आफ्रिकेच्या पूर्वेकडील तंजानिया या देशातील (Tanzania) एका महिला खासदाराच्या (Women MP) कपड्यावरुन संसदेत वाद निर्माण झाला. संसदेत येताना खासदार महिलेने टाइट फिटिंग असलेली पॅन्ट (Tight Fitting Trousers) घातली होती. यावर नॅशनल असेम्बलीमध्ये (National Assembly) गोंधळ उडाला व तिला संसद सोडून बाहेर जावे लागले.