अंजली अरोरा या वर्षाच्या सुरुवातीला भुवन बड्याकर नावाचा माणूस सोशल मीडियावर स्टार झाला, जेव्हा त्याचे 'कच्चा बदम' हे गाणे सोशल मीडियावर हिट झाले. शेंगदाणे विकताना तो व्यक्ती एक मजेदार गाणे गुणगुणायचा, जे नंतर वेगाने ट्रेंड करू लागले. या गाण्यावर लोकांनी डान्स केले. पण यासगळ्यात फेमस झाली ती अंजली अरोरा.
अंजलीला 'कच्चा बदाम गर्ल' या नावाने देखील ओळखले जाते. अंजलीने या गाण्यावर बोल्ड मूव्ह्ससह ग्लॅमरस स्टाईलमध्ये डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्यामुळे तिला रिअॅलीटी शोमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली आहे. आता ती बरीच प्रसिद्ध झाली आहे आणि इंस्टाग्रामवर 10 दशलक्षाहून अधिक लोक तिला फॉलो करतात.
ईशानी इंस्टाग्रामवर प्रसिद्ध झालेली ईशानी डान्सर आणि डेंटिस्ट आहे. ती 'देसी शफल' नावाच्या डान्स ग्रुपचीही सदस्य आहे. या वर्षी जूनमध्ये, तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती तिच्या मैत्रीणींसह डान्स करत आहे. ज्यामुळे ती बरसो रे मेघा डान्सिंग गर्ल्स नावाने देखील ओळखली जाते. ती अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरवर नाचताना दिसती. हा व्हिडीओ इतका लोकप्रिय झाला की तो केवळ इंस्टाग्रामवरच नाही तर इतर प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होऊ लागला.
या वर्षी ऑगस्ट महिन्यात, एका गोंडस चिमुरडीने तिच्या भावासोबत एक मजेदार व्हिडीओ बनवला, ज्यानंतर ती सोशल मीडियावर अचानक फेमस झाली. झारा आणि जोहान नावाची ही दोन मुले पाकिस्तानातील कराची येथे राहणारे भावंडे आहेत. 21 ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये दोन्ही मुले दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ ये मेरा भाई है व्हिडीओ या नावाने ओळखला जातो. हा व्हिडिओ इतका क्यूट होता की तो खूपच चर्चेत होता.
टी-20 विश्वचषक दरम्यान एक मिस्ट्री गर्ल चर्चेत आली. तिने आपल्या सौंदर्याने भारतीयांची मन जिंकली. या मुलीचे खरे नाव काय, हे अद्याप गुपित आहे, मात्र जेव्हापासून ही मुलगी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, तेव्हापासून तिच्या नावावर खोट्या अकाउंटचा महापूर आला आहे. लोकांचा दावा आहे की या मुलीचे नाव नताशा आहे. सामन्यादरम्यान ही मुलगी पाकिस्तानी संघाला चिअर करताना दिसत आहे. नंतर ती फ्लाइंग किस्सही देऊ लागते.
तुम्ही कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उघडा, तुम्हाला नक्कीच एका पाकिस्तानी मुलीचा व्हायरल डान्स व्हिडिओ दिसेल, ज्यामध्ये लता मंगेशकर यांच्या 'मेरा दिल ये पुकारे आ जा' या जुन्या गाण्यावर तरुणी नाचत आहे. रिपोर्ट्सनुसार, मुलीचे नाव आयशा आहे जी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये राहते. ती इंस्टाग्रामवर नव्हे तर टिकटॉकवर जास्त सक्रिय असते, तिच्या अकाऊंटवरून तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओला ५.९ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत, पण लोकांनी वेगवेगळ्या अकाउंटवरूनही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.