पाणीपुरी कशी बनते हे तुम्ही पाहिलंय का? प्रत्यक्षात पाहिलं नसेल तरी सोशल मीडियावर व्हिडीओ नक्कीच पाहिले असतील. बऱ्याचदा अस्वच्छ ठिकाणी पाणीपुरी बनवली जाते. काही व्हायरल व्हिडीओजमध्ये तर असं दिसतं, की हातपाय न धुताच पाणीपुरीचं पीठ मळलं जातं. असे व्हिडीओ पाहिले की, पाणीपुरी खायची इच्छा उरत नाही. त्यामुळे याच समस्येवर मात करण्यासाठी गुजरातमधल्या अहमदाबादच्या आकाश गज्जर या इंजिनीअर तरुणाने आरोग्यपूर्ण पाणीपुरी बनवण्यासाठी एक मशीन तयार केली आहे.
तिथे त्यापासून पाणीपुरीचा आकार तयार केला जातो. ते तयार झाल्यानंतर त्या पुऱ्या कापडावर टाकल्या जातात. अशा रीतीने तयार झालेल्या कच्च्या पाणीपुऱ्या अंतिम टप्प्यात तेलात तळण्यासाठी तयार होतात. नंतर या कच्च्या पाणीपुऱ्या मशीनमध्येच तळल्या जातात व खाण्यासाठी तयार होतात. मशीनने तयार केलेल्या पाणीपुऱ्या फुटत नाही आणि त्या खूप कुरकुरीत असतात. हे फोर-बेल्ट मशीन पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे.
आकाश गज्जर म्हणाला की, या मशीनचा उपयोग समोसा, शंकरपाळे, मठिया व पापड बनवण्यासाठीही करता येऊ शकतो. हे मशीन विशेषतः अमेरिकेत राहणाऱ्या गुजराती नागरिकांसाठी उपयुक्त आहे. ते इतर देशांमध्ये पाणीपुरी बनवण्यासाठी या मशीनची निर्यातही करत आहेत. हे मशीन 2022मध्ये तयार करण्यात आलं. त्यासाठी 7.85 लाख रुपये खर्च आला, असंही आकाश गज्जरने सांगितलं.