सध्या बऱ्याच ठिकाणी थंडीचा कडाका वाढलेला आहे. याच थंडीत सुंदर असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात अख्खं शहर गुलाबी झालं आहे.
2/ 5
या शहरात निसर्गाने जणू गुलाबी रंगच उधळला आहे. गुलाबी फुलं असलेली उंच उंच झाडं आण रस्त्यावर या गुलाबी फुलांचा सडा.
3/ 5
ही गुलाबी फुलं आहेत Tabibuea Rosea ज्याला पिंक ट्रम्पेटही म्हटलं जातं. पाहताच हे एखादं परदेशातील ठिकाण असावं असं वाटेल. पण हे भारतातीलच शहर आहे, जिथं ही फुलं बहरतात.
4/ 5
आता हे सुंदर ठिकाण कोणतं आहे ते तुम्ही ओळखलंत का? हे ठिकाण आहे कर्नाटकातील बंगळुरू. जानेवारी ते मार्चमध्ये तुम्हाला हे शहर असंच सुंदर दिसेल.
5/ 5
सोशल मीडियावर असे बरेच फोटो व्हायरल होत आहेत. कर्नाटक टुरिझमने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.