पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण बल आहे. ज्याचा शोध सफरचदाच्या झाडाखाली न्यूटनने लावला. गुरुत्वाकर्षणामुळे सगळ्या गोष्टी पृथ्वीकडे किंवा थालच्या दिशेने खेचल्या जातात. आपण हे सायन्समध्ये शिकलो देखील आहे. पण असं असलं तरी सायन्सला चॅलेंज देणारी देखील अनेक ठिकाणी जगभरातून समोर आली आहेत. त्यांपैकी एक भारतात देखील आहे.
सेंट इग्नास मिस्ट्री स्पॉट, मिशिगन हे एक प्रकारचे रहस्यमय ठिकाण आहे. इथे तुम्ही हवे तितके वाकून उभे राहू शकता पण तरी देखील तुम्ही पडणार नाही. एका अहवालानुसार, 1950 च्या दशकात काही लोक सर्वेक्षण करत होते, अचानक त्यांच्या उपकरणांनी गूढ पद्धतीने काम करणे बंद केले, त्यांनी या जागेचे सखोल सर्वेक्षण केले तेव्हा त्यांना आढळले की ते सुमारे 300 स्क्वेअर फूट परिसरात गुरुत्वाकर्षण काम करत नाही.