्या शतकापासून महिला हाय हिल्स घालू लागले. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)