या महिलेने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितलं की, हा सुपर फिटीशनचा प्रकार आहे. 2016 च्या एका रिपोर्टनुसार सुपर फिटीशनचे खूप कमी केसेस डॉक्युमेंट करण्यात आले आहे. यामुळे महिला काही दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांना गर्भवती राहिली आहे. या महिलेने सांगितलं की, मी माझ्या पहिल्या गर्भधारणेतच जॅकपॉट मिळवला आहे. आणि एकाच वेळी तीन मुलांना जन्म होणार आहे. त्यामुळे ही माझी पहिली आणि शेवटची प्रेग्नंसी असेल याची शक्यता खूप वाढली आहे.
तिने पुढे सांगितलं की, माझी मुलं हेल्दी असून वैद्यकीय बाबतीत योग्य आहे. या महिलेच्या व्हिडीओ क्लिपला लाखो Views मिळाले आहेत. टिकटॉकवर ब्लॉन्ड बनी युजरनेमने असणारी ही महिला नेटकऱ्यांना नियमित आपल्या मुलांबाबत माहिती देत आहे. चाहते तिच्या लुक्सची तुलना प्रसिद्ध संगीत कलाकार ब्रिटनी स्पीअर्सशी करतात.