कर्नाटक - महाराष्ट्र सिमेवरील औराद तालुक्यातील चिंताकी गावात रहाणाऱ्या मारुती कोळी या तरुणांची उंची जवळपास साडेसात फूट आहे. मात्र त्याच्या या अधिकच्या उंचीमुळे त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागतं आहे. घरची गरीब परिस्थिती असणाऱ्या या मारुतीला मदत करण्याचे आवाहन सोशल मीडियावर करत त्याचे व्हीडिओ व्हायरल करण्यात आले.